नवीन लेखन...

वेगळा विदर्भ का?

वेगळा विदर्भ का?
हा कायमच चर्चेचा विषय आहे.
काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) – 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6%
तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.
तर आता तुम्हीच सांगा कि,
विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.
विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.
विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.
विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.
विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.
विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.
विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.
विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.
विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.
तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
कृपया तुम्हीच विचार करा.
आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे. फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.
म्हणून विदर्भाविषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा
जय विदर्भ

स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ

गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरुन स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणार्‍या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.

नागपूर करार

*विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही.हा एक प्रकारचा समझोताच होता. त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात (एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून) सामील करून घेण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते, त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता..*

इतिहास विदर्भाचा

*विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे. नागपूर ही मराठा राज्यसंघातील भोसले घराण्याची राजधानी होती. भोसल्यांचे राज्य जवळजवळ पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धातील पराभवानंतर भोसल्यांचा प्रभाव फक्त नागपूर विभागातच मर्यादित झाला. १८५३ मध्ये नागपूरच्या राजाचा म्रुत्यू झाला. त्यांच्यामागे कोणी वारस नसल्याने भोसल्यांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).*

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर आहे.

सन १८५३पर्यंत अमरावती आणि आसपासचा प्रदेश, ज्याला पूर्वी वर्‍हाड (बेरार) म्हणून ओळखले जायचे, तो हैदराबाद येथील निजामाच्या अंमलाखाली होता.. त्या वर्षी, निजामाचे अराजक बघून ब्रिटिश वसाहत अधिकरणाने या प्रदेशाचा प्रत्यक्ष ताबा घेतला. सन १९०३ मध्ये वर्‍हाड मध्य प्रांताला (सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस)ला जोडला गेला.

सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे मध्य प्रदेश म्हणून भारतातील एक राज्य झाले. सन १९५६ मध्ये, मराठी बोलल्या जाणार्‍या प्रदेशांच्या एकीकरणासाठी विदर्भ क्षेत्राचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. मुंबई इलाख्याचे सन १९६० मध्ये, भाषेच्या आधारावर महाराष्ट्र व गुजरात यामध्ये विभाजन करण्यात आले, आणि मराठी बोलणारा विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला. आता याच विदर्भाचे राज्य व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण त्यालाही विरोध होत आहे. त्यामुळे विरोधकांना काय साध्य होणार आहे.

जनार्दन गव्हाळे,
खामगाव, जिल्हा बुलढाणा, विदर्भ.

Avatar
About जनार्दन गव्हाळे 9 Articles
दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी देशोन्नती अकोला, लोकमत अकोला, दैनिक दिव्य मराठी अकोला येथे काम केलेले आहे. तसेच समतेचे आद्य प्रवर्तक गुरू रविदास हे पुस्तक पद्मश्री प्रकाशन सावदा जि. जळगाव ने प्रकाशित केलेले आहे. स्वतंत्र असा विषय लिहिण्यासाठी नसून चालू घडामोडीवर भाष्य करणे आवडते.

2 Comments on वेगळा विदर्भ का?

  1. आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र भारतात बराच प्रबळ आहे. महाराष्ट्राची ही ताकत काही राज्यांना, आणि बहुतांशी हिन्दी भाषिक प्रदेशांना बघवत नाही. वेगळा विदर्भ ह्या चळवळीला फूक उत्तरेकडूनच येते आणि बरीचशी सामान्य जनता ह्या कारस्थानाला बळी पडून रस्त्यावर उतरते. वेगळा विदर्भ हा बहुतांशी हिन्दी भाषिक आणि संधिखोर राजकारणी लोकांचा कट आहे. एकदा राज्याचं विभाजन झालं कि राजकर्णीय समीकरणं बदलतात ह्याच लोभाने महाराष्ट्राचे आणि मराठी भाषिकांचे लचके तोडण्याचा हा कट सामान्य जनता समजेल अशी मी आशा करतो. लोकं रस्त्यावर आले की महाराष्ट्राचे तुकडे पडतील – परंतु तुम्ही इतर नवीन विभक्त राज्यांच्या विकासदारकडे डोळे फाडून पाहू नाक. नवीन राज्यांना केंद्राकडून काही दिवस पैसे मिळतील, नवीन शासकीय इमारती बांधण्यात येतील – त्यात विकसदार दहा वर्ष वाढलेला दिसेल. परंतु जसा जसा काळ जाईल, तुम्हाला दिसेल की शेवटी विकसदार हा केवळ जीडीपी वरच अवलंबून असू शकतो आणि त्यासाठी एक सबळ अर्थव्यवस्था आणि राजकीय समर्थन/पाठबळ आवश्यक आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणे हा एक अंतर्गत “Divide and Rule” डावपेच आहे – ज्याचा वापर करून इंग्रज लोकांनी आपल्या देशाला दोनशे वर्ष गुलामीत ठेवलं. प्रिय विदर्भकरांनो – तुमच्या कानात विष ओतलं जात आहे – सावध रहा. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.

  2. namaskar sir mi veglya vidarbhababt rajkiy netyanchya matanche adhyan ha subject ghetala ahe mal aple article send karal

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..