नवीन लेखन...

फिडेल कॅस्ट्रो

मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका तरुण वकिलाने त्याचे नाव होते फिडेल कास्त्रो . लष्करी राजवट उलथविण्यासाठी फिडेलने देखील शस्त्र उचललि. अनेक घडामोडी घडून सत्तेची सूत्रे कॅस्त्रोच्या हातात आलि. कॅस्त्रोने सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपन्यांची हकालपट्टी सुरु केली,हे पाहून सोवियत रशियाचा क्युबामधील रस जागा झाला.

तत्कालीन सोवियत अध्यक्ष निकिता कृश्चेव यांनी “साम्यवाद स्वीकारल्यास रशिया क्युबाला सर्वतोपरी मदत करेल असा निरोप कॅस्त्रोंना पाठविला ज्याला त्यांनी मान्यता दिली.अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून ९० किमी अंतरावर रशियन कळपातला साम्यवादी क्युबा अमेरिकेच्या डोळ्यात सलू लागला.क्युबन अध्यक्ष फिडेल यांना मारण्यासाठी साठि सी आय ए ने १०/१५ वेळा जीवघेणे हल्ले केले परंतु त्यातून कॅस्त्रो सहीसलामत वाचले.

इकडे रशियाने गुपचूप कारवाइद्वारे क्युबात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र तळ उभारायचे ठरविले ,त्याकाळात अमेरिका क्युबन समुद्रात जहाजांवरिल विमानांद्वारे गस्त घालत असल्यामुळे इतकी मोठी मोहीम सुरवातीला त्यांच्या नजरेतून निसटली.परंतु ६२ च्या सप्टेंबर मध्ये अमेरिकी विमांनाना सहा रशियन जहाजे मोठ्या कंटेनरसह क्युबाच्या दिशेने जाताना दिसल्याचा रिपोर्ट वर पाठविला गेला.

त्याआधी चार वर्षे रशियाने इल्युजन २८ हि बॉम्बर विमाने मित्र देशांना वाटल्याचे अमेरिकेला माहित होते त्यामुळे १४०० किमी प्रहार मर्यादा असलेली किमान २१ विमाने क्युबाला पाठविण्यात आली असल्याचा निष्कर्ष अमेरिकेने काढला जो खळबळ माजविण्यास पुरेसा होता. आता अंदाजपंचे काम करण्यापेक्षा बंदी घातलेल्या यु-२ या हेरगिरी विमानांना अमेरिकेने मोकळे सोडले. ज्यात उच्च दर्जाचे कॅमेरे बसविलेले होते. या विमानांनी भरारी मारून त्यातल्या फिल्म्स सी आय ए च्या ताब्यात दिल्या. मोठ्या प्रोजेक्टरवर त्याचे निरीक्षण करून तपासणी करण्यात आली, दोन दिवस हे काम चालू होते. एका तज्ञाच्या लक्षात एक क्रेन सारखी लौन्चर्स आली,जी १९०० किमीच्या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्रा साठी वापरली जात. त्याच फिल्ममध्ये ५०० सैनिक मावतील एवढे तंबू,क्षेपणास्त्र वाहक वाहनं,आठ क्षेपणास्त्र ,इंधनाचे tankars आदी दिसत होते. तिथे सुरु असलेले काम ४००० किमी मारक क्षमता असलेल्या तळाचे सुरु आहे हे लक्षात येताच सर्वांचे धाबे दणाणले .

तज्ञांनी आपले निष्कर्ष सुरक्षा सल्लागारांसमोर मांडले,त्यांनी लगेच अध्यक्ष जोन केनेडी यांची भेट घेऊन स्थिती स्पष्ट केलि. अध्यक्षांनी चेहर्यावर चिंता न दाखविता त्या दिवसाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पाडले. दुसर्या दिवशी महत्वाची बैठक पार पाडली ज्यात सर्व निर्णय केनेडिंवर सोपविण्यात आला. रशियाच्या या हालचालिंकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना प्रतिकार करणे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर होते. लोटांगण घालायची सवय लागल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरले असते,तर युद्धाला तोंड फोडल्यास अणु युद्धाला प्रारंभ होणार होता. जगाचे भवितव्य धोक्यात आले होते. केनेडिंनि कठोर वृत्तीचे प्रदर्शन करून अमेरिकी सैन्याला डिफ़कोन-३ चा आदेश दिला. हा आदेश म्हणजे युद्ध हालचालिंना सुरवात करायची होति. या आदेशाच्या पाच पायऱ्या असतात.डिफ़कोन -५ म्हणजे शांतता काळ,डिफ़कोन -२ म्हणजे युद्धासाठी तयार राहाणे आणि डिफ़कोन -१ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरवात.

आंतरखंडिय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तयार ठेवण्यात आली,पाणबुड्या जगभरातील आपापल्या नेमलेल्या जागेवर निघाल्या,तीन विमानवाहू जहाजे,पाच विनाशिका,एक गायडेड मिसाईल क्रुजर,आणि ६ युद्ध नौकाना क्युबन समुद्राची नाकेबंदी करायची होती त्यांना डिफ़कोन -२ चा आदेश होता व गरज भासल्यास डिफ़कोन-१ चा आदेश आल्यावर प्रत्यक्ष हल्ला करायचा होता.

२२ ऑक्टोबरला केनेडिंनि अमेरिकन जनतेला उद्देशून भाषण केले त्यात जनतेला परिस्थितीची कल्पना देण्यात आलि. त्यात रशियाला इशारा देण्यात आला. हे भाषण म्हणजे युद्धाला प्रत्यक्ष तोंड फोडण्याची तयारी होति. या भाषणा नंतर अचानकपणे रशियन अध्यक्ष कृश्चेव यांनी एक पाऊल मागे घेऊन,क्युबाची नाकेबंदी दूर केल्यास आणखी क्षेपणास्त्रे क्युबात न पाठविण्याची तयारी दाखविलि.

परंतु यात आधीच पाठविलेल्या अण्वस्त्रांबद्दल उल्लेख न्हवता,अमेरिकेला हा प्रस्ताव मान्यच न्हवता. २४ ऑक्टोबरला क्युबाला निघालेल्या २५ रशियन जहांजापैकि १२ रशियन नौका अमेरिकन युद्ध नौकांच्या समोरासमोर आल्या. त्यात त्यांना सुरक्षा देणारया पाण बुड्याहि होत्या. त्यांना अडविण्यात आले. सुदैवाने रशियन जहाजे पुन्हा माघारी गेली,कुणि चुकून जरी एक बटन दाबले असते तर जगाने न भूतो न भविष्यति असा संहार पाहिला असता. ज्यात संपुर्ण मानवजात नष्ट झाली असति.

परंतु माघार घ्यावी लागलेल्या क्रुश्चेवनि अमेरिकेची हेरगिरी करणारी दोन यु-२ विमाने पाडून आपला राग व्यक्त केला. यावर केनेडिंनि संयम दाखविला कृश्चेवनि केनेडिंपुढे एक प्रस्ताव ठेवला त्यात तुर्कस्तानात असलेली क्षेपणास्त्रे अमेरीकेनी काढुन घ्यायची व त्याबदल्यात रशिया क्युबातील क्षेपणास्त्रे काढुन घेईल असे सांगितले. केनेडिंनि याला नकार देऊन बिनशर्त माघार घेण्याचा इशारा रशियाला दिला. क्रुश्चेवनि याला काहीच उत्तर दिले नाही,नाईलाजाने केनेडिंनि डिफ़कोन-२ चे आदेश सैन्याला दिले. पण डिफ़कोन-१ चा आदेश देण्याची वेळच आली नाहि. २८ ऑक्टोबरला निकिता क्रुश्चेव यांनि क्युबातील अस्त्रे काढुन घेत आहोत असे जाहीर केले.

परंतु यात रशियाच्या बाजूने माघार घेतली गेली असली तरी ३० ऑक्टोबर १९६२ हा दिवस प्रत्यक्ष युद्धाचा दिवस म्हणून अमेरिकन अध्यक्षांनी निश्चित केला होता हे नंतर उघड झालेल्या कागदपत्रांत कळाले. त्या काळात ४/५ हजार अणुबॉम्ब असलेल्या या देशांनी संपूर्ण मानवजातीचे भवितव्य आपल्या साम्राज्यवादाच्या हव्यासापोटी पणाला लावलेले होते.

जय हिंद
तुषार दामगुडे

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..