नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १२

 

वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते.

जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन,
पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे होते. पुनः तो गरम होण्यासाठी जास्ती अग्निची आवश्यकता पडते. तसेच, पचन पूर्ण होण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. त्यावेळी त्यावर पाणी ओतून चुलीतील पेटलेला अग्नि विझवण्याचे पाप करू नका. असे केल्याने अन्न पोटात तसेच पडून रहाते आणि जाडी वाढते.

आणि जेवता जेवता पाणी पिल्याने शरीर संघटन जसे आहे, तसेच राहाते. मिक्सरमध्ये नारळ वाटता वाटता जर पाणी घातले तर नारळाचा उत्तम रस निघतो. तसे आहे. वाग्भटाचार्यांच्या ग्रंथातील सूत्रस्थान 5-14 या श्लोकामधून ही माहिती मिळते.

पाणी कमी करण्यासाठी, आर्द्रता कमी. होण्यासाठी, अग्निची आवश्यकता असते.
पाणी आणि अग्नि एकमेकाचे पिढीजात शत्रू. जिथे पाणी वापरले जाते, तेथील अग्नि नाहीसा होतो, या व्यावहारिक सत्याला आरसा कशाला हवा ?

एकदा एका लमाणी माणसांच्या तांड्याशी संवाद साधण्याची संधी शोधली. एका सकाळी 9 वाजता घरातील (घर कुठले, तंबूच ) सर्व आवरून, घरातील सर्व माणसासकट, ही मंडळी आमच्याच घराच्या बाजूला एका स्लॅब घालायच्या कामाला आली. पहिलं काम केलं ते डबे खाण्याचं. त्यांच्या डब्यावर माझं लक्ष होतं. जसं शिंप्याचं लक्ष कपड्याच्या डिझाईनवर, बूट पाॅलिश करणाऱ्याचं लक्ष बूटावर, केशकर्तनकाराचं लक्ष केसांच्या स्टाईलवर असतं, तसं माझं लक्ष खाण्याच्या डब्यावर !

डब्यात डाळ भात भाकरी आणि लसणाची सुकी चटणी. कापडात गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्यांची चवड. त्याच्यावरच लसणाचा लालभडक गोळा. मी त्यांना विचारलं, एवढ्या भाकऱ्या भाजायला सकाळी कधी वेळ मिळाला ? त्यावर त्या लेकुरवाळ्या माऊलीने उत्तर दिलं. “आज नाही भाजल्या, बुधवारी सुटी असते, तेव्हाच भाजून ठेवल्या.” मी उलटे दिवस मोजायला सुरवात केली. तो वार होता सोमवार. म्हणजे बुधवार ते सोमवार तब्बल सहा दिवसापूर्वी भाजलेल्या भाकऱ्या ती आत्ता खात होती. मी भाकरी हातात घेऊन बघीतली. कडकडीत पापडच जसा ! मी विचारले, एवढे दिवस या भाकऱ्या टिकल्या कश्या ? ती आपल्या भाषेत म्हणाली, “ते मला माहिती नाही, पण आमच्या भाकरी खाऊन झाल्या की उरलेल्या भाकऱ्या आम्ही सूर्याला दाखवतो.”

कानाखाली झणकन मारल्यासारखे तिचे शब्द कानात घुसले. विज्ञानातले एक व्यावहारिक सत्य त्या अशिक्षित, निरक्षर माऊलीने सहजपणे मला उलगडून दाखवले होते.

भाकरी सूर्याला दाखवतो, सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. दगडाच्या राशीवर भाकऱ्या पसरून ठेवतो, म्हणजे सूर्य त्यातील पाणी आपल्या उष्णतेने शोषून घेतो आणि त्या टिकवतो. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ जास्त दिवस टिकतो, हे व्यावहारिक, त्रिकालाबाधीत, वैश्विक सत्य तिच्याकडून मला शिकायला मिळाले होते.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..