नवीन लेखन...

देव तारी त्याला कोण माती !

शेता भोवतालच्या तारेच्या कुंपणाला लावलेला शॉक लागून वाघ मेला…या बातमीवर कित्येकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया वाचत असताना मी अचानक माझ्या भूतकाळात शिरलो आणि एक भीतीदायक आठवणीत रमलो ती आठवण या शॉकशी अर्थात विजेशी निगडित आहे असं म्हणू शकतो की मी मरता मरता वाचलो. मी एक इंजिनीरिंग कंपनीत मशिनिस्ट म्हणून काम करतो बऱ्याच मशीन मला माझ्या हातातील खेळण्यासारख्या वाटतात यंत्रणेशी खेळण हा माझा छंद आहे पण त्यामुळेच एक प्रसंग माझ्या जीवावर बेतला असता सराव आणि एखाद्या गोष्टीच अती ज्ञान माणसाला बेसावध आणि किंचित  बेफिकीर करत. कित्येक पट्टीचे पोहणारे पाण्यात बुडून मरतात, आयुष्यभर सापाशी खेळणारे साप चावून मरतात वगैरे अशी बरीच उदाहरणे आहेत पण माझ्या बाबतीत जे घडले ते खरच डोळे उघडणार होत. त्यावेळी मी शेफिंग मशीनवर काम करीत होतो त्या मशीनची मोटर  अचानक बंद पडली म्हणून मी नवीन मोटर काढली आणि  बंद मोठरची वायर मोटर पासून थोड्या अंतरावर कापली आणि तीच वायर कलर कोड प्रमाणे अर्थात लाल आणि पिवळी फेसला काली न्यूटरलला आणि हिरवी अर्थिंगला जोडली आणि स्विच चालू केला पण मी मशीनला स्पर्श केला नाही अचानक माझ्या डोक्यात कोठून विचार आला देव जाणे कदाचित तो विचार देवानेच माझ्या मेंदूत जागविला असावा मी मशीन चालू असतानाही माझ्या मनात विचार आला एकदा मशीनला टेस्टर लावून शॉक वगैरे येतो का पाहावा आणि मी टेस्टर लावला आणि टेस्टर पेटला ते पाहून मला घाम फुटला कारण जर मी मशीनला हात लावला असता अथवा चुकून लागला असता तर काय झाला असत सांगण अशक्य होत मी लगेच मेन स्विच बंद केला आणि सॉकेट उगडून पाहिलं तर सॉकेट मधील नंबर कोड चुकीचा होता हिरवी वायर फेसला आणि पिवळी अर्थिंगला होती. हा एकच प्रसंग नाही भूतकाळात माझ्या बाबतीत असे बरेच प्रसंग घडलेत ज्यावेळी संभाव्य धोक्याची सूचना मला अगोदरच मिळाली आजही मिळते एक अज्ञात शक्ती नियमित माझ्या संरक्षणासाठी माझ्यासोबत असते असा अनुभव मला अनेकदा आला. मी माझ्या मित्रासोबत बाईकवरून तीन वेळा मुंबईतून घोडबंदर रोड मार्गे कल्याणला गेलो आमची बाईक त्या रोडवरील एका वळणावर एकाच जागी तीनदा बंद पडली तेव्हा मी मित्राला विचारलं तू नेहमी येथेच बाईक का थांबवतोस ? तर तो म्हणाला नेहमी ,”आपली बाईक बरोबर येथेच आल्यावर बंद पडते”. भविष्यातील धोक्यांची आणि घडणाऱ्या संभाव्य घटनांची पुसटशी कल्पना मला अगोदरच येते. माझ्या कुंडलीत मला पाण्यापासून धोका आहे आणि मला नेहमीच पाण्याचे भय वाटत आले म्हणून मी शक्यतो बोटीने प्रवास करत नाही  माझ्या लहानपणीच्या आठवणी जगवताना आई म्हणाली, दोन वर्षाचा असताना हट्ट करून आईसोबत गावाच्या ओढ्यावर कपडे धुवायला गेलो असता आई कपडे धूत असताना मी आईची नजर चुकवून पाण्यात शिरलो आणि पाण्यांच्या प्रवाहात थोडा वाहून गेलो नसेल इतक्यात  गावातील मुलींनी मला पाहिले आणि वाचविले माझे जगणे स्त्रियांच्या उपकारच्या ओझ्याखाली होते म्हणून मला इतर सर्व गोष्टी सहन होतात पण स्त्रियांवरील अत्याचार सहन होत नाही मग तो अत्याचार करणारा कोणी का असेना मी त्याची गय करत नाही. स्त्रियांच्या वेदना मी पुरुष असतानाही माझ्या डोळ्यात पाणी आणतात…माझ्यामुळे कोणा स्त्रीला किंचितही त्रास होऊ नये म्हणून मी लग्न केले नाही…माझ्या कुंडलीतील ग्रहांशी दशा पाहता माझ्या होणाऱ्या पत्नीला काही त्रास संभवतात.त्याची तीव्रता कमी कशी होईल यावर उपाय शोधतोय पण देवाने त्यापूर्वीच  तिला माझ्या समोर आणून उभं केलं तिच्याही नकळत  ! भूतकाळातील माझ्या अनेक आठवणी देव तारी त्याला कोण मारी अशाच आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा अथवा भाग्याने..

— लेखक – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..