नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दोन

आयुषोवेदः आयुर्वेदः

आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र.

आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र.
याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान.

आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा.

जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोग.

हे रोग होऊ नयेत यासाठी स्वस्थवृत्त आणि रोग झाल्यानंतर रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवणे यासाठी व्याधीमोक्ष असे दोन प्रमुख अभ्यासाचे विषय आहेत. याची योग्य सांगड घालता आली पाहिजे.

या आरोग्यटीप लिहिण्याचे कारणच हे आहे, की सर्वांना हे स्वस्थवृत्त आणि व्याधीमोक्ष समजून द्यावे.
जगण्याचे छोटे छोटे नियम सांगणाऱ्या आरोग्यटीपा म्हणजे स्वस्थवृत्त.
आणि ज्याला त्याला झटपट उपाय हवा असतो. त्यांना जे घरगुती आरोग्य सल्ले दिले जातात, ते व्याधीमोक्ष. ( घरगुती सल्ले म्हणजे परिपूर्ण आयुर्वेद नव्हे हो, उगाच शब्दांचा छळ करू नका. )

नळाला पाणी खराब येते याचे कारण न शोधता, नळच बदलून बघूया असा सल्ला देणारे, आजचे अजब पाश्चात्य वैद्यकीय तंत्र.

हो आणखीन एक मोठ्ठा गैरसमज. आरोग्यटीपेमधे पाश्चात्य तंत्रज्ञानाला, त्यांच्या संशोधक वृत्तीला, काहीही किंमत नाही. असे पण नाही. जे योग्य आहे ते योग्यच ! पण जर आपले मूळ भारतीय आरोग्य शास्त्रच या पाश्चात्य विचाराने घराबाहेर काढले जात असेल आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात असेल तर

यात कोण चुक कोण बरोबर असा प्रश्नच नसतो. प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सर्वच विकृत आणि चुकीचे दिसू लागते.

आयुर्वेद हे थोतांड आहे. शास्त्रच नाही. फक्त पाळेमुळे. अंधश्रद्धा !
आयुर्वेद हा कुठलाही आजार बरा करू शकत नाही. इन्स्टंट तर नाहीच नाही. ह्यात फक्त दिनचर्या चांगली समजून सांगितली आहे. बाकी सगळं फेकू.

असा सूर येण्यामागे प्रचंड मोठे गैरसमज आहेत. एकतर पूर्वग्रह दूषित असणार किंवा आयुर्वेदात काय सांगितले आहे ह्याचा अभ्यास नसणार किंवा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद समजून घेतला असणार किंवा गुरूविना ज्ञान घेण्याचा प्रयत्न झाला असणार किंवा आयुर्वेदाने यांव होते, त्यांव होते, दहा मिनीटात दमा जातो, पंथरा मिनीटात कॅन्सर गायब, असले काहीतरी ‘टाॅल क्लेम’ करणारे तथाकथित कुणाला तरी भेटले असणार ! स्वयंघोषीत वैद्यांची काही कमी नाही. जे पारंपारिक वैदू औषधे देतात, त्यांना शरीरशास्त्र माहिती नाही, जे योगतज्ज्ञ आहेत त्यांना औषधांची माहिती नाही. जे डाएटिशीयन आहेत, त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान.
जिच्याकडे अनुभवाचा बटवा आहे, तीला पाठवली वृध्दाश्रमात, ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवी आहे, त्यांना अनुभव नाही.
उरलेल्या सगळ्यांकडे आहे फक्त अहंकार. मी सांगतोय तेवढंच बरोबर. बाकी सब झुठ.
आणि सगळ्यांना हवे आहे, जमाने के साथ चलनेवाला इन्स्टंट !

या सर्वांच्यात कडबोळ झालंय आयुर्वेदाचं !
कुणीही यावे, टिचकी मारून जावे,
काहीही सांगावे, काहीही बोलावे,
मनमानी लिहावे, वाॅटसप करावे,
अतिशहाणे करूनी सोडावे
सकल जन.
असं झालंय सगळं.

यामुळे गैरसमज वाढतात.

पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दूराभिमान
मत्सरे करी । असं समर्थांनी उगाच नाही सांगितलेलं.

आयुर्वेदाला बदनाम करण्यामधे हा झटपट दृष्टीकोन कारणीभूत आहे.

गरज आहे फक्त दृष्टीकोन बदलण्याची.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..