नवीन लेखन...

हिंदी पार्श्वगायिका हेमलता

हेमलता हे नाव ऐकले की ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. त्यांनी अभिनेता योगेश बाली यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी संगीताचे आणि गझल चे शिक्षण उस्ताद रईस खान यांच्याकडे घेतले होते. वय १४ व्या वर्षी हेमलता यांना खय्याम याच्या कडून गाण्याची संधी मिळाली.

चित्रपट, मैफिल, टेलिव्हिजन आणि संगीत त्याच्या गायन भिन्न प्रकारांमध्ये अल्बम गीते त्यांनी गायली. ३८ प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे ५००० गाणी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायली आहेत. मा.हेमलता यांना १९७७ ते १९८१ च्या दरम्यान पाच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता त्यांनी जवळपास सगळी गाणी फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावीत. त्यांची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली उदा.जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..