नवीन लेखन...

ब्रिड डेव्हलपमेंट – एक लालसा

देशी गोवन्श पालन मध्ये आजकाल खूप फेमस व ऐकायला व बोलायला सुखकारक वाटणारा मजेशीर शब्द म्हणजे ब्रिड डेव्हलपमेंट. आमच्या गोशाळेत अनेक महान लोक भेटीसाठी नेहमी येत असतात. ज्यांना गाई म्हणजे काय? हे साधे माहित नसते, पण त्यांचे बोलणे ऐकले कि थक्क व्हायला होते. आम्ही अमुक ठिकाणी अमुक जातीच्या गाईचे तमुक इतके {किमान 25 वर} लिटर दूध पाहिले वगैरे वगैरे.

प्रत्यक्ष पत्ता यातील 99% लोकांना माहित नसतो कारण हे एक सांगीवांत असते. मुळात या बाबतीत आमचे म्हणणे खूप वेगेळे आहे. अनेक लोकांना ते पटत असेल किव्हा पटावेच असा आमचा हेतू अजिबात नाही. देशी गोवन्श हा मुळात दुधा साठी नाही. हे आधी आपण आपल्या मनात पक्के केले पाहिजे. गाई पासून मिळणारे पंचगव्य हे तिचे आपणाला मुख्य देणे आहे. बोनस म्हणून आपण दुधाची अपेक्षा केली पाहिजे.

पूर्वीचे गोपालन याच बेस वर सुरु होते म्हणून तेव्हा लोक व गाई दोन्ही खुशीत व सुखात होत्या. नंतर हे जास्त दूध देणारे प्राणी येऊ लागले तसे आपले लक्ष आमच्या या गोमातेच्या कासे कडे गेले व मग आम्ही सुद्धा तिच्या कडून अवास्तव्य अपेक्षा करायला लागलो व आमच्या गोवन्शची व आमची हानी करून घेऊ लागलो.

अनेक पिढ्या नासविल्या, त्यांना अनेक विदेशी जातींसोबत ब्रीडिंग केले व मधील जवळपास 3 दशकातील 4 पिढयांची आम्ही वाट लावली. काही जाती तर आम्ही नामशेष करून टाकल्या. का ?? तर फक्त दूधासाठी, व नंतर कंटाळून या गाई आम्ही कसायाच्या दारात उभ्या करून मोकळ्या झालो.

काय अधिकार होता आपल्याला निसर्गाच्या या कालचक्रात आपले {मूर्ख} डोके घुसवण्याचा ??

कोणी अधिकार दिला होता तो गोवन्श संपवण्याचा??

आपल्या अति लालचेने हा बळींचा मेळावा आपणच भरवला होता व आता हि तेच होताना दिसत आहे.

आमच्या गोमातेला आता कुठे सुखाचे दिवस येत आहेत. लोक आत्ता तिच्याकडे वळायला लागले आहेत. अभ्यासाअंती व अनेक निष्कर्ष अंती तिचे महत्व अधोरेखित होत चालले आहे. पण आमची निद्रिस्त चेतना पण पुन्हा दूध वाढ याच संकल्पनेने जागी झाली आहे. फार काळजी वाटते जेव्हा हा शब्द कानी पडतो…

“तुमची  गाय किती दूध देती ” ??

व तेव्हा जास्तच वाटते जेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो  ” आमची गोमाता 7 ते 10 लिटर दूध देते” तेव्हा त्यांचे ओशाळलेले व काहीसे तिरस्कारिक छटेचे त्यांचे चेहरे पाहतो, तरी त्यातला एखादा जाणकार म्हणतोच .

” काय हे गुरुजी 10 वर्ष काम करताय व तुम्हाला गाय 20 लिटर च्या पुढे न्हेता नाही आली “?? छ्या… व या एका शब्दाने आमच्या गोपालनाची पुरती विल्हेवाट लावतो .

आम्ही आजही लोकांना हेच सांगण्यात मग्न आहोत कि गाय हि दुधासाठी नसून तिच्या गोमय , गोमुत्रासाठी आहे .

त्यात खरी ताकद आहे. आपली शेती, मती, गती जर वाढवायची असेल तर नुसते दूध वाढवून उपयोग नाही तर त्या माऊलीच्या वात्सल्याचे गुण वाढले पाहिजेत .

याचे उदाहरण असे….

जर आपण ब्रिड डेव्हलप करत गेलो कि आपण त्या कडे फक्त आणी फक्त दुधाचे मशीन याच नजरेने पाहत जातो. ज्यामुळे तुमचे आणि तिचे नाते एका ठराविक स्वार्थावर जिवन्त राहते कि तू मला जेवढे दूध देशील तेवढे तुला खाद्य मिळेल व हाच स्वभाव के त्या माऊलीच्या मनात, नंतर तनात, व कालांतराने दुधात जातो.

यावर विचार करून बघा….

मुळातच सध्या जगात किती स्वार्थी पणा आहे हे आपण पाहतो आहे. जर अश्या वेळेस हे दूध आपल्या शरीरात गेले तर त्याचे मनावर होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू ??

मान्य… मातेचे दूध उत्तम… पण सायन्सने हे सिद्ध केलेले आहेच कि तिची मनस्थिती हा विषय सुद्धा महत्वाचा आहेच.

जसे आपल्याला {स्त्रीत्वाला } नियम लागू होतात कि गर्भावस्थेत असताना तिच्या मनावरील विचार तिच्या गर्भावर जातात व तिच्या दूध प्राशनाने ते सबळ होतात तोच विषय इथे आहे.

म्हणून आम्हाला ब्रिड डेव्हलपमेंट या शब्दाची भीती वाटतेय.

— श्री प्रतिक उमेश भिडे (गुरुजी)
मोरया गोसंवर्धन

वाटेगाव
९८९००८२०४५

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..