नवीन लेखन...

मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. ‘त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बाई बाई मनमोराचा’ या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, ‘मित्रा तोडलंस! जिंकलंस!, ‘टांगा पलटी घोडे फरार’ या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा थेट प्रश्न विचारत ते दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.

खुपते तिथे गुप्ते’मुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक व संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

अवधूत गुप्ते यांची वेबसाइट www.avadhootgupte.com

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..