About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

देह देव

हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।।   प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।।   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

पक्षाना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या    चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून […]

मग्न असलेले जग

मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा […]

निसर्गाचे मार्ग वेगळे

मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ  । चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ….१ चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी  । करूया काही आगळे  ठरवी  विचारांनी….२ आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे  । नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे….३ परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती  । कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती….४ करून घेतो निसर्ग,  वाटते […]

तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे. […]

अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी अतृप्त […]

स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला आवडते भावते कल्पनेचे राज्य जरी, आनंददायी वाटते….II धृ II   तव प्रतिमा मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली  । जागेपणी मिळे न मजला, स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१ स्वप्न मजला आवडते ,   पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे  । हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२ स्वप्न मजला आवडते , […]

खरी स्थिती

मला नाही मान     मला नाही अपमान, हेच तूं जाण     तत्व जीवनाचे….१ कुणी नाही सबळ     कुणी नसे दुर्बल हा मनाचा खेळ     तुमच्या असे….२ कुणी नाही मोठा     कुणी नसे छोटा प्रभूच्या ह्या वाटा     सारख्याच असती….३ विविधता दिसे    ती कृत्रिम असे निसर्गाची नसे    ती वस्तूस्थिती….४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

सर्वांची काळजी

मुसळधार ती वर्षा चालली,  एक सप्ताह तो होवून गेला पडझड दिसली चोहीकडे,  दुथडी वाहतो नदी-नाला…१, काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?  हानीच दिसली ज्यांत खरी निसर्गाच्या लहरीपणानें,  चिंतीत झाली अनेक बिचारी….२, दृष्टी माझी मर्यादेतच,  विचार तिजला अल्प घटकांचा विश्वचालक काळजी करि,  साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

1 2 3 108