नवीन लेखन...

हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

आशुतोष राणा यांचे खरे नाव आशुतोष नीखरा आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६४ रोजी गाजरवाडा येथे झाला. त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला.

दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आशुतोष राणा यांचे लग्न अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर झाले आहे. आशुतोष राणा हे मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही झळकले. स्वाभिमान, फर्ज, कभी कभी, वारिस या मालिकांमध्ये त्यांचे दर्शन घडले. रिअँलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुराही आशुतोष राणा यांनी सांभाळली होती. बॉलिवूडबरोबरच आशुतोषने दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय केला आहे. उर्दू, इंग्रजी आणि तेलगु भाषेचे त्यांना ज्ञान आहे.

येडा या मराठी चित्रपटात आशुतोष राणा यांनी काम केले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..