नवीन लेखन...

वैदिक काळातील वीरांगना

ऋग्वेद वाचीत असताना, स्त्रीच्या पराक्रमाची एक गाथा सापडली.

तिचे नाव कुणाला ठाऊक नाही, तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला. सैन्य ही युद्धघोष तिच्या मागे निघाले. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. या शिवाय, एका रथी प्रमाणे युद्ध करून तिने हजारो सैनिकांचा पाडाव केला. युद्धात जय मिळवून दिला. गौ धन ही पुन्हा परत मिळाले. मुद्‌गलानीच्या नेतृत्व आणि पराक्रमा मुळे विजय मिळाला असेच सर्वाना वाटले. त्या वेळच्या इतिहासकार अर्थात मंत्रदृष्टा ऋषीनीं एका स्त्रीच्या पराक्रमाची नोंद घेतली. तिच्या पराक्रमाची गाथा ऋग्वेदात ऋच्यांचा रुपात गायली.

उत् स्म॒ वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ भरे॑कृतं व्यचेदिन्द्रसेना ॥ २ ॥
(ऋग्वेद १०/१०२)

प्रख्यात योद्धा मुद्‍गल याची पत्नी मुद्‌गलानी ही त्याच्या जवळच रथांत बसली. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही. इंद्रसेनेत रथी हो‍ऊन तिने हजारो शत्रू सैनिकांचा पराभव केला आणि गायींना प्राप्त केले.

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..