नवीन लेखन...

वार्धक्यातील काळजी

वयाच्या ६० ते ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींची गणना वृद्ध अशी होते. वृद्ध व्यक्ती सगळ्या सारख्या नसतात. प्रसिद्ध जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्काव्ह यांनी म्हटलेले आहे, की Man is as old as his arteries. म्हणजे माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्यास वृद्ध तितका तो वृद्ध असतो. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला रक्त नेणाऱ्या रोहिण्यांची स्थिती त्या-त्या अवयवाची कार्यक्षमता ठरविते. सगळेच अवयव महत्त्वाचे खरे; पण त्यातल्या माणसाचा मेंदू, त्याचे नेत्रपटल, त्याचे हृदय, मूत्रपिंडे आणि पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या स्थितीकडे अधिक कसोशीने पाहिले जाते. वार्धक्याचतील आजारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी अनेक अवयवांत दोष निर्माण होतात. शिवाय आजारांचे स्वरूप तरुण व्यक्तींच्या आजारापेक्षा वेगळे असू शकते. म्हणजे न्यूमोनिया, टॉयफॉइड अशा आजारात लहान वयात ताप येणे हे एक प्रमुख लक्षण असते; तर वृद्ध व्यक्तींना अशा इन्फेक्टि्व्ह आजारांतसुद्धा ताप नसेलही. मात्र विकारसदृश प्रत्येक दोषाचा खोलात जाऊन तपास करणे किंवा त्यावर उपचार करणे आवश्य्क नसते. उदाहरणार्थ एखादा शब्द न आठवणे, व्यक्तीचे, स्थळाचे नाव न आठवणे अशा गोष्टी म्हणजे मेंदूला विस्मृतीचा विकार जडला आहे असा अर्थ नसतो. वार्धक्यात एक महत्त्वाचा भाग ‘दुबळेपणा’चा असतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अवयवांच्या कार्यक्षमतेत झालेली घट म्हणजे दुबळेपणा. दीर्घकाळ चालू असणारे दाह, स्नायूंच्या आकारमानात आणि शक्तीत झालेली घट, मज्जासंस्था आणि अंतर्ग्रंथींच्या संस्थेच्या कार्यातील कमजोरी यामुळे शरीराच्या विविध संस्था दुबळ्या व्यक्तींमध्ये तणाव सहन करू शकत नाहीत. अशा दुबळ्या वृद्ध व्यक्तींमध्ये सर्व संस्थांचे कार्य झपाट्याने घटते व मृत्यू ओढवतो. दुबळेपणा मोजता येत नाही; पण चाल संथावते, हाताच्या पकडीतील बळ कमी होते, वजन कमी होते, ऊर्जेचा वापर खालावतो आणि आकलन किंवा समजशक्ती संथावते. असे दुबळेपण दुरुस्त करण्यासाठी निश्चिपत उपाय सापडलेले नाहीत. योग्य प्रमाणात हालचाल करणे आणि थकवा किंवा वेदना टाळणे महत्त्वाचे असते. सकस परंतु पचेल असा आहार आवश्यक असतो. मनाची प्रसन्नता आणि अनुरंजता उपयुक्त ठरते. भविष्याबद्दल आशादायक भावना आणि विचार करता उत्तेजक परिसर असावा. सत्‌-श्रद्धा जोपासावी. डॉक्टर आणि परिचारिका, शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींची वृत्ती सहानुभूतिपूर्वक आश्वासक असावी.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..