नवीन लेखन...

ऑक्टोबर १७ जम्बो लँड्स आणि कोलम्बोचा कलंदर

१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला. अनिलच्या पावलांचा आकार साधारण माणसांपेक्षा बराच मोठा असल्याने भारतीय संघातील सहकार्‍यांनी त्याचे नाव ‘जम्बो’ असे ठेवले. १९९२-९३ च्या इंग्लंड दौर्‍यात तीन कसोटी सामन्यांमध्ये मिळून अनिल कुंबळेने एकूण २१ ब्रिटिश गारद केले. ‘तो फारसा धोकादायक नाही’ असे तारे मालिकेपूर्वी इंग्लंडच्या व्यवस्थापकाने तोडले होते. १९९८-९९ च्या हंगामात दिल्लीत त्याने पाकिस्तानचा अख्खा संघ मटकाविला. जिम लेकरनंतर अशी कामगिरी करणारा तो एकमेव कसोटी खेळाडू ठरला. कारकिर्दीतील ११७ व्या कसोटीत त्याने आपले पहिलेवहिले कसोटी शतक झळकावले. ६०० धावांचा टप्पा गाठणारा तो वॉर्नी आंणि मुर्लीनंतरचा तिसरा फिरकीपटू ठरला. ६०० बळी आणि कसोटी शतक अशी कामगिरी मात्र फक्त त्यालाच जमलेली आहे !! नंतर कुंबळे भारतीय संघाचा कर्णधारही झाला. ऑस्ट्रेलियाच्या वादग्रस्त दौर्‍यात त्याने डोके आणि तोंड शांत ठेवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अनोखा परिचय दिला. त्रिक्रम साधण्याची आपल्या आईची इच्छा मात्र तो पूर्ण करू शकला नाही. दिल्ली कसोटीनंतर त्याने आपले बूट खुंटीवर टांगले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या चेंडूवर चौकार मारला गेला.

कोलम्बोचा कलंदर

१९६५ : कोलम्बोत एका कलंदराचा जन्म झाला. अरविंद डिसिल्वाच्या भात्यात पुस्तकातील सर्व फटके होते आणि अलीकडच्या काळातील अत्यंत प्रेक्षणीय फलंदाजांमध्ये त्याचा नि:संशय समावेश होतो. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाच्या मध्यकाळात त्याची कामगिरी सर्वात सुपीक झाली. १९९५ मध्ये केंटतर्फे खेळताना बेन्सन अँड हेजेस चषकाच्या सामन्यात लँकेशायरविरुद्ध अरविंदाने ९५ कंदुकांवर ११२ धावा फटकाविल्या. विज्डेनच्या म्हणण्यानुसार, “चेंडू फटकाविला जात नव्हता, त्याला पिसे लावली जात होती!” लॉर्ड्‌सवरील सर्वोत्तम एकदिवसीय खेळ्यांपैकी ती एक होती. १९९६ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो मानकरी होता : ४३ धावांमध्ये ३ बळी, दोन झेल आणि संयमी १०७ धावा ही त्याची जगज्जेत्या कांगारूंविरुद्धची त्या सामन्यातील कामगिरी. कोलम्बोच्या प्रेमदासा मैदानावर खेळलेल्या सलग सहा डावांमध्ये शतके करण्याचा विक्रम अरविंदाच्या नावावर आहे. कोलम्बोचा लळा त्याच्या बॅटला अखेरपर्यंत राहिला. तिथल्या शेवटच्या डावात त्याने २०६ धावा काढल्या. २००३ च्या विश्वचषकानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..