नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग ३७

पाण्याची प्रशंसता भाग दोन

जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते. जसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि आता आपल्याला काम सुरू केले पाहिजे असे वाटून पोटाने आतल्या आत स्वतः भोवती फिरायला सुरवात केलेली आहे. तेवढ्यात प्रचंड पाण्याचा धबधबा वरून आत येतो. काय होईल, जरा कल्पना करून पहा.
(गाडी सुरू झालेली आहे, दोन घंटा दिलेल्या आहेत. आतमध्ये माणसे दाटीदाटीने ठासून भरलेली आहेत, तेवढ्यात आणखी चार पाच माणसे हात दाखवून गाडी थांबवताहेत, तेव्हा जर चालकाने गाडी थांबवली तर बसलेले प्रवासी कसे कलकलाट करतात.)

सारंच बिघडून जातं. फिरणारी यंत्रणा सावकाश होते. मुख्य म्हणजे आतले तापमान बदलते. सुरू झालेली गाडी परत थांबते. कलकलाट सुरू होतो. कोणी का कशासाठी आधी येता येत नव्हतं का, आधीच उशीर झालाय, आणि इथे जागा तरी कुठेय, चला हो तुम्ही पुढे, येतील ती मागच्या गाडीने, या प्रकारचे उदगार गाडीत सुरू होतील. बरोबर आहे ना ?

अगदी तसंच पोटात सुरू होतं.
ऊर्ध्वम आमाशयात कफम् अंते करोति स्थूलत्वम् म्हणजे वरच्या पोटापासूनच चिकट कफाची संचिती म्हणजे साठवणूक सुरू होते. जाडी वाढायला इथेच सुरवात होते.

जेवणानंतर लगेचच पाणी ढोसल्याने हे परिणाम दिसतात. आणि हे पाणी जर फ्रीजमधले गारेगार असेल तर आणखीनच सत्यानाश. म्हणजे जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायले तरी नाही हो चालत. एकदा मिक्सर सुरू केला की आता मधे थांबणे नाही.

आणि पचनाला जेव्हा हवे तेव्हा पाणी देणार नाही, नको तेव्हा ते आत भरणार त्याचा काय उपयोग ?

म्हणजे मरताना उपयोगी पडावी म्हणून काशीहून गंगा आणून ठेवली होती. तहानेने जीव जायची वेळ आली तरी म्हणायचे, मरताना शेवटचा घोट गंगेचा जावा, म्हणून आणली आहे तर आत्ताच कशाला फोडा, नंतर उघडू. आता बाटली फोडली तर नंतर काय उपयोग ? हा विचार करेपर्यंत प्राण गेलेले असतात. आता बाटली फोडली तरी गंगा पोटात काही जात नाही. ज्यावेळी जी गंगा पोटात जायला हवी, त्याचवेळी ती पोटात गेली तर उपयोग.
घोडे नाचवून मजा बघायची असेल तर वराती मधेच घोडे नाचले पाहिजेत.
वराती मागून घोडे नाचवून काय उपयोग ?

वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

13.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..