नवीन लेखन...
Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

द “बर्निंग” ट्रेन

ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. […]

मूर्तीभंजकांची परंपरा…

मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. […]

देव भुकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धीचा

चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमज करुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीता झाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. […]

महाराष्ट्र २४ तास

महाराष्ट्र २४ तास हे एक वेबपोर्टल आणि ऍंड्रॉइड ऍप्स आहे. विश्वातील ताज्या घडामोडी आणि विश्वकल्याणकारी विचार लोकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी व जनमानसातील विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी “महाराष्ट्र २४ तास” सज्ज झाले आहे. […]

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग ५)

माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय आहे मी षंढ, षंढ आहे मी. पण एकेकाळी मी सुद्धा पहाड फोडीत जाणार्‍या जलप्रवाहाचा वारसदार होतो. पण आता जलाशय होऊन स्तब्ध झालोय. अरे माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या देशभगीनींची अब्रू लूटली जाते. माझ्याही मुठी आवळल्या जातात जेव्हा माझ्या देशबांधवांची पशूप्रमाणे हत्या होते.
[…]

एकाकिंका : मला काय त्याचे? (भाग ४)

अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई…. माझी ताई… आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली.
[…]

एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.
[…]

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग २)

मोहन – कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.

विनायक – अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी वेडा आहे. 

[…]

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग १)

त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)…
[…]

बाळासाहेब नावाचं वादळ

गेली काही दिवस बाळासाहेब ठाकरे मृत्यूशी झुंज देत होते. अनेक दिग्गज राजकिय विरोधकांना शमवणारे बाळासाहेब यांच्यापुढे मृत्यूचेही काही चालेना. मृत्यू गयावया करू लागला तेव्हा बाळासाहेबांना मृत्यूची दया आली आणि दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यूस स्वतःला अर्पण केले आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..