नवीन लेखन...

महिमा ॐ चा

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….

अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.

घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.

ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.

ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.

ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.

ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.

थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.

ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.

प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.

ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.

ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.

…आहे ना छान ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..