नवीन लेखन...

नारळ….. खोबरं

खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या…

तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली…

दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली….

यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार…

आता या प्रत्तेक तऱ्हेच्या माडाच्या झाडाचे खोबरे वेगळ्या चविचे… वेगऴ्या टेक्सचर चे.. त्यात ताजे नारळ, कोटार, कुत्रेकोटार., वांझ… हे प्रकार आगळेच.

साधारण माश्याच सार, पिठी, पालेभाजी,गुळचून यासाठी मळ्यातला नारऴ वापरला जातो. तर मटण, भाजणीच्या आमटीसाठी भरडी नारळ… करंजीच्या साठ्यासाठी खास घुडघूडी…

त्यात कढीसाठी काही स्पेशल माडाचे नारळ … आणि तो बदलला तर कढीची चव बदलते… मग जेवणावर एखादी मालवणी शिवी हमखास….
आता शहाळं कुठल्या माडाचं खायचं त्याचही खास तंत्र.. प्रत्तेक झाडाची चव वेगळी… त्यात तांबड्या माडाची स्पेशल…पण मालक समोर असेल तर तोच सांगणार..आता सिंगापुरी माड झालेत पण शाहाळ्यासाठी ते मस्तच. कुठल्यापेंडीची किती शाहाळी काढायची… नारळ सुद्धा झाडाखालून मालक सांगेल तेच काढायचे…. एक सुंदर तंत्र… शास्त्र. पिढीजात चालत आलेले… त्याच्यात म्हाल पेंड…. आणि धारेची पेंड… हे खासच….

आवयेल… खास मालवणी तेल तांबडया माडाच्या खोबऱ्याच्या रसापासुन तयार केलेले. घरगुती…. पण त्याची क्रूती पण विस्म्रूतीत गेलीय….
तेलासाठी घुडघुडी बारीक करून उन्हात वाळवत घातल्यावर अचुक पुर्ण सुकलेले पण मऊ गोड आणि खाण्यास योग्य अशी कातळी जो ऊचलतो .. तो मात्र खरा दर्दी….

आणि ज्याच्या घरात 2. 4 लिटर खराब खोबर्याचं तेल निघतो तो खरा बागायतदार…

यातही… फक्त नारऴाचा आकार त्यातलं पाणी, रंग.आणि किशी बघून आतल्या खोबर्याविषयी अचुक सांगणारे ज्योतिषी ही याच कुऴातले….

तर असं हे खोबरं पुराण विस्तारभयास्तव आटोपते घेतोय…

बापूर्झा
डॉ. बापू भोगटे….

डॉ बापू भोगटे
About डॉ बापू भोगटे 13 Articles
डॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..