नवीन लेखन...

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर

भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. […]

कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव

कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची ‘गाइ घरा आल्या’ ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन […]

‘शोले’ तला अजरामर गब्बरसिंग – खलनायक अमजद खान

शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपैकी एक आहे. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला. ‘शोले’ मधील गब्बरची भूमिका करून ‘अमजद खान’ यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. ‘शोले’ या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो […]

हिंदीतील उल्लेखनीय चित्रपट ‘अभिमान’

२७ जुलै १९७३ साली ‘अभिमान’ चित्रपट प्रदर्शीत झाला त्याला २७ जुलै २०१७ रोजी ४४ वर्षे झाली. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अभिमान’. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात […]

मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर

दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.१९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं […]

रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट पंडितराव नगरकर

पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी […]

लिला नायडू

भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली ‘मिस इंडिया’ हा बहुमान पटकावला होता. ‘व्होग’ नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता. त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित […]

मराठी रंगभूमी तसेच सिनेक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत नंदू पोळ

वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती. नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या प्रारंभीच ‘श्री गणराय नर्तन करी’ या नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. ‘गाढवाचं लग्न’ […]

हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशहा जॉनी वॉकर

हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर […]

आई आणि गुरू

ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका कलापिनी कोमकली यांनी आपल्या आई बद्दल व्यक्त केलेल्या या भावना.. आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. […]

1 2 3 4 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..