नवीन लेखन...

मन कि बात- डिप्रेशनवर मात

आयुमित्र

दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते.

ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे.

मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर ह्यांनी फारच interesting fact सांगितली. मेडिकलच शिक्षण घेणारे ५०% विद्यार्थी सतत तणावात असतात. जे पुढे जाऊन आरोग्यसेवा पुरविणार आहेत. नुसतेच मेडिकल नाही तर कुठल्याही शाखेचेळ्रौ शिक्षण असो. साध्या १वी व १२वीच्या निकालाडानंतर वर्तमान पत्रात आत्महत्याविषयक बातम्या हमखास असतातच. डिप्रेशनल बऱ्याच आजारांच प्रमुख कारण आहे. WHO नुसार २००५ ते २०१५ च्या दरम्यान तब्बल १८%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिप्रेशनमुळे डायबेटीस, हृदयरोग ह्यासारखे असंसर्गन्य रोग तर होतात पण डिप्रेशनमुळे आत्महत्येच प्रमाणही वाढते आहे.

डिप्रेशन म्हणजे काय?

अधुनिक शास्त्रानुसार १४ दिवसापर्यंत तुम्ही सतत दु:खी असाल, दैनादिन क्रिया करणेही जड झाल असेल. ज्या दैनंदिन क्रिया तुम्ही आनंदाने करत होता त्या करण्यात अजिबात रस वाटत नसेल तर तुम्हाला डिप्रेशन असू शकते.

डिप्रेशनची मूळ लक्षणे काय आहेत…..।…

निरुत्साह, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, पचनक्रिया बिघडलेली असणे, झोप कमी वा खूप झोपावेसे वाटणे, कुठल्याही कामात मन एकाग्र न होणे, स्वतःबद्दल वाईट वाटत राहणे, माझा काहीच उपयोग नाही, मी काही कामाचा नाही अशी भावना निर्माण होणे, निराशा वाढणे आणि स्वतःला संपविण्याची किवा त्रास पोचविण्याचे विचार मनात येणे अशी लक्षणे डिप्रेशन ह्या प्रकारात येतात.

डिप्रेशन कोणाला होऊ शकते?

डिप्रेशन कोणालाही होऊ शकते. तो सार्वभौम आहे. तो भेदभाव करत नाही. गरीब असो श्रीमंत असो. त्याला देश, लिंग, वय ह्याची मर्यादा नाही. परंतु प्रामुख्याने किशोर, तरुण वयातील, प्रसूत माता आणि ६० वर्षाच्या वरील वृध्द लोक ह्यांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते.

डिप्रेशन कश्यामुळे येते

पुरेसा पैसा नसणे, गरिबी असणे, नौकरी, व्यवसाय न मिळणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेम संबंध तुटल्याने म्हणजेच ब्रेकअप,दीर्घकालीन आजारपण किंवा कॅन्सर, एड्स सारखे आजार होणे. दारू आणि DRUGS च्या वापरामुळे डिप्रेशन येऊ शकते.

डिप्रेशन ला उपाय काय?

आयुर्वेदात काय उपाय आहेत?

आयुर्वेदाने शरीर आणि मन दोघांच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. सदवृत्त पालन, धारणीय Nवेग, सत्वावजय असे उपाय सांगितले आहेत. मनाचा सत्वगुण वाढवून मानसिक व्याधी दूर वभभकरण्यासाठी आयुर्वेद काम करतो. विस्तृत कधीतरी लिहीनच.

WHO टॉकिंग थेरपी-

सध्या एक चित्र सगळ्यांनी बघितल असेल. घरात सगळे बसलेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण घरात एकमेकांशी आपण बोलत नसतो. सगळे सोबत असून आपण एकटे असतो. कारण जो ढतो त्याच्या whatsapp आणि फेसबुक वर online असतो. पूर्वी जेवायला सोबत, संंध्याकाळी रामरक्षा, प्रार्थना असेल ती सोबत होत असे. आता प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगळ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या त्यामुळे घरातलाच संवाद कमी झालाय. मित्रांशीहि संवाद हा प्रत्यक्ष जास्त न होता whatsapp आणि फेसबुक च्या माध्यमातूनच जास्त होतो. आजकाल प्रेमही online होत आणि लग्नही त्यामुळे बोलायलाच नको. एकाच flat स्कीम मध्ये शेजारी जन्म झाला, मरण झाले तरी कळत नाही कारण आमच्यात संवादच नाही.

WHO म्हणतय बोलण वाढवा, संवाद करा डिप्रेशन दूर होईल. आपल्या प्रधानमंत्रिनी सुद्धा हाच संदेश दिला आहे. “Expression of Depression instead of suppression”
आपले मित्र, आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना आपले शेयरिंग पार्टनर बनवा. मनातील गोंधळ, भीती, दुखः, निर्णय आपल्या विश्वासू लोकांजवळ नक्की बोलून दाखवा. ह्याउलट जो डिप्रेशन मध्ये आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत नक्कीच होईल.

आपली “मन कि बात” कराच पण दुसऱ्यांच्या “मन कि बात” पण ऐका म्हणजे डिप्रेशन नक्की कमी होईल.

चला तर करूया मन कि बात आणि डिप्रेशनवर मात ….

–वैद्य भूषण मनोहर देव.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..