About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

आज जरी आपल्याला यातील बऱ्याच शस्त्रक्रिया अगदी सोप्या ‘रुटीन’ वाटत असल्या तरी शंभर काय अगदी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच निराळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही सगळ्यात वरची पायरी होती पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेच प्रयत्न झाले. खरेतर १८९६ मध्येच पहिली हृदय-शस्त्रक्रिया करण्यात आली. […]

हृदयरोगाचा अर्वाचीन इतिहास

आधुनिक इतिहासात हृदय-विकार किंवा खरेतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी सम्बन्धित आजार यावर प्रथम लक्ष वेधण्याचे निवेदनाचे श्रेय विल्यम हेबरडीन यांना जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे विकार डोके वर काढतात असे दिसून येते. वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरण यामुळे आहाराच्या पद्धतीत बदल झाले, अंगमेहनतीची कामे बाजूस जाऊन बैठ्या जीवनशैलीचा शिरकाव झाला. त्यामुळे हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले […]

हृदयविकाराची प्राचीन कहाणी

ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे. […]

हृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे

आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. […]