नवीन लेखन...

हे राम , नथुराम

काल गडकरीला हे नाटक पाहिलं अाणि खूप दिवसांनी काहितरी विचार मनात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडलो !

या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :
१) कुठल्याहि परिस्थितीत नथुरामची प्रामाणिक देशभक्ती अाणि गांधीवधामागची भूमिका नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावी , गांधीवधामागे स्वातंत्र्यवीर सावरकर या तेजस्वी देशभक्ताचा काहिहि संबंध नव्हता हे अधोरेखित करत गांधिजींना त्यांच्या देशभक्तीचं वाजवी श्रेय देत त्यांच्या अवाजवी बनवलेल्या देशापेक्षाहि मोठ्या प्रतिमेचं चोख मूल्यमापन करत झोपी गेलेल्यांना जागं करणं , जागं असलेल्यांना मरगळ झटकत हलवणं या हेतूनं प्रेरित होऊन मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातूनंहि राहून गेलेली काहि सत्यं नीडरपणे मांडणार्‍या जिगरबाज शरद पोंक्षे अाणि प्रमोद धुरत या जोडीचं तोंडभरून कौतुक करणं ! अाणि
२) हे नाटक कुणी कुणी पहायलांच हवं हा { न मागता दिलेला अागाऊपणाचा } सल्लेवजा प्रस्ताव मांडणं…..

नाटक बघताना एक जाणवलं ते म्हणजे निव्वळ लेखक , दिग्दर्शक व अभिनेत्याच्या पलिकडे जाऊन केलेलं नाटकाचं संकलन….. तुमच्यापैकी ज्यांनी ह्रषिकेश मुखर्जींचा अानंद पाहिला असेल त्यांना अाठवतत्रअसेल की अमिताभच्या अावाजातलं निवेदन …. जिन दिनों मैं अादसे मिला…. ते अानंद मरतें नहिं पतचं संकलन ज्या हळुवार पण प्रभावी पद्धतीने केलं गेलंय तितक्याच ताकदीने ते शरदजींनी नथुराम गोडसेंच्या जीवनपटाविषयी { किंबहुना मृत्यूपावेतो } मांडलंय….. ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ या ६५५ दिवसातली नथुरामच्या मनाची अवस्था अाणि ३० जानेवारी १९४८ या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत त्याचा झालेला गांधीवधाचा दृढनिश्चय हे दोनहि कंगोरे अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे येरागबाळ्याचं काम नव्हे महाराजा ! बरं हे करत असताना दिलेल्या कोपरखळ्या , पाकिस्तानातील अणि स्वतंत्र भारतातील पण मुसलमान लोकांकडून झालेले हिंदूंवरचे अनन्वित अत्याचार , सरकारचं { अजूनहि चालूच असलेलं मुसलमानांचं } लांगूलचालन ते अगदि पार बॅरिस्टर देवीदास मोहनदास गांधींचं नथुरामचं वकीलपत्र घेण्यामागचं दांभिकपण { हसत खेळंत दाखवलं असलं तरी त्यामागचं अत्यंत किळसवाणं अाणि स्वार्थी धोरण } अाणि सरतेशेवटि अखंड भारत अमर रहे या घोषवाक्यासह वेदीवर लटकलेले नथुराम ….. संवेदमशील माणसाच्या डोळ्यांना धारा अाणि अावंढे येईपर्यंतचे नाटकातील कैक प्रसंग …… हे सगळं अनुभवण्यासारखं अाहे , नाटक अवश्य पहा अाणि सहकुटुंब सहपरिवार पहा ! , १५ नोव्हेंबर १९४९ ते अाज ३ मार्च २०१७ पर्यंत , म्हणजेच ६७ वर्षे ३ महिने १८ दिवस पर्यंत तळतळणार्‍या नथुरामच्या अात्म्याची ह्रद्य हकिकत जाणून घेण्यासाठी तरी पहा…..

हे नाटक कुणी पहावं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव सांगून ६६० कोटि रुपये खर्च { दाखवायचा हां , करायचा नव्हे ! } करत समुद्रात महाराजांचा पुतळा बसवणार्‍या तमाम राजकारण्यांना मतं अाणि पाठिंबा देणार्‍यांनी पहावं , सावरकरांसारख्या तेजपुरुषाला पण तसबीरीचाहि मान मिळू नये म्हणून अाटोकाट प्रयत्न करणार्‍या शिरो मणींनी पहावं , Semi Automatic Pistol ने २ फुटांवरुन ३ गोळ्या लागल्यावरहि पोलादी पुरुषाप्रमाणे कणखरपणे शेवटच्या क्षणीहि हे राम शब्द सत्य—अहिंसेचा पाठपुरावा करणार्‍या गांधीजींसारख्या नेत्याच्या तोंडी देणार्‍या दांभिक लोकांनी अाणि हाच इतिहास म्हणून तमाम भारतियांच्या गळी उतरवणार्‍या पाठ्यपुस्तक महामंडळ व शैक्षणिक संस्थांच्या महानुभावांनी पहावं अाणि गेला बाजार ऊठसूट संघाविरुद्धंच छापणार्‍या तमाम वृत्तपत्रांच्या संपादकांनी पण बघावं …..

धगधगता ज्वलंत विषय न डगमगता न थकता निडरपणे समाजासमोर अाणण्याचं धारिष्ट्य दाखवणार्‍या शरद पोंक्षे या लेखक—दिग्दर्शक—अभिनेता—निर्मात्या चौफेर जिगरबाज माणसाचं अाणि प्रमोद धुरत या जिगरबाज निर्मात्याचं करावं तेवढं कौतुक कमीच अाहे !

जाता जाता एक विनंती मात्र शरदजी व प्रमोदजींना : तिकिटविक्री अाजपासून सुरु असं वृत्तपत्रांत अाल्या दिवसापासूनंच संपूर्ण थिएटर House Full घोषित करणार्‍या Ticketees.com व फोनबुकिंगचा नंबर न उचलणारे असे दोन्हि – Booking वाले कृपया बदला , फार मनस्ताप होतो !

कळावे ,
अापला विनम्र ,
उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
०३ मार्च २०१७

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..