नवीन लेखन...

मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन

“मै दीनदार बुत-शिकन..!”
“मै दीनदार कुफ़्र-शिकन..!”

(“मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!”)

असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..!

असा अफजलखान पठाण हा केवळ सीमा विस्तारायला आला होता, त्याला धर्माचा प्रचारक म्हणून तुम्ही त्याची दुष्कीर्ती केलीत.. आणि शिवाजी महाराजांना घरात नेऊन बसवलंत !

हे संतापजनक वक्तव्य ऐकलं..

हिंदूंच्या विजयी इतिहासाचं नुसतं स्मरण आणि यथाशक्य अनुकरण करून हा देश विश्वविजयी होऊ शकतो इतका तो इतिहास प्रेरणादायी आहे..

आणि म्हणूनच देशद्रोही, इतिहासाचं विकृतीकरण करू पाहतायत..
त्याच देशधर्मबुडव्या पाप्यांच्या यादीत हा मुंब्र्याच्या गळ्यातला ताईत बसू पाहतोय..

या इतिहासाचं विकृतीकरण व्हायच्या आत सगळ्या जगाला ओरडून सांगूया..!

अफजलखान हा इस्लाम चा प्रचारकच होता..
त्यासाठी त्यानी अतिशय क्रूर पद्धतीनी हिंदू स्त्री पुरुषांवर अनंत अत्याचार केले, अनेक देवळं फोडलीत, शेकडो गाईंचं रक्त सांडलं..

आणि गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदूधर्मसंरक्षक, शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि हा क्रूरकर्मा ठार केला..

त्या शिवरायांना आम्ही नुसतं घरात नाही आमच्या देवघरात ठेवतो आणि त्याही पलीकडे त्यांची प्रतिष्ठापना आमच्या हृदयात करतो…
आणि अशी प्रतिज्ञा करतो की ही शिवज्योत सदैव तेवत ठेवू आणि एका ज्योतीनी अश्या अनेक ज्योती पेटवत राहू.

— गीता उपासनी

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..