नवीन लेखन...

शांततेचा लंबक इकडून तिकड

भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचा लंबक कधी या बाजूला, नाहीतर त्या बाजूला जाऊन थांबतो. तो कधीच एकसारखा फिरत नाही. गेले वर्ष-दीड वर्षांत तो युद्धाच्या टोकापर्यंत अनेकदा जाऊन परतला आहे. ‘पाकिस्तानला धडा शिकवाच!’ या इशाऱ्यापासून ते ‘भारतातील मुंबईपासून कोलकात्यापर्यंत आणि नवी दिल्लीपासून तिरुअनंतपुरम वा चेन्नईपर्यंत असे एकही शहर नाही, जे पाकिस्तानी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही-‘ या धमकीपर्यंत सर्व तऱ्हेची मुत्त*ाफळे आजवर अनेक नेत्यांच्या तोंडी ऐकायला मिळाली आहेत. 2004 या वर्षात प्रवेश करताना दोन्ही बाजूंना किचितसा शहाणपणा आला आहे. युद्ध हे सोपे असले तरी महागात पडणारे ते शेवटचे अस्त्र आहे, याची जाणीव दोन्ही बाजूंना उशिरा का होईना, झाली आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये या आठवड्याच्या अखेरीस दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषद (सार्क) भरते आहे. या परिषदेत सहभागी असणाऱ्या सात देशांमध्ये आळीपाळीने दरवर्षी ही परिषद व्हायला हवी, असे या परिषदेची नियमावली सांगते. अट एकच, की त्यात प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने सहभागी व्हायला हवे. याचाच अर्थ असा, की दर सहा वर्षांनी एका देशात ही परिषद भरवली गेली पाहिजे. पाकिस्तानात ती 1988 अखेरीस झाली. ती चौथी परिषद होती आणि आताची ही परिषद बारावी आहे. पाकिस्तानात होणाऱ्या या परिषदेला हजर राहण्यासाठी भारताने ज्या अटी घातल्या होत्या, त्यात पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी थांबायला हवी, ही अट प्रामुख्याने होती. पाकिस्तानने 25 नोव्हेंबरपासून सरहद्दीवर पूर्ण शस्त्रसंधी जारी केली आणि ती संपूर्णत: अंमलात आलेली असल्याचे भारतीय नेतेच सांगू लागले आहेत. भारताकडून त्या शस्त्रसंधीला अर्थातच उत्तम प्रतिसाद आहे. पाकिस्तानकडून गोळीबाराच्या आवरणाखाली दहशतवाद्यांना भारतात पाठवले जाते- या आरोपाचा कणाच त्यामुळे तुटून पडला. संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, पाकिस्तानकडून कोणतीही लक्षणीय घुसखोरी गेल्या महिनाभरात झालेली नाही.

पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानात बॉम्बस्फोटात ठार करण्याचा कट उघड झाला आणि मुशर्रफ अगदी थोडक्यात वाचले, तेव्हा भारताने या घटनेचा सर्वप्रथम निषेध केला आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच या घटनेमागे कोणताही परकीय हात (अर्थातच भारताचा) नसल्याचे जाहीर केले. भारताला दहशतवाद्यांकडून जेवढा त्रास होतो, त्याहीपेक्षा थोडासा अधिकच तो पाकिस्तानलाही होतो. कारण हे उन्मादी दहशतवादी पाकिस्ताननेच निर्माण केलेले आहेत. आणि अशा शत्त*ींना फोफावू देणे सोपे, पण त्यांना आवर घालता येणे कर्मकठीण असते, हे पाकिस्तानला आता कळते आहे. ‘पाकिस्तान हाही दहशतवादाचा बळी ठरू शकतो, हे भारताच्या लक्षात यायला हरकत नाही,’ असे मत पाकिस्तानचे माहितीमंत्री शेख रशीद यांनी मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर व्यत्त* केले. ज्या देशात दहशतवाद्यांचे उदंड पीक आहे, त्या देशाला अशा घातक घटनाचक्रातून कसे जावे लागते, याची कितीतरी उदाहरणे देता येतील. अगदी अलीकडच्या काळातले अफगाणिस्तान हे एकमेव उदाहरणही त्यासाठी पुरेसे आहे. पाकिस्तानला तसे बनून चालणार नाही, हे जनरल मुशर्रफ यांना जेवढे कळते, तेवढे पाकिस्तानात अन्य कुणाला कळत असेल असे वाटत नाही.

मुशर्रफ हे पाकिस्तानचे लमुशर्रफ यांनी अफगाणिस्तानातल्या तालिबानांना बळ पुरवले. त्यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. पण आता तालिबानांचे ते भले चाहू शकत नाहीत. मात्र, तालिबानांना पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रांत व बलुचिस्तान या प्रांतातल्या अफगाणिस्तानला लागून असणाऱ्या जंगलात तसेच डोंगराळ प्रदेशात दिला गेलेला आश्रय त्यांना मोडीत काढता येत नाही.

भारताच्या थृष्टीने मुशर्रफ यांचे सत्तेवर राहणे सध्या तरी गरजेचे आहे. पाकिस्तानातली पुराणमतवादी जळमटे जर नियंत्रणात ठेवायची असतील, तर मुशर्रफ यांच्या हाती सत्ता असणे गरजेचे आहे. मुशर्रफ हे धाडशी पावले टाकू शकण्याची धमक असणारे लमुशर्रफ यांनी ‘रॉयटर’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा बदल आणखी ठळक झाला. ते म्हणाले की, काश्मीर-प्रश्नावर जरूर तर आपण सार्वमताचा आग्रहही सोडून द्यायला तयार आहोत. काश्मीर-प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर त्यासाठी लवचिक धोरणाची गरज आहे, असे सांगून त्यांनी- ‘भारताने अर्धे अंतर कापले तर आपणही ते उरलेले अर्धे अंतर कापायला तयार आहोत,’ असे म्हटले. भारत दोन पावले पुढे आला, तर आपण चार पावले पुढे जाऊ, ही त्यांची यापूर्वीची आवडती घोषणा आहे.

भारतानेही क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायची परवानगी दिली. त्याआधी भारतीय आकाश पाकिस्तानी विमानांना मोकळे केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवी दिल्ली ते लाहोर बससेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. पुढल्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये विमानसेवाही सुरू होते आहे. ‘समझोता एक्स्प्रेस’ही त्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. इतकेच काय, काश्मीरच्या दोन्ही भागांना जोडणारी बससेवा आणि त्यापाठोपाठ राजस्थान आणि सिध यांना जोडणारी बससेवा सुरू करण्याचा मानस भारताने व्यत्त* केला आणि लगेचच पाकिस्तानने त्यास दुजोरा देऊन आपणही त्यात मागे राहणार नाही, हे स्पष्ट केले.

एवढी सगळी पावले टाकण्यासाठी अमेरिकेसारख्या देशाचे किवा युरोपीय समुदायाचे दोन्ही देशांवर दडपण आले असण्याची शक्यता असली तरी घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, बळजबरीने पाणी प्यायला भाग पाडता येत नाही, या म्हणीप्रमाणे या दबावालाही मर्यादा असतात, हे लक्षात घ्यायला हवे. आतून इच्छा असेल तरच चर्चेच्या माध्यमातून उभय देशांमधले प्रश्न सोडवता येऊ शकतात. पुन्हा एकदा लाहोर आणि त्यापाठोपाठ आग्रा हे चर्चेचे टप्पे लगबगीने शक्य नसले तरी त्याथृष्टीने पावले टाकली जाऊ शकतात. इस्लामाबादच्या भेटीत त्याबाबत धोरण ठरवले जाऊ शकते. मुशर्रफ यांनी काश्मीरच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी सोडून द्यायची तयारी दाखवली, त्यापाठीमागेही एक कारण आहे. ते म्हणजे यासंबंधीच्या पाकिस्तानी दुराग्रहाला जागतिक पातळीवर मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, हे! संयुत्त* राष्ट्रसंघाच्या आमसभेत यावर्षी 20 नोव्हेंबरला पाकिस्तान पुरस्कृत स्वयंनिर्णयाचा ठराव 88 विरुद्ध 3 मतांनी संमत झाला. पण संयुत्त* राष्ट्रसंघाच्या 191 सदस्यांपैकी शंभर सदस्य राष्ट्रांनी या ठरावात तटस्थ राहायचे किवा मतदानात भाग न घ्यायचे ठरविल्याने पाकिस्तान ठराव जिकूनही एकाकी पडला. चीन- वगळता संयुत्त* राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे चारही सदस्य तटस्थ राहिले. हा ठराव काश्मीरचा उल्लेख करून पाकिस्तानकडून कधीच मांडला गेलेला नाही. याही खेपेला तसा तो नव्हता, तरी तो तोंडघशी पडला. आजपर्यंत दरवर्षी हा ठराव भारतासह सर्वांच्या संमतीने एकमताने संमत केला जात असे. त्यावर मतदानही घेतले जात नसे. जनतेला आणि देशांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असला पाहिजे, एवढी एकच मागणी पाकिस्तानकडून केली जात असे. पण याखेपेला अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानवर राजकारण घुसडल्याचा हेत्वारोप केला आणि त्यास पाकिस्तानी प्रतिनिधीला उत्तर देता येणे अवघड गेले. विशेष म्हणजे या ठरावावरील मतदानात अफगाणिस्तान, अमेरिकेच्या दडपणाखाली असणारा इराक, नेपाळ, मालदीव, तुर्कमेनिस्तान, उझ्बेकिस्तान यासारखे देशही गैरहजर राहिले. ब्रिटन, रशिया, प्र*ान्स, अमेरिका, इंडोनेशिया, उत्तर कोरिया, युगांडा आदींनी तटस्थ राहणे पसंत केले. मुशर्रफ यांनी घेतलेल्या सावध भूमिकेचे हेही एक कारण आहे.

मुशर्रफ यांनी काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरून आपले सैन्य काढून घ्यायची तयारी दाखवली आहे. भारताने काश्मीरमधून आपले सात लाखांवर सैनिक काढून घ्यावेत, ही त्यासाठीची त्यांची अट आहे. ती अर्थातच भारताला आताच मान्य करता येणे अवघड आहे. 1947 मध्ये पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या रूपाने पाकिस्तानी सैनिकांना पाठवून काश्मीरचा एक-तृतीयांश घास घेतल्यानंतर भारतीय सैन्य संपूर्णत: काश्मीरमधून काढून घ्यायची पाकिस्तानची मागणी मान्य करणे धोक्याचे ठरणार आहे. तथापि, मुशर्रफ यांनी सुचविलेल्या इतर चार मुद्द्यांना सकारात्मक उत्तर देता येणे भारताला शक्य आहे.

पाकिस्तानमध्ये असणाऱ्या 20 दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात द्यायची मागणी भारताने केली आणि तोपर्यंत आपले सैन्य मागे घेतले जाणार नाही, असेही जाहीर केले. पाकिस्तानने अर्थातच त्यास नकार देऊन पाकिस्तानच्या ताब्यात कोणीही भारतीय नागरिक नसल्याचे जाहीर केले. पाकिस्तानी नागरिकत्व असणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये असले तरी त्यांना भारताच्या हवाली करायचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा दावा पाकिस्तानी नेते सातत्याने करत राहिले आणि मग भारताने तोही मुद्दा सोडून दिला. आता राहता राहिला एकच मुद्दा- तो म्हणजे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा! पाकिस्तानने एकतर्फी शस्त्रसंधी जारी करून त्याचेही निराकरण करून टाकले आणि भारताला पाकिस्तानबरोबर चर्चा करायची आणखी एक संधी बहाल केली. वाजपेयींनी आता इस्लामाबादेत जाऊन पाकिस्तानी नेत्यांशी चर्चा करायला आपली हरकत नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे पुन्हा लंबक दुसऱ्या एका टोकाकडे जाऊन पोहोचला आहे. मुशर्रफ आणि वाजपेयी यांच्याकडून शांततेचे नोबेल पारितोषिक विभागून मिळवायचे प्रयत्न चालू आहेत किवा नाहीत, याची कल्पना नाही, परंतु या दोघा नेत्यांनी जर खरोखरच दक्षिण आशियात चिरस्थायी शांतता निर्माण केली तर त्यांना तेही सर्वोच्च पारितोषिक द्यायला कुणाची हरकत असायचे कारण नाही. पारितोषिकासाठी नव्हे, तरी या भागाच्या सुख, शांती, समृद्धीचा मार्ग चर्चेच्या माध्यमातूनच जातो यात शंका नाही.
पाकिस्तानी कवी अहमद राही याचे ‘गमगुसारी’ हे काव्य प्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो-

वक्त हर जख्म को, हर गम को
मिटा देता है।
वक्त के साथ ये सदमा भी गुजर जाएगा
और ये बातें जो दोहराई है मैने इस वक्त
तू भी इक रोज इन्ही बातों को दोहराएगा
दोस्त मायूस न हो।

थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस!

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..