नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १९

पाणी कसे साठवावे ?
अंतरिक्षातून पडणारे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ पात्र अपेक्षित आहे. सोन्याचे असल्यास सोन्याहून पिवळे ! नाहीतर ज्या अठरा मूलद्रव्यांनी शरीर बनलेले तीच अठरा मूलद्रव्ये असलेल्या मातीच्या मडक्यात अंतरिक्ष पाणी साठवावे.व्यवस्थित झाकून ठेवले तर हे टिकाऊ असते. कोणत्याही संस्कारांची आवश्यकता नसते. पण एकदा हे पाणी जमिनीमधे मुरले की त्यात अशुद्धी येण्यास सुरवात होते.

प्रदेशानुसार पाणी साठवण्याच्या पद्धतीमधे बदल होत जातो. आपणाला जो पर्याय योग्य वाटतो तो निवडावा, शास्त्रकार हट्टी नाहीत. आम्ही सांगतो तस्सेच तुम्ही करावे, असे नाही सांगत. अनेक प्रदेशात पाणी कसे साठवले जाते, त्या त्या प्रदेशाची ती गरज असते. तोच नियम आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. वापरू पण नये.

ऋतु, काळ, प्रदेश, उपलब्धता या निकषांचा युक्तीने वापर करावा, असे शास्त्रकार वारंवार बजावतात. केवळ नियमावर बोट ठेवून कधी आरोग्य मिळणारे नसते. हे लक्षात ठेवावे.

आपणाला फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून पुढे नऊ दहा महिने साठवलेल्या पाण्यावर जीवन व्यतीत करायचे असते. जमिनीवर पडलेले पाणी साठवण्याचा मोठा आणि सोपा पर्याय म्हणजे तलाव. गावामधे लोकसंख्येनुसार किती पाणवठे असावेत, त्याची खोली किती असावी, त्याची सार्वजनिक स्वच्छता कशी ठेवावी, हे टीकाकार अधिक स्पष्ट करून सांगतात.
( टीकाकार म्हणजे टीका करणारे नव्हेत तर आपल्या गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे ते आणखी सोप्या भाषेत समजावून सांगणे, त्याचे अर्थ विस्ताराने सांगणे. जसे भगवद्गीता सोपी करून सांगावी म्हणून लोकमान्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. विनोबा भावेंनी गीताई लिहिली, ज्ञानेश्वर माऊलीचा ग्रंथराज तर सुपरिचित आहेच. )

नैसर्गिकरित्या जिथे पाणी साठवले जाते ते सरोवर.

वाहाणारे पाणी मुद्दाम अडवून योग्य जागी साठवणे म्हणजे बांध, याचेच मोठे रूप म्हणजे धरण.

नदी ओहोळ याचे पाणी देखील उगमाच्या दिशेत स्वच्छ होत जाते.

जमिन खणून त्यातून कायम स्वरूपी, नैसर्गिक झऱ्यातून येणारे पाणी विहिरीत साठवणे.
किंवा जमिनीखाली असणाऱ्या मोठाल्या दगडामधे साठलेले पाणी, कूपनलिकेच्या रूपात साठवणे (आजच्या भाषेत बोअरचे पाणी.) असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

जिथे पाऊस अगदी कमी पडतो अशा वाळवंटी प्रदेशातील पाणी गरजेप्रमाणे जमिनीखाली साठवले जाते.( किंवा आजच्या भाषेत रेन वाॅटर हार्वेस्टींग. ही आता अन्य प्रदेशात सुद्धा काळाची गरज बनू लागली आहे. )

जमिनीखालील पाण्याचे प्रवाह जमिनीवरून कसे ओळखावेत, याचे काही जणांना ज्ञान असते. यांना पाणके म्हणतात. विशिष्ट दिशा, जांभूळ, औदुंबर सारखी झाडे, जमिनीचे चढाव उतार, यांच्या वरून जमिनीखालचे प्रवाह समजू शकतात.

या सर्व प्रकारांनी पाण्याची साठवणूक करता येते. सूत्रस्थानाचा अभ्यास करता असे दिसून येते, की ग्रंथकर्त्यांनी पूर्ण मानवजातीचा विचार करून या साहित्याची रचना केली आहे. याचाच अर्थ त्यांनी केवळ आताचा भौगोलिक भारतच नव्हे तर पूर्ण विश्वातील पाण्याचा स्थानानुसार अभ्यास केलेला होता.

हे सर्व आम्हाला गावामधे मिळू शकते, पण शहरात रहाणाऱ्यांचे काय ?
त्यांनी काय करावे
?????

त्यांच्यासाठी नलोदक झिंदाबाद !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
26.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..