नवीन लेखन...

मोबाईलवरुन खरेदी….

आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो.

मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग.

चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय?

काही तरी गोड मागवावं म्हणतो.

लाडू साठी एक दाबा ,
रसगुल्ला साठी दोन दाबा ,
गुलाबजामुन साठी तीन दाबा.

मी म्हणालो लाडू हवेत.

बूंदीच्या लाडू साठी एक दाबा ,
सुक्या मेव्याच्या लाडू साठी दोन दाबा.
खव्याच्या लाडू साठी तीन दाबा.

मी एक दाबलं बूंदीचे हवेत.

एक पावसाठी एक दाबा,
एक किलोसाठी दोन दाबा,
एक क्विंटलसाठी  तीन दाबा.

चुकून तीन नंबरचं बटन दाबलं गेलं.  मी घाबरून फोन कट केला. दुसरयाच क्षणी त्यांचा फोन आला.

आपल्याकडून एक क्विंटल लाडूची और्डर आली आहे.  घराचा पत्ता द्या.

मी बोललो – मी तर फोनच नाही केला.

मग आपल्या भावाने केला असेल . ह्याच नंबर वरून कॉल आला होता. तुमच्या भावाला फोन द्या.

मी बोललो आम्ही सहा भावंडे आहोत.
मोठ्याशी बोलण्यासाठी एक दाबा,
मधल्याशी बोलण्यासाठी दोन दाबा
छोट्याशी बोलण्यासाठी तीन दाबा
त्याच्यापेक्षा लहानाशी बोलण्यासाठी चार दाबा

समोरच्याने फोनच कट केला.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..