नवीन लेखन...

भारतीय सैन्य शांतता काळात काय करते

जयपूर येथे ‘सीमा सुरक्षा’विषयक एका परिसंवादात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या भाषणातील एका विधानाला नकारात्मक रंग देऊन संरक्षण मंत्र्यांना अकारण वादात ओढण्याचा सुरू झालेला खटाटोप अनाकलनीय आणि अनाठायी आहे. संरक्षण मंत्र्यांच्या संपूर्ण भाषणात आक्षेपार्ह, वादग्रस्त किंवा वस्तुस्थितीशी विसंगत असे काहीही नाही. देशाच्या दृष्टीने लष्कराचे महत्त्व केवळ युद्धकाळातच नव्हे तर शांतीकाळातही अबाधित असते आणि असले पाहिजे’ असे स्पष्ट मत त्यांनी या भाषणात मांडले.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एक प्रांजळ निवेदन केलेले आहे. त्यांची त्या मागची तळमळ समजून घ्यावी लागेल. ‘या देशातल्या जनतेला संरक्षणखाते किंवा लष्करी जवान यांच्याबद्दल फार मोठा आदर राहिलेला नाही,’ असे पर्रिकर म्हणाले. लष्कराबद्दल या देशातल्या भारतीय जनतेच्या मनात आदर नक्कीच आहे,पण लष्कराबद्दल वाटणारा जिव्हाळा मात्र कमी झालेला आहे. कारण कारगिलचे ९९ सालचे युद्ध सोडले, तर त्याआधीचे युद्ध म्हणजे १९७१चे बांग्लादेशविरुद्ध, १९६५ चे पाकिस्तान विरुद्धचे आणि १९६२ चे चीन विरुद्धचे आणि १९४७-४८ चे पाकिस्तान विरुद्ध झाले होते. मधे निजामाच्या विरुद्ध सैनिकी कारवाई गोवा मुक्ती संन्ग्राम, झाला होता.

युद्धकाळात जनतेकडून सैन्याबाबत प्रेम व आदरभाव
सैनिक अनंत अडचणींना तोंड देत सरहद्दीवर सदैव सज्ज असतात. त्यामुळेच देशाच्या सरहद्दी सुरक्षित राहतात. देशाचे संरक्षण करणार्‍या जवानांना सरहद्दीवर कोणकोणत्या अडचणींना, आव्हानांना सामोरे जावे लागते याची सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नसते. त्यामुळे युद्धकाळात जनतेकडून जवानांबाबत जे प्रेम, आदरभाव दाखवला जातो तो शांतीकाळात जाणवत नाही. मात्र देशाच्या दृष्टीने शांतीकाळातही आदरभाव कायम दिसून यायला हवा. स्वतःच्या देशाच्या लष्कराबाबत आदरभावना न बाळगणारा देश प्रगती करू शकत नाही’, या मानसिकतेत बदल व्हायला हवा, असे परखड विचार संरक्षण मंत्र्यांनी मांडले आहेत. या विचारांना कोणी आक्षेप घेण्याचे कारण असू शकत नाही. संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलेले मनोगत विचारार्ह असेच आहे

युद्धाअभावी लष्कराचे महत्त्व कमी झाले आहे’ असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटलेले नाही. युद्धकाळात लष्कराला जे प्रेम, जो आदर दिला जाते तो युद्धकाळ संपुष्टात येताच काहीसा विरल्याचे जे चित्र उभे राहते त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचा नकारात्मक अर्थ काढण्याचा खटाटोप होऊ नये. प्रत्यक्ष युद्धकाळात भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या गाथांनी वर्तमानपत्रांची पानेच्या पाने भरतात. देशभरात राष्ट्रभक्तीचे वारे वाहू लागते. जवानांच्या पराक्रम गाथा वाचून सर्वसामान्य जनतेचीही मान उंचावते. भारतीय लष्कराबाबतचा आदरभाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसंडतो. युद्धासाठी निघालेल्या आणि पराक्रम गाजवून आलेल्या जवानांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर, बसस्थानकावर उत्स्फूर्त असे स्वागत पाहायला मिळते. जवानांचे ठिकठिकाणी आरती ओवाळून आणि कुंकूम तिलक लावून जल्लोषाने, प्रेमाने, अभिमानाने स्वागत होते.

सैन्याला जागा मिळणे कठीण होते
भारतीय जवानांबद्दलचे हे प्रेम, आदर, आपुलकी युद्धकाळ संपल्यानंतरही का दिसून येत नाही? देशात अनेक भागात लष्करी प्रकल्पांना जागा देण्यासाठी विरोध होतो. लष्कराकडे असलेल्या जागा काढून घेण्यासाठी आंदोलने होतात. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याच्या असलेल्या जागा लष्कराला तळ उभारण्यासाठी हव्या असतात. पायदळ, हवाई दल, नौदल यांच्या विविध प्रकारच्या गरजा असतात. देशाच्या दृष्टीनेही त्या गरजा पूर्ण होणे महत्त्वाचे असते तरीही त्यासाठी जागा मिळणे कठीण होते. बंगलादेश सीमेवर कुंपण लावायला जागा मिळत नाही. काही राज्यात लष्कराच्या सरावासाठी असलेले फायर रेन्जही बंद करण्याचा प्रकार घडला आहे.

देशाच्या सीमेवरील दुर्दशेला सैन्य जबाबदार नाही. हे गेल्या ३० वर्षांत जन्माला आलेल्या तरुणांना माहीत नाही. सैनिकी नेतृत्वाचा सल्ला मानला असता तर काश्म‌रची समस्या निर्माण झाली नसती. शिवाय तिबेट बफर स्टेट म्हणून कायम राहिले असते. चीनच्या विस्तारवादाला पायबंद बसला असता. सैन्याधिका‍ऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष, तत्कालीन सरकारने केलेला युद्धसामग्री खरेदी घोटाळा, अपु‍ऱ्या साधनसामग्रीसह लढणा‍ऱ्या भारतीय सैन्याला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय सैन्याने १९६५ चे युद्ध जिंकूनसुद्धा हाजीपीरसारख्या महत्त्वाच्या पासचा ताबा सोडून देण्यात आला. १९७१ चे युध्द जिंकुन सुध्दा आपण पाकिस्तानला वठणी वर आणु शकलो नाही.

सैन्य सध्या काय करते?
भारतीय सैन्य युद्ध सुरू नसताना आज २०१५ मध्ये नेमके काय काम करते असे प्रश्न अनेकांना पडत असतील. युद्ध सुरू नसतानाही देशाच्या सीमेवरती शत्रुराष्ट्रांकडून सातत्याने सुरू असलेल्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम भारतीय सैन्य करत असते. सैन्य रोजच अपारंपारिक युध्द खेळत आहे. पारंपारिक युद्ध होत नसल्याने सध्याच्या परिस्थितीत भारतीय सैन्य देशाच्या सीमेचे रक्षण कसे करते हे सामान्य लोकांना माहित नसते. याउलट अनेक देशद्रोही संस्था, उदारमतवादी संघटना(??) सैन्यावर खोटेनाटे आरोप करून सैन्याचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या परिस्थितीत सैन्याची काही गरज नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. कश्मीरमध्ये घडलेल्या कोणत्याही अतिरेकी चकमकीला देशद्रोही स्वरूप देऊन सैन्य तिथल्या सामान्य नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे दाखविले जाते. १९७१ च्या लढाईनंतर सैन्याने कोणत्या लढाया लढल्या आहेत? पंजाबमध्ये‘ ८० ते ९० च्या दशकातील ऑपरेशन ब्ल्यूस्टार, ऑपरेशन रक्षक, ‘ऑपरेशन अव्हर्ट कसे लढले गेले?जम्मु आणि कश्मीरमध्ये १९८४ पासुन चालु असलेले छुपे युद्ध, ईशान्य भारतात बंडखोरीविरुध्द गेले ६६ वर्षे सुरु चालु असलेले ऑपरेशन हिफ़ाझत, देशाच्या बाहेर भुतानमध्ये ऑपरेशन ऑल क्लीयर, म्यानमारमध्ये ऑपरेशन गोल्डन बर्ड, भारत-चीन सीमेचे रक्षण, पारंपारिकयुध्द आणी अणूयुद्धासाठी तयारी या विषयी आपण पुढच्या लेखात बातचीत करु.

काय करावे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून सैन्य व सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबाबत साद्यंत अहवाल प्रसिद्ध करावा, सैन्याच्या कामगिरीचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ट करावा. प्रसारमाध्यमांनी सैन्याच्या कामगिरीला सकारात्मक प्रसिद्धी द्यावी. हे सर्व झाले तर या देशातील सामान्य नागरिकांमध्ये सैनिकांबद्दल आदर, प्रेम निर्माण होऊन त्यांच्या प्रती कर्तव्यातही ते मागे राहणार नाहीत.

भारताचा इतिहास, किमान १९४८, १९६२, १९६५, १९७१ व १९९९ मधील युद्धांची पार्श्वभूमी, सैन्याची कामगिरी आणि युद्धाची फलश्रुती इ.चा समावेश अभ्यासक्रमात करावा. सीमेवर जवान डोळय़ात तेल घालून या देशाचे कसे रक्षण करतात, ही भावना आपल्या मनामनात पोहोचलीच नाही. विविध चित्रपटगृहांतून पूर्वी जसे ‘भारत समाचार चित्र’ दाखवले जायचे, त्याच पद्धतीने सीमेवरच्या जवानांवर एक दहा मिनिटांची चित्रफित संरक्षण खात्यानेच आयोजित केली तर या सैनिकांबद्दलची ओढ जनतेला निश्चित निर्माण होईल. सलग पहारा करणारा भारतीय जवान बघितला की, त्या जवानाबद्दलचा आदर वाढल्याशिवाय राहणार नाही. पूर्वेकडच्या सीमेवर बर्फाळ प्रदेशात थंडी-वा-याची पर्वा न करता सीमेचे रक्षण करणारा आपला जवान तोही चित्रित करून जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला तर देशांतर्गत स्वास्थ्य आणि शांतता या जनतेला अनुभवता येईल. त्याचे मूळ श्रेय कोणाचे आहे, हे तरुण पिढीला जाणवणे गरजेचे आहे. मनोहर पर्रिकरांना संरक्षणमंत्री झाल्यानंतर जी भावना तीव्रपणे जाणवली त्या त्यांच्या भावनेचे स्वागत केले पाहिजे. विशेषत: तरुण पिढीला देशातील सेना दले किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमेचे रक्षण करतात, हे एकदा दाखवले तर निश्चितपणे तरुण मनावर त्याचा चांगलाच परिणाम होईल. संरक्षण मंत्र्यांना वादात ओढण्याचा प्रयत्न माध्यमांच्या गटाकडून वारंवार होतो आहे. त्यांच्या भाषणाचा मतितार्थ लक्षात न घेता त्यांच्या एखाद्या विधानाचा नकारात्मक अर्थ लावून त्यांना अकारण वादात ओढणे चुकीचे आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..