ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा आणि सुधारणा

‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून दहा दहशतवादी हिंदुस्थानी नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलिसांना चकवून मुंबईत किनाऱ्यावर येऊ शकले. त्यानंतर वर्तमान सागरी सुरक्षा प्रणालीत असलेल्या उणिवा दूर करण्याकरिता अनेक उपाय घोषित केले. या हल्ल्याला उद्या नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांनंतर सागरी सुरक्षेत घडून आलेल्या सुधारणांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. […]

हिंदुस्थान-भूतान मैत्री आणि चीनचा खोडा

चीन भूतानला आपल्या बाजूने खेचण्यासाठी नेहमीच दबाव टाकत असतो. डोकलामचा मुद्दा उपस्थित करण्यामागे चीनचा उद्देश हिंदुस्थान आणि भूतानमधील संरक्षण सहकार्यात भेद करण्याचा होता, भूतानचे राजे जिग्मे खेसर यांच्या अलीकडच्या दौऱ्यामुळे तो तडीस न गेल्याचेच स्पष्टपणे दिसते. हिंदुस्थान आणि चीन या राष्ट्रांत नेपाळ आणि भूतान या ‘बफर स्टेट’ समावेश होतो. हे ‘बफर स्टेट’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. यादृष्टीने भूतानचे सामरिकदृष्ट्या महत्त्व आहे. हिंदुस्थान भूतानच्या विकासासाठी मदत करत असून दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होत आहेत. […]

समस्या रोहिंग्या शरणार्थिंची

भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या शरणार्थिं मुसलमान नागरिक रहात असावे अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कमिशनने दिली आहे. यामध्ये 16 हजार 500 रोहिंग्या शरणार्थिंना संयुक्त राष्ट्रांकडून ओळखपत्रही मिळाली आहेत. त्यातील ६ हजार ६८४ हे केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात भर नक्कीच पडलेली असणार. केंद्रीय गृहमंत्री किरण रज्जू यांनी […]

चीनबरोबर व्यापार युध्द जिंकण्यासाठी बहुआयामी उपाययोजना जरुरी

गेल्या वीस वर्षांपासून चीनचे आपल्या बाजारपेठेवर सुरू असलेले धोरणात्मक आक्रमण थांबविण्याकरिता एखाद्या वर्षाचे प्रयत्न पुरेसे होणार नाहीत. देशभक्त नागरिकांना किमान काही वर्षे ही लढाई निर्धाराने करावी लागणार आहे. मिळणाऱ्या संकेतांप्रमाणे या लढाईत विजय निश्चित मिळू शकतो. आपल्या निर्धाराची कसोटी मात्र येणारा काळ निश्चित बघणार आहे. […]

कलम ३५(ए) काश्मिर – लक्षावधी लोकांचे जीवन असह्य

काश्मीरमध्ये राजकीय पक्षांना आणि तथाकथित विचारवंतांना देशाच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलेही कारण पुरेसे ठरते. आता नवे कारण म्हणजे राज्यघटनेतील 35 अ हे कलम. यावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. इतर वेळी एकमेकांशी भांडणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर अपक्ष सदस्य याबाबत एकत्र आले आहेत. […]

कारगिल युद्ध – १९९९

२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. […]

काश्मीर खोर्‍यातील दगडफेक

काश्मीर खोर्‍यामधील चकमकीच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक […]

आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका

विराटची तीस वर्षे सेवा ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने […]

चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि भारताचे प्रत्युत्तर

चीनने संरक्षणावरील तरतूद सात टक्क्यांनी वाढवली. त्यामुळे संरक्षण खात्यावरील तरतूद तब्बल १५२ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम भारत संरक्षणावर करत असलेल्या तरतुदीच्या तिप्पट आहे.अमेरिका आणि चीनच्या वादात चीनने संरक्षणावरील तरतूद वाढवली असली तरी ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मोदी यांना मिळालेले यश ही चीनसाठी वाइट बातमी भारतामधील विविध राज्यांमध्ये निवडणुकीत भारतीय जनता […]

शीख कट्टरतावाद्यांना कॅनडाकडुन मदत

कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन हे १७ एप्रिल ते २४ एप्रिल भारताच्या दौर्यावर आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थक असलेले कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांना भेटण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नकार दिला आहे. एका मुलाखातीदरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरजीत सज्जन खलिस्तानवादी असल्याने त्यांच्याशी भेटणार नसल्याचे सांगितले. कॅनडाच्या मंत्रीमंडळात पाच खलिस्तानवादी मंत्री आहेत व त्यांच्यामुळेच कॅनडा सरकारने […]

1 2 3 18