नवीन लेखन...

नराधमांचे क्रौर्य



 लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे हातपाय तोडून कृत्रिमरित्या अपंग करून त्यांचा भीक मागण्यासाठी उपयोग करण्याचे काम नगर जिल्ह्यात चालते. अगदी राक्षसी प्रवृत्तीलाही लाज वाटेल असे हे क्रौर्य राज्यात सुरू असताना पोलिस यंत्रणा काय करते, हा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. एखाद्या घरातील लहान मुलाचे अपहरण झाल्यानंतर त्या घरातील त्या लहान मुलाचे आई-वडिल त्याचे नातेवाईक यांची काय अवस्था होते, हे आपल्याशी संबंधित घटना घडली तरच कळते. लहान मुले ही देवाघरची फुले असतात, असे आपण नेहमी म्हणतो. खरोखरेच ती निष्पाप असतात. कोणाच्या अध्यात-मध्यात नसलेल्या या निरागस मुलांचे अपहरण करून त्यांचे हातपाय तोडून त्यांना भीक मागायला लावणे ही साधी कल्पनाच किती भयानक वाटते. मात्र हे सारे प्रत्यक्षात करणारी टोळी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे. सारखी फिरती असलेली ही निर्दयी जमात व या जमातीतील लोक हे सारखे पाळतीरच असतात. दिवसा भीक मागण्याच्या बहाण्याने घर आणि घरातील माणसांचा ठाव घ्यायचा आणि रात्री दरोडा टाकण्यासाठी आपल्या माणसांना माहिती पुरवायची असा उद्योग करणारी ही टोळी अतिशय खतरनाक आणि जराही दया-माया नसणारी आहे. रात्रीच्या वेळी या लोकांना कोणी हटकले तर धंद्यात नाट लागल्याचे कारण पुढे करीत या जातीतील लोक निरपराध लोकांना गुरा-ढोरांसारखे मारतात. यात कोणी जखमी किंवा मृत्यू झाले तरी यांना काहीही फरक पडत नाही. राज्यातील विविध ठिकाणच्या लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे हात-पाय तोडून कृत्रिमरित्या अपंग करून त्यांना उन, वारा आणि पावसात गर्दीच्या चौकात भीक मागण्यासाठी उभे करायचे. नगरमधील विविध चौकात हे दृश्य मध्यंतरी नेहमी पहायला मिळत होते. या मुलांवर देखरेख ठेवण्याचे काम एक जाडजूड महिला किंवा मुलगी करीत अस
. दिवसभरात जमा होणार्‍या पैशांतून या मुलांना काहीच न देत केवळ शिळ्या

भाकरीचा तुकडा आणि नासलेली भाजी

खायला दिली जाते. आपण साधी कल्पना करू शकत नाही, की आपल्या काळजाचा तुकडा एखाद्याने पळवून नेऊन त्याचे हातपाय तोडून त्याला भीक मागण्यासाठी अशा पद्धतीने वापर होतो. हा सामाजिक अपराध करणारे अतिरेक्यांपेक्षा भयानक आहेत. अशा क्रूर, निर्दयी लोकांना फाशीची शिक्षादेखील कमी आहे. सध्या नगरमध्ये अशी लहान मुले भीक मागताना दिसून येत नसली तरी अनेक मनोरुग्ण सध्या फिरताना दिसत आहेत. हे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्‍या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.(माझा मोबाईल नंबर- ९७६७०९३९३९)

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..