नवीन लेखन...

परदेशगमनाने काय मिळविले काय हरवले !

देशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते.

कुटुंबातील एखादा मुलगा परदेशात गेला की परत येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे कौटुंबिक संघर्षाला तोंड फुटते. पण अशी काही तरूण मंडळी उच्च शिक्षणानंतर मायदेशी परतून व्यवसाय किंवा नोकरी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातले बरेचसे दोन-चार वर्षानंतर पुन्हा परदेशात जातात. असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतं? प्रश्न फारच क्लिष्ट असून त्याला कारणंही बरीच आहेत. दोष कुणाला द्यायचा? यात कोण बरोबर कोण चूक हे ठरवता येणे कठीण आहे.

तरुणाईच म्हणणं असं आहे की भारतात स्वत:चा व्यवसाय करायचा म्हंटला आणि त्यासाठी अतोनात कष्ट घ्यायची तयारी असली तरी संधीची वानवा, एनओसी व ततसम परवाने मिळवताना करावा लागणारा भ्रष्टाचार, लाचलुचपत, शाळांमध्ये मुलांना प्रवेश असो किंवा पाईपगॅस यांची कनेक्शन्स मिळवण्याचं काम असो, वशिलेबाजीचा अनुभव येतो, चांगल्या नोकऱ्यांसाठी प्रचंड स्पर्धा, सामाजिक जाणिवेची कमतरता त्यामुळे अस्वच्छता, रात्यात थुंकणे, कचरा टाकणे असे प्रश्न पाश्चात्य जगात भेडसावत नाहीत आणि याचीच तुलना भारतातील तरुण करतात. त्यातून मग परदेशात कायम वास्तव्य करण्याच्या बेत आखला जातो आणि परदेशात घर घेण्यासाठी हप्त्यांच्या स्वरूपात डॉलर मोजून स्वत:चे घर होतं. एक किंवा दोन गाड्या, अलिशान रहाणीमान, एसी, फ्रीज, फोन, इलेक्ट्नॅनिक वस्तू, उत्तम अन्न व कपडे यांची सुबत्ता जोडीला असतेच.

परदेशात स्थायिक होणाऱ्यांना मुलांना दोष देण्यापूर्वी लहान खेड्यातून मोठ्या शहरात येणारे विद्यार्थी उच्चशिक्षित झाल्यावर शहरात राहणं का पसंत करतात याचा विचार केला तर वरील प्रश्नांची उत्तरे मिळतील. खेड्यात परत जाऊन कच्चेरस्ते, लोडशेडिंगची बेभरोशी वीज, नळातून येणारं अशुद्ध पाणी, कच्ची घरं, अनेकदा शहरी मुलभूत सेवा-सुविधांचा अभाव या सगळयांचा सामना करत लहान खेडेगावात जाऊन राहण्याची इच्छा कितीजण दाखवू शकतील? अर्थात या दोन्ही उदाहरणात एक मूलभूत फरक आहे. खेड्यातून शहरात येणारा माणूस रहाणी बदलली तरी आपल्याच देशात, साधारण आपल्याच संस्कृतीच्या लोकात राहतो. मनात येईल तेंव्हा खेडेगाव-शहर हा प्रवास करू शकतात. आपल्या मुलांपासून, आई-वडिलांपासून वेगळी होत नाहीत. पण हे मुलांना समजत नाही हीच खंत परदेशात राहणाऱ्या मुलांच्या पालकांना रात्रंदिवस सतावते.

परदेशात राहण्यानी आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टींमध्ये स्थैर्य निर्माण होतं. चांगले रस्ते, कमी प्रदूषणाच्या समस्या, जीवनावश्यक गोष्टींची मुबलकता आणि चांगला दर्जा. कमी तणावाचे मुलाचं शालेय शिक्षण, चांगल्या दर्जाची घरे, गाड्या आणि सुरक्षितता? ह्या सर्व घटकांमुळे परदेशात गेलेली तरुणाई तिथल्या राहणीमानाच्या प्रेमात पडतात. जसा काळ पुढे सरकतो तसं त्यांना मायदेशी परत आल्यावर सामना कराव्या लागणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीच अधिकाधिक दडपण येऊ लागतं आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. त्याच बरोबर मुलं जन्मापासून तिथंच वाढली असल्याने त्यांच्यासाठी भारतात परत येणे हा मोठा आणि धाडसी निर्णय ठरू शकतो. कारण त्यांनाही आपल्या देशातील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार असतं आणि त्याच गोष्टींना त्यांचा नकार असतो.

काही पालक त्यांची मुलं चौदा-पंधरा वर्षांची झाली की मायदेशी परत येतात. कारण परदेशात बॉय फ्रेंड/गर्ल फ्रेंड ह्यांचं प्रस्थ मोठं असतं आणि आपल्या मुलांच्या बाबतीत असले प्रकार घडू नयेत अशी ह्या पालकांची धारणा असते. काही तरुण दीर्घकालीन परदेश वास्तव्यानंतर बदलून जातात. त्यांचा मूळ गाभा, आत्मा बदलून जातो. त्यांची मायदेशाशी असलेली नाळ तुटते येथल्या जीवन शैलीशी जुळवून घेणे कमी प्रतीचे आणि प्रशस्त वाटत नाही. अशी तरुणाई कधीच मग मायदेशी परत येत नाही. एक उदाहरण देतो; येथे आयटी कंपनीत काम करणारा मुलगा/मुलगी सकाळी घर सोडतो/सोडते पण रात्री परत येण्याचे नक्की नसते. तोच तरुण/तरुणी परदेशात रस्ते चांगले आणि इंधन स्वत असल्याने २००-३०० किलोमीटर रोज स्वत:च्या वाहनाने प्रवास करून अगदी सकाळी वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचतो आणि संध्याकाळी ६.३० ते ७ वाजता घरी चहा प्यायला हजर असतो.

आपणा भारतात उच्च शिक्षण घेतलं आणि परदेशात गेलो तेथे खूप पैसा कमावला पण त्याचा उपयोग आपल्या देशातील होतकरू, आर्थिकदृष्ट्या गरीब बहिण-भावांना आणि मातृभूमीला होणार नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग? बुद्धिमान मुलं भारतात राहायला सुरवात झाली तर मग परिस्थिती बदलणार नाही का? हो त्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावे लागतील. चांगल्या घरात राहायला सर्वांनाच आवडतं, परंतु इमारतीमधील अलिशान २-३ बेडच घर असावं की आपलं जुनं घर चांगलं बांधण्याचा प्रयत्न करायचा? आपलं जुनं घर नवीन घराइतक कदाचित सुंदर नसेल नसेल पण आपल्या देशातील वास्तव्याने इथल्या परिस्थितीत एक सहस्त्रांश जरी फरक पडला तरी मातृभूमीचे थोडे तरी पांग फेडण्याचे पुण्य पदरी पडेल ना? हे सुख, जिव्हाळा  किती महत्वाचा आहे? शेवटी समाधान मानण्यावर आहे.

केंद्र आणि राज्यात आलेलं नवीन सरकार यावर गांभीर्याने विचार करून योग्यती पावले उचलण्याच्या प्रयत्नात आहे पण त्यासाठी आपल्याला सरकारला वेळ देऊन संयमानी वाट पहावी लागेल. इतकी वर्षे नाहीका वाट बघितली?

परदेशात राहून स्वत:च्या आई-वडिलांची जबाबदारी उचलणार का, आणि कशी हे प्रश्न गौण आहेत कारण भारतात राहूनही काही मुलं आई-वडिलांची जबाबदारी घेत नाहीत तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. आपल्या करीरीअरच्या नादात आपल्या जन्मदात्यांना विसरणार असू, त्यांची योग्यती देखभाल घेणार नसू, हवं नको ते बघारणार नसू, आपुलकीने संवाद साधणार नसू  तर त्या परदेशातील हुजरेगीरीला काही अर्थ राहणार नाही. तरुणाईला एकच सांगावेसे वाटते की तुम्हीं परदेशात राहिलात तरी आपल्या मातृभूमीला, आई-बाबांना, बहिण-भावांना कधीही विसरू नका. आई-बाबांच्या कष्टामुळेच तुम्हीं एवढी मजल मारली आहे.

वरील संदर्भांना उचित असे ‘जिव्हाळा’ या चित्रपटातील गाण्याच्या चार ओळी नमूद केल्याशिवाय राहवत नाही. कारण हे सगळे जीव्हाळ्याशी निगडीत समस्या आहेत.

‘या चिमण्यांनो परत फिरा रे,
घराकडे आपुल्या जाहल्या…
तिन्हीसांजा जाहल्या’

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..