नवीन लेखन...

मालिका आणि वास्तव…..

सध्या टेलिव्हिजनवरवेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंचप्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर कायद्याव ? हा प्रश्न या मालिका पाहणार्‍या सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्यप्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्याआवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षकपाहतात का ? पूर्वीच्या त्या मालिकांतीलकोणत पात्र कोणी साकारलयं हे शेंबडया पोरांना ही माहित असायचं पण ! आज मालिकात कामकरणार्‍या काही मोजक्याच कलाकारांची नावे लोकांना माहित असतात. आज लोक कोणत्याहीमालिकेत फार गुंतत नाहीत. मी तर एकाच वेळी तीन-तीन मालिकांचा एक-एक तुकडापाहतो आणि तरीही मला त्या तीनही मालिका पाहिल्याचंमानसिक समाधान मिळतं. एखादी मालिका एक महिना जरी पाहिली नाही तरी आपण फार काहीगमावलं असं हल्ली कोणा प्रेक्षकाला बहूदा वाटत नसावं. कोणत्या मालिकेत कोणत कथानककिती खेचावं याला काही मर्यादाच राहिलेली नाही. एखादा सरडा ही जितके रंग बदलतनाहीत इतके रंग या मालिकेतील पात्र बदलत असतात. मालिका म्हटली की ती श्रीमंतचअसायला हवी असा या मालिकांची निर्मिती करणार्‍यांनी जणू ठरवूनच टाकलेलं दिसतयं. यामालिकात श्रीमंत लोकांच्या गरीब समस्या दाखविल्या जातात आणि मध्यामवर्गीय माणूस चणेखात त्या पाहात राहतो. या मालिकांतील पात्र क्षणात गरीब आणि क्षणात श्रीमंत होतानादिसतात. प्रत्येक मालिकेत खास करून हिंदीत मालिकेच्या सुरूवातीला सर्व श्रीमंतदाखवायचे सारं इतक भव्यदिव्य दाखवायची की ते पाहून गरीबांचे डोळेच दिपतील,त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले की मग त्या श्रीमंताना गरीब करायचं मग गरीबांच्याभावनानां हात घालून त्यांच्या मनाचं समाधान झालं की त्यांना जादूची कांडी फिरवूनपुन्हा श्रीमंत करायचं आणि गरीबाला ही श्रीमंत होता येत असं स्वप्न गरीबांना दाखवायचं.गरीब ते स्वप्न पाहात असतानाच अचानक ती मालिका बंद करायची आणि गरीबांच्या स्वप्नावर पोतेरं फिरवायचं. टेलिव्हिजनवरआता एक नवीनचं प्रकार सुरू झालेला आहे पुरूष कलाकारांनी बायकांच्या वेशातवावरण्याचा एक विनोदाचा भाग म्ह्णून हे होत होत तो पर्यत ठिक होतं पण आता ते फारचंकिळ्सवाण वाटू लागलेलं आहे. एखाद्या भुमिकेची गरज म्ह्णून पुरूषांनी स्त्री वेशातवावरणं ठिक आहे पण हल्ली बायकांना पुरूषांना स्त्री वेशात पाहायला आवडू लागलंय कीकाय अशी भिती हळूच मनात डोकावू लागते की काहीतरी नवीन करायचं म्ह्णून पुरूषकलाकारांनी स्त्री वेशात वावरायचं अशी काही नवीन प्रथा सुरू झाली असेल तर ते फारचंविचित्र म्ह्णावं लागेल. कॉलेजात जाणारे तरूण फॅशन म्ह्णून साडी नेसून कॉलेजातनाही गेले म्ह्णजे मिळविली असं म्ह्णण्याची वेळ आलेली आहे. मी मालिकेशी संबंधीतमाझ्या एका मित्राला म्ह्णालो ही तुमच्या मालिकेच्या प्रत्येक भागातील अर्धा-अधिकवेळ स्वयंपाक घरात आणि रॅम्पवॉक करण्यातच जातो त्यावर तो म्ह्णाला मलाही याचाकंटाळा आलायं पण काय करणार ? आता बोला ! समाजात जे घटस्फोटाचे आणि विवाह बाहयप्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत आहे त्याला हया मालिका तर जबाबदार नाहीत ना ? असाप्रश्न ही मला कधी – कधी सतावू लागतो. माझ्या मित्रांना मी मालिका पाहतो हेऐकल्यावर फारचं आश्चर्य वाटतं ते वाटण्याचं कारण शोधलं असतात आपल्या देशातील फारकमी पुरूष या मालिका पाहतात. पण मला वाटत पुरूषांनी या मालिका नाक्कीच पाहायलाहव्यात म्ह्णजे त्यांना हया मालिका आपल्या घरातील बायकांच्या मेंदूत नक्की कायघुसडतं आहेत हे अगदी सहज लक्षात येईल. मालिकांतीला पात्रे जे पोषाख परिधान करताततेच पोषाख परिधान करण्याची हुक्की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण होऊलागते. मालिकेत सती सावित्री दाखविलेल्या नायिकेला जेंव्हा एखादा पुरूष एकाबारमध्ये दारू पिताना पाहतो तेंव्हा तो ती मालिका डोळे फाडून पाह्णे थांबवतो.मालिकांतील पात्रांमध्ये आपल्या कडील प्रेक्षक गुंतून पडतात. मालिकांतीलकथानकासोबत ते स्वतः ही वाहत जात राहतात. एखादया माणसाच्या आयुष्यात किती संकटयावी आणि त्यातून त्याने सहीसलामत बाहेर निघावं किती वेळा यालाही काही मर्यादाराहिलेली नाही. या मालिकातील कोणत्या पात्राची बुध्दी कधी भ्रष्ट होईल अथवा त्याची स्मृतीनाहिशी होईल हे तर साक्षात परमेश्वरालाही सांगता येणार नाही मला तर वाटत ती मालिकालिहणार्‍यालाही ते नक्की माहित नसावं. माझ्या आतापर्यतच्या आयुष्यात असा स्मृतीनाहिशी झालेला मी एक ही माणूस पाहिलेला नाही म्ह्णून मी माझ्या एका डॉक्टरमित्राला उत्सूकतेतून विचारलं हे जे मालिकेतील पात्रांची स्मृती जाताना दाखवितातत्यंना काही गोष्टी कशा काय आठवत असतात ? तेंव्हा तो मला म्ह्णाला आपल्या मेंदूतवेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्मृती साठविलेल्या असतात त्यामुळे मेंदुचा ज्याभागाला इजा पोहचलली असते फक्त त्या भागातील जमा स्मृतीच नाहीशी होते. मालिकेतीलकथानक पुढे जाव म्ह्णून एखाद्या मालिकेतील एखाद्या पात्राची स्मृती जाणे मान्यकेले जाऊ शकते पण त्यानंतर आणखी चार-पाच मालाकांतील पात्रांची स्मृती जात असेल तरहा कहरच म्ह्णायला नको का ? माझं तर असं ही निरीक्षण आहे की स्मृती जाण्या सारखेप्रकार मालिकात एखाद्या पात्राच्या मृत्यूच्या बाबतीत ही घडताना दिसतात. सासू सुनेच नातं हा तर या मालिकांचा जणू प्राणचआहे असा समज करून घ्यायला या मालिकांचे निर्माते ही नाही म्ह्णणार नाहीत.सध्याच्या सासू – सूना यामधील नातं बदलत चाललयं अर्थात सूनेला आता सासूचा धाकचउरलेला नाही याला या मालिकाच जबाबदार आहेत. काही पालक स्वतःहून आपल्या मुलाला लग्न झाल्यावर स्वतत्र राहण्याचा सल्लादेतात. एका मालिकेतील लेखक एक पुस्तक प्रकाशित होताच सिलेब्रेटी होतो आणि दुसरीकडेकविता लिहणार्‍या नायिकेला एक कविता लिहल्याबद्द्ल फक्त शंभर रूपयाचे मानधन मिळतेआणि त्याचा आनंद तिला करोडो रूपये मिळाल्यासारखा व्यक्त करताना दाखविला आहे.रोजच्या जीवनात घडणार्‍या घटना हल्ली मालिकांत डोकावताना दिसतात पण हल्लीवडपोर्णिमेलाही मालिकांत मानाचे स्थान मिळू लागले आहे त्यात कहर म्ह्णजे हे असे सणपुरूषांनी ही साजरे करावेत हा अट्टहास खरोखरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. आतासमाजात कायं घडावं, कोणते सण कसे साजरे व्हावेत, कोणत्या परंपरा बुरसटलेल्या आहेत आणि कोणत्या समाजहिताच्या हे सारे आता हया मालिका ठरविणार का ? सध्याच्या माणसाचा खाजगी आयुष्यातमर्यादेपेक्षा अधिक डोकावताना दिसतात. काही पात्रांच्या प्रत्यक्ष आयुष्या घडणार्‍याघडामोडींचा संबंधही या मालिकातील कथानकाशी जोडला जातो. सध्याच्या मालिकात होणारेअंगप्रदर्शन मालिकेची गरज म्ह्णून कमी आणि टी.आर.पी वाढविण्यासाठी अधिक केले जातेहे सत्य आता कोणीही नाकारणार नाही, आपल्या देशातील बहूसंख्य पुरूष ते पाहण्यासाठीचया मालिका पाहत असतात असं बरेच पुरूष खाजगित मान्य करतात. घटस्फोटानंतर आपल्याआयुष्यात लगेच दुसरी व्यक्ती येऊ शकते आणि आपले जीवन पुन्हा आनंदाने बहरू शकते हाफाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या पिढीच्या मनात निर्माण करतात आणि काही मालिकातघटस्फोटा घेण्यासाठी दाखविली जाणारी कारणे फारंच शुल्लक असतात. इतकी शुल्लक की तीवास्तवापासून प्रचंड दूरची असतात. देवांवर असणारी मालिका पाहताना त्या मालिकेतूनलोकांच्या मनात त्या देवाबद्द्ल श्रध्दा निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोरनसतोच उलट त्या पाहणार्‍याची डोळ्याची भुक वाढविण्याचे कार्य या मालिका अधिककरताना दिसतात. काही मालिका आहेत ज्या खरोखरच मनोरंजन करतात पण त्यातून बोध घ्यावाअसं त्याच्यांत काहीही नसतं. लोक सध्या मालिकेंच्या प्रेमात पडून आंधळे झालेलेआहेत त्यामुळे त्या डोळसपणे पाहण्याचीत्यांची तयारीच नसते.

लेखक – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..