नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।। आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।। प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।। अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी, दिसत  नाही […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे […]

देव ही संकल्पना

अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना ….. […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।। आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।। एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।। दुजामध्ये […]

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

कैलास मानसरोवर यात्रा

देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

1 110 111 112 113 114 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..