नवीन लेखन...

विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज

हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने २,०००-२,५०० अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी नाग्रोटा येथे २६ जुलैला केला.पाकमध्ये, ३०-३५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे. पाकिस्तानने जो गोळीबार केला व दोन महिन्यांत अखनूर येथे दोन हल्ले झाले, त्याला पुरेसे प्रत्युत्तर देण्यात आले असे ते म्हणाले. त्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहेत.

गाझा हल्ल्यांचा आम्ही बदला घेऊ! १९९३ साली आम्हाला पकडण्यात तुम्हाला यश मिळाले. आता तुम्ही आम्हाला पकडून दाखवा, अशा धमकीचे पत्र पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना २६ जुलैला मिळाले .पत्राची सत्यता पडताळून पाहण्यात येत असून, शहरात हाय अॅलर्ट घोषित केला आहे. हिंदी आणी इंग्रजीत हे पत्र लिहिण्यात आले असून, पोस्टाद्वारे ते पोलिसांना मिळाले.ईद व आगामी सण पाहता शहरात सुरक्षा व्यवस्थाची काळजी घेण्यात येत आहे.
तरुणांवर होणारे स्लो पॉयझनिंगचे प्रयोग
पुण्यात ऐन वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासाचे आव्हान उभे असतानाच कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली. अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील १५ ते ३५ वर्षे वयोगटातील काही तरुण हरवले आहे. कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये ‘आय‌‌एसआय‌‌एस’ मध्ये कार्यरत असल्याची बाब त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर उघड झाली. यामुळे दहशतवादी तसेच कट्टर धर्मांध गटांकडून तरुणांवर होणारे स्लो पॉयझनिंगवर प्रकाश पडला. आता त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करावा लागेल. बेपत्ता तरुणांचा डेटाबेस तयार करून तो एनआयएकडे जमा करावा लागेल. गाझा पट्टीत सध्या रणधुमाळी सुरू आहे. तिथे एका भारतीयाला आपले प्राणही गमवावे लागले आहेत. आता पुढच्या दोन महिन्यात रमजानच्या पाठोपाठ गोपाळकाला, गणेश चतुर्थी यासारखे मोठमोठे सण येऊ घातले आहेत.
तामिळनाडू मधील दहशतवाद
तामिळनाडू मध्ये दर वर्षी नवीन आव्हाने येत आहेत. एखादे प्रकरण उघडकीस आले, तर दुसरे नंतर वाट पाहत असते. 1मे ला चेन्नई स्टेशनवर रेल्वेच्या S4 व S5 या डब्यांमध्ये बाँबस्फोट झाले. एप्रिल २०१३ मध्ये बंगळुरूच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर स्फोट झाले. मार्च २००० मध्ये तामिळनाडूच्या लिबरेशन आर्मीने कडालूर या स्टेशनजवळील रेल्वे मार्गावर बाँबस्फोट घडवून आणला.
पाकिस्तानच्या आय.एस.आय. (इंटर-सर्व्हिसेस-इंटेलिजन्स, कुप्रसिद्ध गुप्तवार्ता-संस्था) ने भारतात घातपाती कारवाया करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. आजपर्यंत नेपाळ, बिहारमार्गे आपले लोक भारतात घुसवून बाँबस्फोट, गाडया पाडणे अशा घातपाती कारवाया घडवून आणीत. मुख्यत: मुंबई, दिल्ली, पाटणा, बनारस या शहरात हे स्फोट घडवून आणले जात.आता आय.एस.आय.चे श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीचा उपयोग करून तामिळनाडूभर त्यांचे जाळे पसरण्याचे उद्योग चालू आहेत.
थामिम अन्सारी, तिरुची या लहान गावातील एक व्यापारी बाँबस्फोट घडवून आणण्याकरिता रेकी करताना पकडला गेला. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला सोडण्यात आले. आता ‘National Investing Agency’ ने त्यावर खटला भरला आहे. त्याच सुमारास श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीत काम करणार्‍या आय.एस.आय.च्या अधिकार्‍याने या अन्सारीचा उपयोग करून घेतला.
त्यात वेलिंग्टनमधील मद्रास रेजिमेंटल सेंटर, नागिपट्टणमधील तटरक्षक दलाच्या व नौदलाच्या इमारती, अंदमानवर पोर्ट ब्लेअर येथील सैनिकी ठाणी, विशाखापट्टणम येथे नौदल केंद्र व कोईमतूर येथील सुलूर हवाई दलाचे केंद्र सामिल आहे. २०१२ मध्ये तिरुची येथे अन्सारीला अटक झाली. तामिळनाडू पोलिसांनी आपल्या आरोपपत्रिकेत पाकिस्तानी वकिलातीतील अधिकार्‍याचे नाव दाखल केले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला एक अतिरेकी हुसेन भारतात येऊन त्याने चेन्नईतील व बंगळुरूमधील अमेरिकन वकिलातींचे अनेक फोटो घेतले. यानंतर मार्चमध्ये हुसेनला श्रीलंकेतील मन्नारच्या समुद्रकिनारपट्टीवरून दोन इसमांनी भारतात आणले. त्याच वेळेस भारतात घातपाती कारवाया करण्याकरिता व्यवस्था करण्याच्या सूचना त्याला मिळाल्या. त्याने क्वालालंपुरमधील श्रीलंकेच्या महम्मद हुस्नीशी संगनमत केले. ते बंगळुरूला इस्राइलच्या वकिलातीवर घातपात करणार होते.
बनावट नोटांचा सुळसुळाट
पाकिस्तान आपल्या हस्तकांकरवी गेली कित्येक वर्षे भारतात खोटे चलन पाठवत आहे. या खोटया नोटा भारतीय नोटांची हुबेहूब प्रतिकृती आहे. या नोटा मालदीव व श्रीलंकेहून भारतात पाठवल्या जातात. त्या घातपात करण्याकरिता उपयोगात आणल्या जातात. चेन्नईमधील मन्नाडी भाग हा या दृष्टीने सुरक्षित आहे. या ठिकाणी ही पार्सले आणली जातात आणि पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. बांगला देशमध्ये याचा उगम झाला. या बनावट नोटा चितगावमध्ये बंद पेटयातून पाठवल्या जात व तेथून घुसखोरांमार्फत पाठवल्या जात. गुप्तहेरांच्या म्हणण्यानुसार कराचीजवळ पाकिस्तानचा या खोटया नोटांचा कारखाना असून तो आधुनिक मशीनरीने सज्ज आहे. हेरखात्याने 2013 मध्ये लष्करे तोयबाच्या बाँब बनवणार्‍या अब्दुल करीम तुंडा या अतिरेक्यास पकडले असता, त्यानेही त्यास दुजोरा दिला.ही सर्व पार्सले नेपाळहून प.बंगाल, व पूर्वांचलमध्ये येतात व तेथून पुढील प्रवास चालू होतो.
एप्रिलमध्ये हुसेनला चेन्नई येथे अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्याबरोबर बनावट नोटांचे दोन तज्ज्ञ – सिब्बवालन श्रीलंकेतील तामिळी, महम्मद सलीम भारतीय नागरिक – यांनासुध्दा अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ जवळजवळ अडीच लाखांचे चलन मिळाले.
बांगला देशमधून बनावट नोटांचे प्रसारण अजून चालूच आहे. आतापर्यंत तामिळनाडू पोलिसांनी बर्‍याच प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ४ जूनला राहुल हमीद आणि रफीककडून ९ लाख रु.च्या नोटा जप्त करण्यात आल्या. प्रमुख सूत्रधार फखरूल इस्माईल याला १० जूनला बंगालमधून अटक करण्यात आली. मालदीव व श्रीलंका येथून याचा उगम असल्याचे सिध्द झाले आहे. मालदीवमधून होणारी बनावट नोटांची तस्करी शस्त्रास्त्रे व दारूगोळाही भारताला आव्हान देणारा आहे.
आय.एस.आय. वर नियंत्रण करा
आय.एस.आय.चे लक्ष्य नव्या अतिरेक्यांचा भारतामध्ये शिरकाव करणे, जिहादी उद्दिष्टांकरता त्यांना सुसज्ज करणे, भडक विचारांच्या, दंगाग्रस्त भागातील मुस्लिम तरूणांना अतिरेकी जाळ्यात समाविष्ट करणे, कोट्यावधी रुपयांच्या खोट्या नोटांचे मुद्रण करणे, आय.एस.आय.च्या प्रतिनिधींना भारताच्या प्रत्येक भागांत पेरणे आणि मुस्लिमबहुल क्षेत्रांत घुसखोरीसदृश परिस्थिती निर्माण करणे व नविनतर आघाड्या उघडणे, तुरूंगांतून शिक्षा भोगत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना अतिरेकी बनवणे राहिले आहे.
बांगला देशमधील भारतविरोधी कारवाया उघडकीस आल्यानंतर आता मालदीवमध्ये व श्रीलंकेत नवी केंद्रस्थाने स्थापन करण्यात आली आहेत. भारतात अस्थिरता निर्माण करण्याकरिता श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीतून हे सर्व होत आहे.
सणांच्या दरम्यान घातपात होऊ नये म्हणून डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. देशभरात किंवा जगभरात काहीही झाले की त्याचे पडसाद देशात उमटतात! समाजकंटक आणि दहशतवादी देशाला लक्ष्य करतात.
आखाती देशांत कामे करणार्‍या दक्षिण भारतीय लोकांना विद्रोहासाठी प्रवृत्त केले जात आहे. आय.एस.आय. भारतातील दहशतवादी कारवायांचे संपूर्ण सहसंयोजन करत आहे. आय.एस.आय. नावाचा राक्षस नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो काय? राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि मतपेटीचे राजकारण दूर ठेवल्यास त्याला ताळ्यावर आणणे शक्य आहे.
अशा प्रकारची धमकी आल्यानंतर, त्याची सत्यता किती आहे, हे तपासण्यापेक्षा अप्रिय घटना कशा रोखल्या जातील, यासाठी सरकारने प्रयास करायला हवेत. एक गोष्ट निश्चित – पाकिस्तानात कुठलेही सरकार आले तरी आय.एस.आय. व सेनेतील अधिकारी भारताविरुध्द कारवाया चालूच ठेवणार आहेत. मागच्या सरकारच्या गाफीलपणाने भारतात बाँबस्फोटात, असंख्य लोक मरण पावले. लाखो बनावट नोटा भारतात आल्या व अजून येत आहेत. मोदी सरकार या बाबतीत लक्ष घालून याला वेसण घालेल, अशी आशा करू या.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..