नवीन लेखन...

मुंबईच्या एका ऐतिहासिक वारश्याचा निर्घृण खून

शनिवार दिनांक २४ जुन २०१७. मी एकूण ३० मुंबईप्रेमींना घेऊन माझी पहिलीच ‘मुंबई हेरीटेज टूर’ केली. सायनच्या प्राचिन शिवमंदीरापासून सुरु केलेली ही फेरी सायनचा किल्या, रस्त्यातले तिनशे वर्ष जुने माईलस्टोन, हाफकिन अर्थात जुनं राजभवन, भायखळ्याच भाऊ दाजी लाड म्युझियम व त्यातील पुतळ्यांचा इतिहास, फोर्ट सेंट जाॅर्ज व शेवटी मुंबईचा ऐतिहासिक फोर्ट विभाग पाहून समाप्त झाली.

या टूरमधे मन विदीर्ण करणारी एक बाब दिसली आणि ती म्हणजे कोणी नतद्रष्टाने सायन येथील अंदाजे २८०-३०० वय असलेला ‘हेरीटेज’ दर्जाचा ‘माईल स्टोन’ अतिशय वाईट पद्धतीने फोडलेला आढळला. हे कोणी केलं याची चवकशी करताना महानगरपालिकेनेच केलं असं उत्तर मिळालं, खरं खोट माहित नाही परंतू महानगरपालिकेची ख्याती लक्षात घेता तसं होणं अशक्यही नाही असं वाटतं. मी याला अत्यंत थंडं डोक्याने क्रूरपणे केलेला खुन मानतो. हेरीटेज, आपला मौल्यवान वारसा तोडून कुणाला काय समाधान मिळालं हे समजण्याच्या पलिकडचं आहे.

तो ब्रिटीशकालीन माईलस्टोन बिचारा गेली तिनेकशे वर्ष रस्त्याच्या कडेला, कोणाच्या अध्यात ना मध्यात, असा अंग चोरून उभा होता. त्याची कुणाला अडचण होऊन काढायचाच होता, तर सन्मानाने काढून ठेवता आला असता पण हात-पाय तोडल्यासारखे त्याचे तुकडे तुकडे करायची काय आवश्यकता होती? सोबतचा फोटो बघा कल्पना येईल की काय पद्धतीने त्याचा काटा काढण्यात आलाय तो..!

p-39318-sion-milestone-April-2017या घटनेची कुणाला माहिती नसावी आणि असली तरी त्याचं गांभिर्य कळलं नसावं. ह्याला मुळापासून उखडणं असं म्हणतात. आज हे दगडाला उखडातायत, उद्या हिच पाळी आपल्यावर येणार आहे. मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही, कुणी म्हणणारही नाही. आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो, तशी धर्मशाळेबाबत कोणतीच भावना कोणाच्याच मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय. फक्त पैसे कमीवण्यासाठी मुंबईत आलेल्यांना मुंबईचं काही झालं तरी काही सोयरसुतक असण्याचं कारण नाही. मुंबईशी काही देण घेणं नसलेल्या परकीय गवताची मुंबईत चांगलीच वाढ होतेय आहे आणि हे विषारी गवत मुळच्या मुंबईकरांना मुळापासून उखडत चाललंय..दुर्दैवानं आपले अधिकारीही काही पैशाच्या लाचारीने यांनाच साथ देतायत. आता जे काही करायचंय ते आपण सामान्य माणसानेच करायला हवं..

हे असं का व्हावं याचा शोध घेतला असता एक कारण सापडलं. ते खरं की खोटं ते माहित नाही मात्र पटण्याजोगं आहे. मुंबईत ‘हेरीटेज’ दर्जाची वस्तू सापडली, की मग त्या परिसरातल्या काही शे मिटर त्रिज्येच्या अंतरापर्यत विकासाला मर्यादा येते. हेरीटेज वस्तूच्या परिसरात विकास होऊ शकत नाही असा काहीसा नियम आहे व म्हणून अशा वस्तू रात्रीच्या अंधारात गुपचूप नाहीश्या केल्या जात असाव्यात असा तर्क करता येतो. अर्थात स्थानिक प्रशासन व लेकप्रतिनिधींना यात विश्वासात घेऊन त्यांचं तोंड ‘अर्थ’पूर्ण रितीने बंद केलं जातं. त्यांचं सामिल असल्याशिवाय असं होणं शक्यच नाही. दादर पश्चिमेला असलेल्या गोल देवळाच्या शेजारचा माईलस्टोन असाच संपूर्णपणे गायब केला गेलाय..!

अशा सर्व वातावरणात आता आपणच आपले वाली होणं आवश्यक झालं आहे. सावध व्हा, एकटे लढा किंवा एक होऊन नाहीतर आपणही असेच एक दिवस आपल्या मुळापासून उखडून दूर फेकले जाऊ, ती घडी आता दूर नाही..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..