नवीन लेखन...

रक्षाबंधन

श्रावण महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता.
[…]

नारळी पौर्णिमा

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे.
[…]

व्याघ्र प्रकल्पांच्या बफरझोनमध्ये पर्यटक बंदी आणि समस्यांचे वास्तव सत्य …!

सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे.
[…]

पाकिस्तानच्या कुरापती – आणि आमची सहनशिलता…..

नुकतेच भारत – पाक सीमेवर ४०० मीटर लांब आणि ३ मीटर व्यासाचे भुयार सापडले. या भुयारामध्ये ऑक्सिजन नळीही मिळाली, हे भुयार एका पाकी चौकीपर्यंत जोडलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. भूमिगत मार्गांनी भारतात घुसखोरी करून दहशतवादी कारवायांना वाढविण्याची पाकची योजना दिसते. पोखरण अणुस्फोटानंतर अमेरिकन विरोध आणि आर्थिक बंदीला झुगारणारा भारत, आपल्या प्रभूसत्तेविरोधी कारवायांना कसा काय सहन करू शकतो ?
[…]

आसामातील नरसंहार – बांग्लादेशी घुसखोरांचे घृणित कृत्य…..

आसाममधील ४२ विधानसभा क्षेत्रांतील बांग्लादेशी मुस्लीम घुसखोरांचे बाहुल्य, ब्रम्हपुत्रेच्या पुत्रांना अभिशाप ठरत आहे. बोडो बांधवांची हत्या, लुट, बोडो तरुणींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतरण तसेच बोडो मूळ निवासी जनजातीय लोकांच्या जमिनीवरील अतिक्रमण हे प्रकार दररोजचेच झालेले आहेत. क्रुरतेने अत्याचार करणे आणि पुन्हा बोडो बांधवांवर खोटे आरोप करून त्यांनाच वेठीस धरणे ही बाब सर्वश्रुतच आहे. भारतीय संस्कृतीवर अगाढ निष्ठा असलेल्या या बांधवांना आम्ही सुरक्षिततेचे वातावरण कधी देणार ?
[…]

जटाधारी श्री गणेश – बोर्निओ

बोर्निओ येथील श्री गणेशमूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीत आहे. मूर्तीचे आसन जावा पद्धती प्रमाणे म्हणजे पायाच्या तळव्यांनी स्पर्श केलेला आहे. मूर्तीच्या कळसालापासून बैठकीपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपणा जाणवतो.
[…]

सिंचनासोबतच टोलवसुलीवरही श्वेतपत्रिका काढा !

महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अतिशय स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे बोलले जाते. सिंचन योजनांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, असे लक्षात येताच आपल्याच सरकारच्या कामकाजावर श्वेतपत्रिका काढण्याचे त्यांनी ठरविले आहे. गेल्या दहा वर्षांत सिंचन योजनांवर खर्च झालेले ७० हजार कोटी नेमके कुठे गेले, असा प्रश्न त्यांना पडला आहे. असाच प्रश्न टोलच्या संदर्भातही उपस्थित होऊ पाहत आहे. राज्यात बीओटी तत्त्वावर बांधलेल्या रस्त्यांसाठी एकूण किती खर्च आला असता आणि बीओटीमध्ये तो किती मंजूर करण्यात आला; बी.ओ.टी. कंत्राटदाराने त्यापैकी किती वसूल केला आणि अजून किती वसूल होणे अपेक्षित आहे, याची समग्र माहिती त्यांनी राज्यातील जनतेसमोर श्वेतपत्रिकेद्वारे ठेवावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.
[…]

पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

सर्वांनी मिळून २००६ मध्ये ‘श्री सत्यनारायण केळी प्रकल्प’ हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.
[…]

मतपेटीचे राजकारण; आसामचे बांगलादेशीकरण

आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
[…]

1 2 3 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..