नवीन लेखन...

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

मानसिक तणाव-  (क्रमशः  पुढे २ वर चालू- – -)

दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून – Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.

मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन,   ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.

माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.

होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे  काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .

२. एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.

निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत करावी लागते. त्याचवेळी कोणत्याही दुर्धर प्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.

१०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.

थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.

जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो.  व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)

३. मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य  जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो.  असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी  ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे,  विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.

एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.

आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.

स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह  व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

४. ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक  काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते – जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी – एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.

क्रमशः पुढे ३ वर चालू –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..