नवीन लेखन...
निनाद प्रधान
About निनाद प्रधान
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

फोर्टमध्ये फिरताना – भाग १

फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्‍यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे. […]

रेल्वे स्थानकांवरील झगमगीत “वजन” यंत्रे

या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. […]

रंगांच्या दुनियेतील विविधरंगी रसायन… प्राध्यापक गजानन शेपाळ

काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. […]

महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]

देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !! […]

काळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’

दक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली! यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर. […]

युती आणि आघाडी

युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत. […]

मराठी खाद्यबाणा

मराठी माणसाच्या मराठी मुंबईत अस्सल मराठी पदार्थ किती हॉटेल्समध्ये मिळतात? खरंतर हा एक संशोधनाचाच विषय आहे. मराठी आणि महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळणारी मराठी मालकीची हॉटेल्स किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच…… […]

मुंबईतली अस्तंगत झालेली ट्राम

आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल. मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे […]

1 2 3 4 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..