नवीन लेखन...

विपश्यनेचा योगायोग

पुण्यात राहात असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या विपश्‍यना केंद्राची पाटी अनेक वेळा पाहिली होती. पण मनात असूनही कधी चौकशी केली नव्हती.

पुढे बघू…आत्ता काय घाई आहे, या नावाखाली मनातली उत्सुकता पूर्णपणे दडून गेली. पण अमेरीकेत सहा महिन्यांसाठी मुलाकडे आल्यावर मात्र असा योग आला की…

अमेरिकेत आल्यावर लांबच्या, जवळ्च्या, स्थळांना मुलाच्या-सुनेच्या सवडीप्रमाणे भेटी देत होतो. संपूर्ण हिरवागार परिसर… उंच उंच झाडी, त्यात लपलेले मोठे – लांब लांब जाणारे रस्ते, त्यावरुन प्रचंड वेगाने जाणाऱ्या मोटारी color=#0000ff size=5>, व कधीही न थांबणारी वाहतूक…आपल्याकडे दिवाळीत असते त्याप्रमाणे प्रसन्न हवामान… ह्यामुळे दिवस मजेत जात होते. एक दिवस सचिनचा – भाच्याचा फोन आला, तो टेक्सास राज्यात डलासला राहतो. त्याने विपशनाचा कोर्स बद्द्ल

सांगितले व अमेरिकेत विपशनाची अनेक केंद्रे आहेत, व सदर कोर्स इथेच केल्याचे सांगितले, झाले… पुनः मनात दडवून ठेवलेली उत्सुकता जागी झाली. शेवटी वेबवर जाऊन माहिती काढली. अमेरिकेत- आमच्या राज्यात

म्हणजे मॅसेच्युसेटस् मधेच सेलबर्न मध्ये विपशना केंद्र असल्याचे समजले. ऑनलाईन अर्ज केला. पण ऑगस्ट महिन्यात माझा नंबर लागला नाही म्हणून यांनाही त्यांचा लागलेला नंबर रद्द करावा लागला. सप्टेंबरच्या कोर्ससाठी

अर्ज दिला, व एकदाचा दोघांचा नंबर लागला. ३ सप्टे.ते १४सप्टे.२००८ असा दहा दिवसाच्या कोर्ससाठी आम्हा दोघांना तेथे सोडून मुलगा व सून परत गेले, म्हणजे लॅनकॅस्टरला रवाना झाले.

पहिल्या दिवशी संध्याकाळी सर्व साधकांना विपश्यनेची माहिती व दिवसाच्या कार्यक्रमासंबधी सूचना देण्यात आल्या. व दिवसातून १६ तासाच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक मिळाले. सकाळी ४ वाजता उठल्यापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत ठासून भरलेला कार्यक्रम होता. पण कोर्सला आल्यावर मधेच कोर्स सोडता येणार नाही. असे अर्जात भरुन घेतले होते. शिवाय १० दिवस मौनव्रत, अजिबात बोलता येणार नाही, मोबाईलपण

बाळगता येणार नाही, टिव्ही नाही, पुस्तकही नाही, कुणाशीही बोलायचे नाही, खाणाखुणासुध्दा करायच्या नाही, एकमेकांना स्पर्श करायचा नाही, हजर झालेल्या दिवशी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत विपशनाबद्दल श्री. गोयंका यांची टे ऎकवण्यात आली.

पहिल्या दिवशी सकाळी ४ वाजता मंदिरात वाजते त्याप्रमाणे घंटेचा नाद झाला, त्याबरोबरच खरोखरच एव्हढ्या सकाळी जाग आली, प्रातःविधी व स्नान आटोपून ४.३० ला मेडिटेशनहॉलमधे दाखल झाले, मंद दिव्याच्या प्रकाशात अत्यंत शांतता असलेल्या हॉलमधे नेमून दिलेल्या जागेवर योग्य वाटतील अशा उशा, आसने घेउन बसले. आणि आमची विपश्यनेची पहिली पहाट सुरु झाली, घनगंभीर आवाजात पाली भाषेत प्रार्थनेचे स्वर ऐकू आले. शांतपणे डोळे मिटून, मनातील विचार बाजूला सारुन, निर्विकारपणानं मनात कुठलाही विचार न करता स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. त्यात सुरवातीला केवळ श्वासावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत अशा अवस्थेत बसल्यानंतर ना श्त्याची घंटा वाजली. पुःन्हा ८ वाजता हॉलमधे वरील साधनेची

उजळणी करुन घेण्यास सुरवात झाली. कुणीही एक शब्दही बोलत नव्ह्ते. अत्यंत शांत अशा वातावरणात मनाचा असा अभ्यास सुरु झाला. सकाळी दोन तासात किती व मनकिती एकाग्र झाले ते कुणीही सांगू शकणार नव्ह्ते. बैठक-मांडी

घालून बसल्यानेव सवय नसल्याने पाय दुखत होते, सकाळ्चा नाश्ता जरा बऱ्यापौकी झाल्याने – डुलकी येणे साहजिकच होते.- तशी हॉलमधे शांतता होती. कधी मधूनच मांडी बदलण्याची बैठ्क बदललेल्याची हालचाल व आवाज येत होते . कुणीतरी मधूनच खोकत ह्या शांततेचा भंग करत होते. पुःन्हा पाली भाषेत गंभीर पण शांत स्वरात शब्द कानावर पडत होते.- ते आम्हांला समजत होते. व त्यामुळे होणारा पायांना त्रास कमी झाल्याचा भास होत होता.

दुपारचे अकरा केंव्हा वाजले कळलेच नाही. जेवणाची घंटा झाली. नाश्त्याप्रमाणे जेवणाची सोयही बायकांची पुरुषांची वेगवेगळ्या ठिकाणी केली होती. जेवणांत सर्व पदार्थ शाकाहारी होते. अनेक पदार्थ असल्याने सर्वाच्यां आवडीनिवडी

राखण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. त्यानंतर एका तासाची विश्रांती होती. त्यानंतर पुनः साधना – ५ वाजता चहाची सुट्टी झाली. यावेळी दूध-चहा- काॅफी/फळे ठेवलेली होती. संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत साधना त्यानंतर भाषावार प्रवचने-इंग्लिश-रशियन- हिंदी- स्पॉनिश माध्यामांच्या साधकांची वेगवेगळी सोय करण्यात आलेली होती. ह्या एक ते दीड तासात व्हिडीओवरुन गोयंका यांचे १ल्यादिवसाचे प्रवचन दाखवण्यात व ऎकविण्यात आले.

२५०० वर्षापुर्वी भारतात वैभवावर असलेली ही विपश्यनेची विद्या जवळजवळ नाहीशी झाली.व तीचे पुर्नःजीवन करण्यासाठी तसेच मानवाला राग-लोभ-द्वेष या विकारापासून मुक्त करण्यासाठी व शांतता- प्रेम-बंधुभाव-यांची जोपासना होण्यासाठी विपशना कशी उपयोगी आहे.हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अनेक उदाहरणे देउन स्पष्ठ केले. या बरोबरच-मन-एकाग्र करण्यासाठी शांतता-मौनव्रत- शाकाहार व्रतस्थ-वृती यांची आवश्यकता कशी आहे. हे स्पष्ठ केले. त्यानंतर पुःन ८.३०ते ९ पर्यंत साधना करण्यास मेडिटेशन हॉलमधे जाउन बसले. ९ वाजता रुममधे जाउन पलंगावर अंग टाकले. कधी डोळा लागल कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी आपोआप ४ वाजता जाग आली. सदर साधनेत १०-१५ इंडियन -अमेरिकन-स्पॅनिश-चिनी- आफ्रिकन असे सर्वजण स्री- पुरुष मिळून साधारण १५० साधक सहभागी होते. २०-२५ वर्षाच्या वयाचे तरुणापासून ६५

वर्षाच्या व्रुध्दापर्यंत सर्व सहभागी होते. सर्व एकमेकांना पहात होते. पण मौन-व्रत अत्यंत काटेकोरपणे पाळत होते. विश्रांतीच्या वेळेत पुरुष त्यांना दिलेल्या जागेतच फिरत होते. स्रिया त्यांच्या जागेतच फिरत होत्या. ३-४ जोड्पी सदर साधना शिबीरात होते. पण एकमेकांचे तोंडही त्यांना १० दिवस दिसत नव्ह्ते. किंवा तसा कोणी प्रयत्न करत नव्ह्ते. स्रियांनी दंड-गुढगे झाकले जातील असेच कपडे घालायला पाहिजेत अशी एक अट होती. मेडीटेशन हॉलमधे (साधना-मंदिरच) शब्द योग्य आहे. स्वच्छ -शांत

मंद प्रकाशाचे दिवे होते. समोरच्या स्टेजवर टिच्रर- गुरु व स्रियांसाठी गुरुमां असे शांत चेहेयाचे दोघे अमेरिकन गुरु बसले होते. मनात विचार चमकून गेला की २५०० वर्षापासूनची पुराणी-विद्द्या, भारतीय विद्या भारतीयांना अमेरिकेत येवून गो- याकडुन एसी हॉलमध्ये लोड-तक्या घेउन शिकावी लागते. हा कसा योगायोग आहे. पण दुस-या क्षणी त्या गुरुंच्या जागी ॠषीतुल्य- शुभ्रदा्ढी वाढवलेले डोक्यावर जटा-बांधलेले पांढरे शुभ्र वस्र परिधान केलेल्या भारतीय ॠषिमुनींची मूर्ती उभी राहिली आणि ह्या अमेरिकन गुरु व गुरुमांच्या बद्द्ल मनांत प्रचंड आदर निर्माण झाला. गुर्रुदेवोभवो. गुरु सर्वत्वे पुज्जंते !

अशा भारावलेल्या वातावरणांत अशी साधना पुढे चालू होती. दिवसेंदिवस मनाविषयी ज्या पध्द्तीने आपण कधीच विचार केला नाही त्याचा अभ्यास सुरु झाला. माणसाचे मन फार फार महत्वाचे आहे. त्याने मनावर घेतले तर म्हणजे मनाने मनावर घेतले तर, मनुष्य विकार-रहित होऊ शकतो. मनावर आघात करणारे विकार राग-लोभ-द्वेष-आनंद- दुःख-सुख हे सर्व विकार आहेत त्यांना ताब्यात ठेवता यावे म्हणून मन ताब्यात पाहीजे. आपण आपल्या मनाच्या बाबत कधी विचारच केला नाही. एकाग्र होऊन बसलोच नाही— हळूह्ळू आपण मनाला विचार- रहित करु शकू असे वाटू लागले. ३ रा-४ था दिवस असेल वाटत होते. आपले मन स्थिर होत आहे. पण छेः,एका क्षणांत ते हुलकावणी देऊन दुर गेलेले असायचे पुःन्हा कसेतरी करुन, धरुन आणले तर क्षणांत दूर पळून जायचे. एखाद्या मदा-याचे खेळ करणारे माकड त्याच्याकडुन सुटून य़ा झाडावरुन त्या झाडावर पळून जाते, त्याच्या हातात येतच नाही तशी गत झालेली असायची. मला तर नक्की वाटते या जगांत नव्हे या विश्वांत कुणाचा वेग जास्त असेल तर तो मनाचा…सर्वापेक्षा जलद , घडीत येथे तर दुस-याक्षणी माझ्या सिंहगड-रोड-च्या पुण्याच्या घरी तर कधी भुतकाळात घड्लेल्या घटनाकडे बरे साधे नाही त्या त्या प्रसंगाचे स्थळाचे- काळचे चित्ररुप मनःचक्षुं समोर साकारुन क्षणात जुन्या मैत्रिणीच्या वहीतील क्षराकडे तर क्षणात नातीच्या बोबड्या बोलाकडे किती प्रचंड -वेग! कधी जुना प्रसंग आठ्वून क्रोधित होणारे, कधी आनंदाचा प्रसंग आठ्वून आनंदीत होणारे मन – आपलेच,पण आपल्याला न कळलेलं… वर्तमानात काय आहे- या क्षणी काय आहे यावर नियंत्रण न ठेवणारे असे मन कसा आवर घालणार अन कसे निर्विकार करणार?

गोयंका यांनी रोजच्या प्रवचनातून हळूह्ळू मन कसे एकाग्र करता येईल या बाबत खूपच छान व सोपे करुन सांगितले. प्रथम-प्रथम केवळ मनाचे लक्ष श्वास कसा येतो व जातो याकडे यावर स्थिर करावयाचे २/३ दिवस याचीच साधना करावयाची व नंतर मन पुरेसे सूक्ष्म झाल्यावर आपण त्याच्यामाध्यमाने आपल्या शरीरावर विकारांचे होणारे दृश्य व सुप्त परिणाम स्थितप्रज्ञ होऊन जोखावयाचे व विश्वांत ज्याप्रमाणे उत्पत्ति -हास -पुनः उत्पत्ति -हास- असे चक्र चालू आहे त्याची जाणीव मनाला करुन द्यावयाची जेणे करुन दु:ख सुख हे त्या त्या विकांराची उत्पत्ती करतात.पण ते सर्व अनिश्चल आहे. निश्चल नाही- हे समजावयाचे,तसे वाचून हे सोपे वाटते,पण यावर अमंल करणे कठीण आहे—–पण अशक्य नाही.

या मनाच्या शिक्षणाचे धडे रोज घेत होते.मौनाचे धडे चालू होते . काही प्रश्नांची उत्तरे मन स्वतःहूनच देत होते. -तर काही प्रश्न तेच निर्माण करुन गोंधळ करत होते. गोयंकाच्यां रोजच्या ध्वनी-दृष्य -प्रवचनांमुळे १-१-३० तास रोज मनाला -पर्यायाने स्वताःला नव्या ज्ञानाची मेजवानी मिळत होती. अडीअडचणीच्यावेळी गुरुजी धावुन येत होते. बाहेरचे

वातावरण ३-४ दिवस अतिशय उत्तम होते.नंतर भरपूर पाऊस सुरु झाला. सूर्यदर्शन होईना.—-मनावर वेगळे दड्पण येत होते. बाहेरचे वातावरणही मनावर संस्कार करत होते तर! शेवटचे २ दिवस उरले — मन एकाग्र करण्यात थोड्यावेळ का होईना यश येत आहे असे वाटू लागले .–साधनेत ८व्या दिवशी नवीन भर पडली. आपल्या मनाने आपल्यातच अंर्तबाह्य स्पर्श करुन एकाग्र करण्याची व विकारावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरु झाला.विपशनाच्या

साधनेत १ तासभर न हालचाल करता स्तब्ध बसता येऊ लागले. साधना मंदिरात साधकांची समाधी लागू लागली. आवाज, खोकणे, पायांचे दुखणे, कंटाळा, झोप सारे कुठे पळून गेले? ते कळलेच नाही. आयुष्यभर जमिनीवर न बसलेले अमेरिकन स्त्री-पुरुष ह्या साधनामंदीरात आनंदाने — कुठ्ल्यातरी ओढीने -तासनतास शांतपणे बसू लागले होते.

ध्यानमंदीर खरोखरच शांत- शांत झालेले दिसून येवू लागले. जेवण सुध्दां आपोआप कमी झाले. ठरल्यावेळी आपोआप जाग येऊ लागली. दिवसाचे १६ तास कसे संपत होते. कळत नव्ह्ते. ९ व्या दिवसाच्या प्रवचनांत, उद्या मौन संपेल व पाच मिनिटांची वेगळी प्रार्थना (अर्थात मुकपणे) होईल असे सांगितले.-तसेच एक मह्त्वाची गोष्ट सांगितली की –

जरी जग हे नश्वर असले, जन्म /मरण हा फेरा असला, काहीही निश्चिंत नसले, तरी सुध्दा जग हे फार सुंदर आहे! प्रत्येकाच्या जन्मांचे काहीतरी कारण आहे. त्यामुळे ह्या जन्मा चा आपण उपभोग घेतला पाहीजे .प्रपंचात राहुन सुध्दा आपण आपला राग-लोभ-मद-मत्सर यांचा त्याग करुन शांती- प्रेम-आनंद- समाधान बंधुभाव -निर्माण करुन प्रसन्नपने जगले पाहीजे.

१० व्या दिवशी सकाळ्च्या साधने नंतर मौन संपले—-एवढ्या दिवस एकमेकांकडे नुसते निर्विकारपणे बघणारे हे माणुस नावाचे प्राणी -त्यांचा प्रत्येकाचा पुर्नजन्म झाल्यासारखे वाटत होते. सर्व आसमंतात आनंद- भरुन राहीला होता.एकामेकांविषयी सर्वाच्या मनांत केवळ प्रेमाची भावना चेह-यावर स्पष्ट दिसून येत होती. घरचे एखादे मोठे आनंदाचे कार्य संपल्यावर घरच्या प्रमुखाचे मन जसे काही होते.तसे भाव सर्वांच्या चेहे-यावर होते– नव्हे मनांतही होते. एकामेकांविषयी एवढा आदर तर मी आयुष्यात प्रथमच बघत होते–इतके मन स्वच्छ झाले होते. काय बोलावे अन किती काही कळत नव्ह्ते त्यानंतरच्या साधनेत ही विपश्यना केलेली, शांती-प्रेम-आदर-समाधान-आनंद मिळाले त्यात सर्वांना पृथ्वीवरील, आकाशांतील, पाण्यातील, प्राणीमात्रांना सामावून घेत आहे. त्यांना सहभागी करीत आहे-.अशी प्रार्थना होती-आपल्या आनंदात सर्वांना-सहभागी करुन घेतल्याची भावना किती सुखावणारी-होती. गोयंका गुरुजीनीही त्यांची-गुरु- दक्षिणा-हीच मागितली होती.ह्या सर्व प्राणीमात्रांत मी सुध्दा आलो.त्यामुळे ही मिळ्णारी माझी गुरुदक्षिणाच आहे. असे त्यांनी प्रव नात सांगितले होते. शिबीराच्या ११ व्या दिवशी सकाळी घराकडे परत फिरावयाचे होते सर्वांना त्यांच्या रुम साफ करायच्या होत्या त्या सर्वानी अगोदरच केल्या होत्या. आवार,व्हरांडा,स्वंयपाकघर,रुमच्या समोरचा पॅसेज साधकांनी स्वच्छ केले.—पण खरे तर सूचना न देता सुध्दा साधकांना मनाने केले असते -कारण पुढे येणा-या साधकांसाठी तयारी करावयाची होती. मागच्या साधकांनी आमच्यासाठी रुम-एकदम स्वच्छ करुन दिल्या होत्या.तसेच आमच्या राहण्याचा/ खाण्याचा /बाकीच्या गोष्टी साठी- लाईट- पाणी-इत्यादी -चा खर्च हा मागच्या-शिबीराच्या साधकांनी देणगी देवून केला होता. तेथे सर् व गोष्टी आम्हांला मोफत होत्या.-त्
ातही एक तत्व होते -माझा खाण्याचा (भिक्षेचा)

खर्च दुस-याने केला होता.त्यात माझा’मी’ गळुन गेला. जोपर्यंत हा ‘मी’ (आय) स्वतः मनात भरुन आहे.तो पर्यंत राग-लोभ ह्या षङरिपुनां मनात मुक्त प्रवेश आहे. एकदा का हा ‘मी’ माझ्यातुन गेला की उपासना सोपीच की …तर

पुढ्च्या साधकांना काहीतरी मिळावे यासाठी देणगी स्वखुशीने देण्याचे होते.त्याला कुणाचाही विरोध नव्हताच! सर्व साधक एकमेकांचा निरोप घेत होते.गुरु गृहातून स्वग्रृही जाणा- या पुर्वीच्या शिष्यांची आठ्वण झाली. त्यांच्या आमच्या भावनात फरक नसावाच ज्यांची स्वतःची गाडी नव्ह्ती त्यांना दुसरे लिफ्ट देत होते .रस्ता वाकडा करुन सुध्दा- थोडा चक्कर पडणार होता तरीही — सर्वांच्या डोळ्यांत कृतकृत्याची भावना दिसत होती.

; योगु-लिनु आम्हांला घेण्यासाठी गाडी घेऊन आले. आणि या शिबीरातून…आश्रमातून —बाहेर पडलो. पुर्नजन्म झाल्यासारखे… १० दिवसाच्या सोन्याच्या जन्मभराच्या आठवणी मनांत घेऊन.

हल्लीच्या ह्या धकाधकीच्या ,जिवघेण्या ,स्पर्धेच्या ,आर्थिक चढउताराच्या काळांत माणूस किती अगतिक झाला आहे.एका प्रचंड मानसिक दडपण खाली जगतो आहे, आयटीच्या युगात – सर्वच अस्थिर -अनिश्चिंत आहे, त्याचीच भिती

माणसाला वाटत असते.असा ताण सहन करण्याची ताकद संपली की जीवनच संपविण्याची इच्छा प्रबळ होत जाते! शांतता लाभावी -मन स्थिर रहावे यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे पडतात.कित्तेक शिक्षित चांगल्या उत्तम पगाराच्या,

चांगली कौंटुबिक पार्श्वभुमी असलेल्या तरुणांच्या मनांत असुरक्षिततेचे विचार झटकन येतात -त्यांना हाकलून लावण्याची ताकद त्यांच्यात-त्यांच्यामनांत नसते. हाव-हव्यास मानगुटी सोडत नाही, यापुढे या पुढे–यापेक्षा मोठे — यापेक्षा मोठे–सुख आणखी सुख आणखी पैसा पर्यायाने पैसा पैसा —आणखी पैसा हा विचार सारखा घोळत असल्याने असलेला सुखाचा ‘हा’ क्षण वर्तमान काळातला क्षण -वाया घालवुन छातीफूटे पर्यंत धावत असतो. ह्या नावाखाली नैराश्याचा झटकाआला कि सारे संपले .”जग फार सुंदर आहे”. याचाही विसर पडतो.आणि आत्महत्येत पर्यावसन होउन मागे उरलेल या स्वकियांना वा-यावरसोडुन स्वतः निघुन जातो. अशा काळात – ‘विपश्यना’ हा मार्गदर्शक –अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार–वाटाड्या नक्की ठरु शकणार आहे.

ह्या’अनिंश्चल काळात- मार्ग नक्कीच निश्चल ठरु शकतो.मोठ-मोठ्या कंपनीत कारखान्यात , ताणतणावाचे काम करणा-या व्यक्तींसाठी आणि सर्वा-साठीच ही साधना अम्रुत ठरु शकते. याबाबत भारतातील उद्योगपती -आयटीतील वरिष्ट आघिकारी यांनी आपल्या कक्षेतील कर्मच्या-यांना, आघि-का-यांना ‘ ह्या’ विपसनेच्या कोर्सला नक्की पाठवावे. त्याबाबतचा खर्च /रजा त्या त्या संबधात उद्योगाने करावा. त्यात त्यांचाही दीर्धकालीन फायद आहे.

तेरा मंगल तेरा मंगल—-तेरा— मंगल —हो—य—रे !!!.

— रजनी पवार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..