नवीन लेखन...

सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला

सुशीलादेवी पवार यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवींचा जन्म २२ मे १९१५ रोजी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला.सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कुलात त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. सुशीलाबाईंचे लग्न पी.के.सावंत नावाच्या एका वकिलाशी झाले होते. ते मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याशी घटस्फोट घेऊन सुशीलाबाई पुण्यात आल्या. १९३० मध्ये व्ही शांताराम ह्यांच्या आग्रहाने त्या चित्रपट दुनियेत उतरल्या. आणि त्यांनी नाटकां-चित्रपटांत भूमिका करायला सुरुवात केली.नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून नृत्य, तर पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखाँ आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्तानी गायकी शिकल्या होत्या.

कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून चित्रपटक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि १९४० सालातल्या लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९४१ सालच्या “सिकंदर” या चित्रपटाने त्यां हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काळात त्यांनी वसंतसेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांतून, तसेच आँखमिचौली, महाकवी कालिदास, हातिमताई, शरबती आँखे, परबत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला. चित्रपटांशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांतूनही कामे केली. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातील कृत्तिका, तसेच लग्नाची बेडी नाटकातील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या. वनमालाबाईंना श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी १९५३ सालच्या भारतातील राष्ट्रपती पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य शासनानेही त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार देऊन गौरवले. वनमालाबाईंनी ’परतीचा प्रवास’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. वनमालाबाईंचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..