समीर गायकवाड यांच्याविषयी...
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

वसुंधरेचे गोडवे

माण्साने आयुष्यात एकही झाड लावू नये, मात्र जागतिक वसुंधरादिनाच्या फेस्बुकी शुभेच्छा द्याव्यात. जोशात येऊन एखाद दुसरे झाड कुठे लावले असले तरी त्याची निगा राखू नये, त्याला खतपाणी घालू नये, त्याला उन्हात होरपळू द्यावे, त्याची काडीकामठी होऊ द्यावी. त्याला सुकू द्यावं, जळू द्यावं, त्याला मातीतून उफाणून मुळासकट वर उपसून येऊ द्यावं. येता जाता त्या जळून चाललेल्या शुष्क […]

दिलकश – बेगमजान…

ज्या देशात आईने बाळाला दुध पाजताना कोण्या पुरुषाने तिच्या त्या मातृवत्सल स्तनाकडे पाहिल्यावर त्याची वासना जागृत होईल याची घृणास्पद भीती बाळगून तिच्यासाठी बंदिस्त जागा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आटापिटा केला जातो आणि मूळ पुरुषी वासनाउत्पत्तीच्या किड्याची लोभस रुपात जोपासना केली जाते तिथे ‘बेगमजान’ला ‘फक्त प्रौढासाठी’चे ए प्रमाणपत्र मिळणे साहजिक होते. हे कमी होते की काय म्हणून कित्येक […]

कथा विश्वव्यापी दीपस्तंभाची – गोष्ट हेलेन केलरची…

  कल्पना करा की तुम्ही अंध आहात, मुके आहात आणि बहिरेही आहात. तुमचे वय जेमतेम दोनेक वर्षे आहे आणि तुम्ही त्या अंधारया आणि आवाजांच्या संवेदना नसलेल्या जगात लहानाचे मोठे होत आहात. मग तुमच्या मनात नैराश्य येईल की हिमशिखरे खुजे ठरतील इतके उत्तुंग विचार येतील ? स्वतःबद्दल काय विचार येतील ? हातपाय धडधाकट असूनही आपल्या नशिबाला दोष देणारी […]

मराठी चित्रपटसृष्टी – आता प्रतिक्षा ‘प्रेक्षकांच्या’ पुरस्काराची

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि मराठी चित्रपटजगतात कौतुकाचे, अभिनंदनाचे उधाण भरते आले. प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद वाटणे साहजिक आहे कारण ही घटना साधी नाही. मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही पाचवी वेळ आहे. […]

हरवलेले दिवस

आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे […]

गाठ

कामिनीचं सौंदर्य कोणालाही घायाळ करणारं होतं, एकदम जहरी. एकदा तिच्या नजरेला नजर भिडली की गडी खल्लास होऊन जायचा. कितीही तालेवार आसामी असली तरी तिच्यापुढे मग तो गोंडा घोळू लागायचा. तिच्या फुलांच्या ताटव्यात त्याचा भुंगा पार अर्धमेला होऊन जायचा आणि ती त्याला खेळवत रहायची. तिचा कातळलेला गोरापान आरस्पानी देह, कमनीय सुडौल बांधा, उफाडयाचं अंग अन गिर्रेबाज चाल […]

‘अमीना’ – अंत नसलेलं स्त्रीत्व

१९८०चा सुमार असावा. कामाठीपुरयातील तेराव्या गल्लीतल्या अमीनाकडे जाकीर रोज नित्य नेमाने यायचा. जाकीर एक भुरटा पाकीटमार. भायखळयातल्या एक खोलीच्या खुराडयात तो राहायचा. यतिम होता तो. चाळीशीतला जाकीर कायम उदासवाणा अन खरवडल्यागत वाटायचा तर पस्तीशीच्या आसपासची अमीना कमनीय नसली तरी काजूकतलीसारखी मुलायम होती. ती ‘लाईन’मध्ये आल्यापासून जाकीर तिच्याकडे यायचा. तिच्याशी असणारा त्याचा याराना एकदम पक्का होता. हरामकमाईने […]

ए लेटर टू विनोद खन्ना…

प्रिय विनोद, सोशल मीडियात आणि वृत्तवाहिन्यांवर तुझे व्हायरल झालेले फोटो पाहिले आणि काही क्षणासाठी विचलित झालो. तू फाईटर आहेस, तुला जे काही झालं असेल त्यातून तू बाहेर पडशील याची अनेकांना खात्री आहे. तुझ्या लाखो चाहत्यापैकीच एक मी. बॉलीवूडी चित्रपटात तू एकमेव तगडा अभिनेता असावास जो मिशीतदेखील हँडसम वाटायचा आणि सफाचट ओठांच्या लुक्समध्येही देखणा दिसायचास. तुला तुझी […]

1 2 3 15