नवीन लेखन...

लाळेतील औषधी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

एक घास बत्तीसवेळा चावून खावा असा उपदेश सर्वच वडील मंडळी मुलांना करत असतात. पण स्वतः मात्र अनेकदा हा नियम पाळत नाहीत असे निदर्शनास येते. आपल्या लहानपणी सांगितलेला उपदेश मुलांना पास ऑन करण्यापलीकडे ह्या विषयाला फारसे महत्व दिले जात नाही. अन्न सावकाश चावून खाण्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नेमके काय फायदे होतात हे समजून घेणे गरजेचे आहे.

१) अन्न चावण्यासाठी पुरेसा वेळ देण्यामुळे त्यात मुबलक प्रमाणात लाळ मिसळली जाते. लाळेमध्ये अनेक पाचक रसायने असतात. ह्या रसायनांचा सहभाग पचनाच्या पुढच्या टप्प्यात महत्त्वाचा असतो. लाळेतील रसायने क्षारीय गुणांची असतात. जठरातील अम्लता नियंत्रण करण्यासाठी या क्षारीय रसायनांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून घाईघाईने जेवण करणाऱ्यांना कायमस्वरूपी अम्लापित्ताचा त्रास होतो.

२) मुखभागातील रोगांना कारणीभूत असणाऱ्या जंतूंची वाढ होऊ नये म्हणून लाळेत काही विशिष्ट रसायने निसर्गाने निर्माण केली आहेत. म्हणून तोंड कोरडे राहिले तर अशा जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो आणि मुखरोगांची पायाभरणी होऊ लागते. शिवाय दातांच्या मजबुतीसाठी लाळेची नितांत आवश्यकता असते. मुखभागातील अम्लता वाढल्याने दातांवरील एनॅमल कमजोर होते, हिरड्यांना सूज येते व दातांचे स्थैर्य धोक्यात येते.

३) कोलेस्टेरॉलबद्दल अनेकांच्या मनात मोठी भीती बसलेली आहे. म्हणून त्याविषयी थोडा अधिक खुलासा. प्रथम कोलेस्टेरॉल शब्दाचा उगम कसा झला हे पाहूया. कोलेस्टेरॉल हा शब्द Chole आणि Steros अशा दोन ग्रीक शब्दांचा जोडशब्द आहे. पैकी Chole म्हणजे पित्त आणि Steros म्हणजे घन. थोडक्यात कोलेस्टेरॉल म्हणजे घन किंवा घट्ट झालेले पित्त. ह्यातील रासायनिक संघटन काय असते ते पुढे पाहूया. प्रथम ह्या घट्ट झालेल्या पित्ताला नियंत्रणात राखण्यासाठी असे घटक आहारात असले पाहिजेत की जे द्रव आहेत आणि पित्ताचे नियमन करण्यास सक्षम आहेत. लाळेत सुमारे ९८% पाणी असते आणि क्षारीय गुणांमुळे पित्ताचे नियमन करण्याचे सामर्थ्य यात आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोलेस्टेरॉल हे मानवी शरीरात निसर्गतः निर्माण होणारे रसायन आहे. आपण समजतो तेवढे हे घातक नाही हे समजून घ्यायला हवे. शरीरातील कितीतरी घडामोडी प्राकृत स्वरुपात होण्यासाठी ह्याची गरज असते. अन्यथा निसर्गाने ह्यची निर्मिती केली नसती. मल-मूत्र-घाम ज्याप्रमाणे शरीरातून बाहेर टाकले जातात त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल पण बाहेर टाकण्याची यंत्रणा शरीराने तयार केली असती. शरीरातील सर्व पेशींची स्निग्धता स्थिर ठेवण्यासाठी ह्याची पातळी सुयोग्य मात्रेत असणे आवश्यक असते. शिवाय मेंदूची सुमारे ८०% जडणघडण कोलेस्टेरॉल जातीच्या अनेक स्निग्ध पदार्थांनी झालेली असते हे विसरून चालणार नाही. ह्याचे प्रमाण कमी झाल्याने मेंदूचे कार्य खालावते, मेंदू शुष्क होऊन अल्झेमर्स सारख्या रोगाची सुरुवात होते. कोलेस्टेरॉल हे फक्त जाडजूड लोकांमध्येच वाढलेले असते असे मुळीच नाही. अगदी सडपातळ असलेल्यांमध्ये पण कित्येकदा ह्याचे प्रमाण वाढलेले आढळते. लाळेमध्ये असलेल्या रसायनांचा परीणाम कोलेस्टेरॉलमध्ये असलेल्या कॅल्शियमवर होतो आणि त्याचा घट्टपणा कमी करतो. वास्तविक कोलेस्टेरॉलपेक्षा ‘प्लाक’ हा अधिक घातक आहे. प्लाक म्हणजे कोलेस्टेरॉलमधील स्निग्ध पदार्थाबरोबर कॅल्शियम क्षारांचे मिश्रण होते आणि गाठ किंवा गुठळी होण्याची शक्यता वाढते. जेवण सावकाश करण्यामुळे अन्नाच्या प्रत्येक कणाबरोबर लाळ मिसळते आणि वाढलेले पित्त, जरुरीपेक्षा वाढलेला स्निग्धपणा, प्लाक साठी कारणीभूत असलेले कॅल्शियम अशा सर्वच बाबींचा समतोल राखला जातो.

सारांश – पचनापसून तर हृदय रक्षणापर्यंत सर्व यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी निसर्गाने आपल्या शरीरात लाळेची निर्मिती करण्याची योजना केली आहे. किंबहुना हे एक उत्तम औषधच आपल्या शरीरात पेरून ठेवले आहे. ते कशाप्रकारे वापरात आणायचे हेच आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. लहानसहान आजारांसाठी औषधे घेण्यापेक्षा शरीरात असलेले निसर्गदत्त औषध घेणे नक्कीच विना खर्चाचे आणि निर्धोक आहे.

डॉ. संतोष जळूकर, मुंबई

+917208777773

drjalukar@akshaypharma.com

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..