नवीन लेखन...

लक्ष्मीपूजन २०१६

यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ३० आॅक्टोबर २०१६ (रविवार) सायंकाळी ६ वाजून ४ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३६ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही शुभ व अमृत चौघडी असल्याने संपूर्ण काळ शुभ आहे.

या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)….मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका…नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे….पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा….जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा….ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत ही विनंती.@ सचिन मधुकर परांजपे

(महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत)

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)@सचिन मधुकर परांजपे

१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)

२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:

३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात

४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा

५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:

६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:

७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे

….तर मित्रांनो अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. पोस्ट पब्लिक पोस्ट आहे त्यामुळे कॉपी-पेस्ट न करता सबंध पोस्ट शेअर करा. आपल्या सर्व बंधुभगिनींना, आप्तेष्टांना मार्गदर्शन होवुन सर्वत्र समृध्दीचे, समधानाचे वातावरण पसरावे हीच श्रीलक्ष्मीनारायणांच्या चरणी प्रार्थना….

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..