नवीन लेखन...

माझी माणसं – जिवलग

mazi-manasa-serial

आपल्या आयुष्यात कोण डोकवावे हे आपल्या हाती नसते . काही जण  काही क्षणा साठी सम्पर्कात येतात आणि आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकतात ,तर काहीजण जन्मापासून सोबत असतात पण शेवट पर्यंत ‘अनोळखीच ‘ रहातात ! माझ्या आयुष्यात पण, आदर्श शेजाऱ्या प्रमाणे डोकावणारे आहेत , तसाच इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचा ‘वसा ‘ मी पण ‘ऊतलो नाही ‘ ‘मातलो नाही ‘ आणि टाकला पण नाही ! असे करता करताच ‘माझी माणसं ‘ जमलीय . हि उदास असतील , दुःखी असतील ,काहीशी भरकटल्या सारखी वाटतील ,पण माझ्या मनत ती खोलवर रुजली आहेत . या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील !

आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे.
आज  माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा.


मी आणि शाम्या मुडकेच्या टपरीवर सकाळच गार  उन गरम चहा सोबत खात होतो . वसंता ( आम्ही त्याला वश्या  म्हणतो )अजून आला नव्हता . त्या मुळे त्याचाच विषय आम्ही चघळत होतो .
“सुरश्या  वश्या  सारखा ‘ध्यान ‘ तू आपल्या दोस्तांच्या ग्रुप मध्ये घ्यायला नको होत !”
“का?”
“एकदम बावळट अन भडकू आहे .”
” अरे पण तो …… ” मी काही बोलणार तो वश्याच ‘ध्यान ‘ समोरून आलंच . गडी घुश्यात होता . माझ्या समोर दोन्ही हात कमरेवर ठेऊन अटेन्शन मध्ये उभा राहिला .
“तुम्हाला न काही सेन्सच नाही ! मी म्हणतो, इतका कशाचा माज आलाय ! ?”
” वश्या , नीट सांग काय झालंय ?” मी पण सटकलो
“काय ? काय? मलाच विचार ! समोरून गेलोतर साधी ओळख दाखवली नाहीस ! ”
“कधी?”
‘कधी काय ? रविवारी ,मी बाईक वरुन समोरून आलो तर तू आपला ढेरी हालवत तसाच पुढे ! साधी स्मित रेषा थोबाडावर उमटली नाही ! वीस वर्षाची ओळख विसरलास ?”
हा वश्या ना कायम  भयंकर कळकट जीन ,त्यावर मेलेल्या काळ्या कुत्र्या सारखं जाकीट ,जून पोचे पडलेले शिरस्त्राणा सारखं पूर्ण चेहरा झाकून टाकणार हेल्मेट घालतो  ! बाईक पण काळीच ! कसा ओळखणार ? ‘सब पुलीसवाले एक जैसे दिखते है ‘ च्या धर्तीवर मला ‘सब हेल्मेटवाले एक जैसे दिखते  है!’ अशी माझी अवस्था असते .
” आबे, जॅकेट ,जीन अन हेल्मेट वाले सगळी माणसे मला सारखीच दिसतात !”
“मला वाटलंच ! असलं काही तरी तू बरळणार ! पण गधड्या १०१२ माझा बाईक नम्बर ! तो तर बघितला अशिलना ना ? सतरा वेळेला मागची शीट  गरम  केलीस कि ! काही नाही तू न दिवसेंन दिवस अधिक ड्याम्बीस होत चालायस !”दाहीने मड करून ताडताड पाय आपटत निघून गेला !

खरे आहे ,मी  अनेक वेळा त्याच्या बाईकवर बसलोय . पण आकडे माझ्या लक्षात राहत नाहीत . अहो माझा फोन नम्बर , बँकेचा खाते नम्बर , पी. एफ . नम्बर ( माझा एक सहकारी याला कैदी नम्बर म्हणतो! –नौकरी मे  भी और  नौकरी के बाद  भी –चिटकलेलाच रहातो !) , इतकेच काय माझा बेसिक पगार सुद्धा माझ्या लक्षात रहात नाही ! देवा शपत खरे सांगतो आयुष्य भर ‘पडेल ते काम अन मिळेल ती पगार’ या तत्वा वर नौकरी केलीय .! आमच्या तात्या सोमण सगळ्याच्या जन्म तारखा लक्षात ठेवतो ! असो .
ooo

रात्री अकराला जग्या चा फोन आला . ‘मी उद्या येतोय नगरला पत्ता सांग ! ‘. जग्या रात्री बेरात्री कधीही फोन करतो . हजार वेळा सांगितलं . ‘सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळात फोन करत जा . ‘हो ‘ म्हणतो अन पुन्हा बेरात्री फोन करतो . जग्या असाच आहे . किमान तीस एक वेळा तरी घरी येउन गेला असेल . पण दर वेळेस फोनवर पत्ता विचारतो .
‘दर वेळेस पत्ता विचारतोस ,लक्षात रहात नसेल तर एकदाच लिहून ठेव ना ?’
‘काय गरज ? तू आहेस कि  . विचारीन तुला ‘
‘अन समजा मी नसलो तर ?’
‘तर मग कशाला येतोय मी ?’
हे असले आमचे मित्र !
ooo

एक वेळ हा जग्या परवडला ,पण तात्या सोमणाचा वेगळाच हिसका असतो . त्याच्या साडूचा भाऊ नगर मध्ये रहातो . तात्या मला भेटायला म्हणून नगरला येतो , आणि उतरतो साडूच्या भावाकडे ! तेथून त्याचे फर्मान निघते ,
“सुरश्या , मी आलोय . भेटायला ये . मग जाऊ बाहेर जेवायला ”
” कुठे उतरलास ? काळ्या कडेच का ?”
“हाव , कालच आलोय !”
” अरे ,तात्या, त्या तुझ्या काळ्याच घर माझ्या घरापासून खूप लांब आहे रे . त्या पेक्षा तू माझ्या कडे …….. ”
“लांब ? साल आम्ही तुला भेटायला पाचशे किलोमीटर हुन येतो ,अन तुला पाच किलोमीटर लांब वाटतंय? गाडी विकलीस का ?”
सोमण्या म्हणजे कठीण प्रकार !
ooo

खरे सांगतो तात्या काय ,जग्या काय ,वश्या काय किंवा शाम्या काय , मित्रच आहेत हो . आणि का नसावेत मला त्यांनीहि माझ्या दोषा सकट  स्वीकारलय ! माझ्या सारख्या त्यांनाही त्यांच्या मित्रानं कडून अपेक्षा असणारच ना ?

मित्र म्हणजे कोण ? हा घहन  प्रश्न मला नेहमीच सतावतो . म्हणून एकदा मी श्याम्याला विचारले .
“शाम्या दोस्त कुणाला म्हणवरे ?”
” जो सकाळी उष्णोदकाचे आणि रात्री शीतोदकाचे बिल भरतो  त्याला दोस्त म्हणावं  ! ”
शाम्या इब्लिस आहे . आमचा सुधा  कोणाचीहि तोंड ओळख झालीकी  ‘तो न आपला फ्रेंड आहे ! ‘ म्हणतो . त्याच्या मित्रात रात्रीच्या गस्त घालणाऱ्या गुरख्या पासून ते कलेक्टर पर्यंत सर्व जण येतात !मित्रांची व्याख्या करण्या इतपत आपली प्रज्ञा नाही . पण एक जागी मित्रांचे प्रकार वाचण्यात आले . एक ज्याची आपली वेव्हलेन्थ जमते तो साधारण ‘मित्र ‘या क्याट्यागिरीत मोडतो  .दुसरे ,ज्यांच्या समोर आपणस व्यक्त होताना संकोच वाटत नाही किंवा जे आपण व्यक्त झालो तर आपल्यला समजून घेतात ते . त्यांना आपण ‘सखा ‘ म्हणू ,पण असेही काही मित्र असतात जे न सांगताही आपली घालमेल समजून घेतात ! हेच ते ‘जिवलग ‘ मित्र ! वय ,जात , गरिबी श्रीमंती या सगळ्याच्या पल्याडचं नातं ! तसे नसते तर सुदामाला कृष्णा सारखा जिवलग मिळाला नसता ! न सांगता सुदामाला समजून घेणारा ! आणि मलाही हे जिवलग मित्र , न बोलताही समजून घेणारे !मिळाले नसते ! कोणी तरी मैत्रीला  हिऱ्याची  अप्रतिम उपमा दिलीय ! ‘हिरा हा कोळशाचाच भाऊ बंध . विज्ञान सांगते कि ‘हिरा जगातला सर्वात कठीण पदार्थ आहे , तरी तो ठिसूळ पण आहे ! हिरा भंगला तर सांधता येत नाही ! तुमच्या जिवलगांना जीवापाड सांभाळा ,त्यांच्या दोषांना कोळश्याच्या खाणीतील म्हणून हिणवू   नका ! ते भंगणार नाहीत याची काळजी घ्या !

आजची पोस्ट माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांसाठी ,
आप  हमारे ‘हिरा ‘ हो

— सु. र. कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच  Bye !

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..