नवीन लेखन...

दुष्ट, खडूस आई…

“आई, तू खूप मीन (खडूस) आहेस.” हे शब्दजेव्हा पहिल्यांदा माझ्या लेकीच्या तोंडून ऐकले,तेव्हा खूप वाईट वाटलं. खरंच मी खडूस, दुष्ट आहे?माझी स्वतःबद्दल ‘अतिशय प्रेमळ व इतरांना त्रास नहोऊ देणारी व्यक्ती‘ अशी प्रतिमा होती! त्यामुळे हेविशेषण ऐकून जरा धक्का बसला. पण जसजसे हेवारंवार ऐकू येऊ लागले तसतसे, तो अपमान नसूनप्रसंसा आहे, असे मी स्वतःला सांगू लागले. कारणप्रत्येक वेळी मी एखाद्या गोष्टीला “बघू” किंवा“नाही” असं उत्तर दिलं, की मला हे वाक्यऐकायला मिळायचं. मग ते इतर मुलांकडेअसलेली खेळणी, गोळ्या–चोकलेटं, कपडे, बाहेरजेवायला/फिरायला जाणं, इतरांना मिळणाऱ्यापरवानग्या किंवा अगदी मॅगी खाणं, यापैकीकुठल्याही कारणाकरता असायचं. त्यानंतर मीमाझ्या मुलींना सांगू लागले, की मी आई होणार हेकळल्यावर “खडूस” ही पदवी मिळविण्याकरता मीखास प्रशिक्षण घेतलं. आणि जसजशा त्या मोठ्याहोऊ लागल्या, तसे माझ्या या खडूस दुष्ट्पणाचेसकारात्मक पडसाद त्यांच्या जडणघडणीवर उमटूलागले.

मी लहान असतांना एखादी गोष्ट “करूया का?”, “आणूया का?” असं विचारल्यावर बाबांचं उत्तर बहुतांश वेळा “बघू” असं असायचं. तेव्हा मला त्यांचा खूप राग यायचा. जरा मोठी झाल्यावर“सरळ नाही म्हणा की!”, असे पुटपुटायचेही.त्यापैकी कुठलीच गोष्ट मिळाली नाही किंवा केलीच नाही असं कधी झालं नाही. पण या “बघू” नी आम्हाला धीर धरायला शिकवलं. “मनात आलेली किंवा दुसऱ्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही… आणि लगेच मिळते असं तर बिलकुल नाही.” हा त्या मागचा धडा होता. आणि मी स्वतः आई झाले तेव्हा तो किती मौल्यवान होता ते लक्षात आलं.

मूलं स्वाभाविकपणे आपल्या मित्र–मैत्रिणींशी स्वतःची तुलना करतात. लहान कशाला, कित्येक मोठी माणसंही आपले आयुष्य इतरांच्या “तुलनेत”जगत असतात. मग या भाबड्या पोरांच तर काय?अगदी लहानपणी खाण्या–पिण्याच्या गोष्टींकरता;वेफर्स, कोका–कोला, चॉकलेटस् यांचे हट्ट असायचे.तेव्हा तर माझा “नाही“चा जप चालू असायचा.रडून, अकांडतांडव करून बाकीच्या आया कित्ती चांगल्या आहेत हे ऐकवलं जायचं.

एका रविवारी कपाटं आवरायचा घाट घातला आणि कामवाल्या बाईनी खाडा करायचा मुहूर्त साधला. सर्व कामं उरकल्यावर, वैतागून मी “बाहेर जेवायला जाऊ” असा प्रस्ताव मांडला. मुलींनी लगेच, “आई, परवा नं संजना आणि तिचे आई–बाबा त्या नविन हॉटेलमध्ये गेले होते. खूप भार्रीSSआहे. आपण पण तिथेच जाऊया.” असं फर्मान मांडलं. मी लगेच तयार झाले. नुकतीच दिवाळी झाली होती. मुलींच्या हातात त्यांची भाऊबीजेची पाकिटं दिली व त्यातले प्रत्येकी साडेतिनशे रुपये द्यायला सांगितले. चेहऱ्यावरची प्रश्नचिन्हं सावरत दोघींनीही मला पैसे दिले. त्यांच्या बाबांकडूनही मी तेवढीच रक्कम घेतली व तेवढेच माझ्या स्वतःच्या पाकिटातून काढले, आणि “चला”म्हणून पायात चपला घातल्या. आता प्रश्नचिन्हांचं रुपांतर कपाळावरच्या आठ्यांमधे झालं होतं,कारण त्यांच्या खजिन्यातला मोठा वाटा माझ्या हातात होता. हसू आवरत मी गंभीरपणे सांगितलं, “त्या नविन हॉटेलात बुफे करता माणशी साडेतिनशे रुपये पडतात. प्रत्येकानी आपआपला खर्च करायचा. कारण आज एवढ्या भार्रीSS हॉटेलात जायला कोणाचाच वाढदिवस किंवा कुठलेच सेलिब्रेशन नाहिये!” यावर फक्त “वैशालीत जाऊया“, एवढाच प्रतिसाद मिळाला. सरळ “नाही”म्हणलं असतं तर ‘खडूस‘, ‘दुष्ट‘ चा तख्ता परत गिरवला गेला असता; पण स्वतःच्या खजिन्यावर धाड पडत्येय म्हणल्यावर, हा हिशोब त्यांच्या चटकन लक्षात आला. वास्तविक, हा खर्च आम्हाला अशक्य नव्हता. पण केवळ मला स्वयंपाकाचा कंटाळा आला होता, म्हणून आम्ही बाहेर जेवायला चाललो होतो. वैशालीचं चौघांचं मिळून बील फक्त चारशे रुपये झालं.

मुलींचं वय जसं वाढत गेलं, तसं खेळणी, ब्रँडेड कपडे, बूट, मोबाईल फोन इत्यादिंच्या निमित्तानी वारंवार नन्नाचा पाढा सुरूच राहिला. पण प्रत्येक वेळी संभाषणातून वा कृतीतून त्यांना माझ्या‘बघू‘चा अर्थ उलगडत गेला. पैशाची, वेळेची किंमत कळू लागली. एखाद्या खूप हव्या असलेल्या वस्तू किंवा कार्यक्रमाकरता वाट बघायची, कष्ट करायची तयारी वाढू लागली. फक्त खर्चाच्या बाबतीतच नाही, तर आपली वागणूक, भाषा, पोषाख, आपण घेतो ते निर्णय यापैकी कशातही अविचार,इंपल्सिवनेस नसावा अथवा इतर करतात म्हणून एखादी गोष्ट करायची असं नसावं, हे अंगवळणी पडलं. मुलं वयात येताना तर, पालक हा शत्रूच असतो. पालक सांगतील त्याच्या बरोबर विरुद्ध वागायचं हा नैसर्गिक स्वभाव असतो. या वयात हल्ली आकर्षणं इतकी वाढली आहेत, की पालकांना पळात भुई थोडी होते. विषेशतः विविध मिडिया आणि सोशल नेटवर्क साईटस् यावर नियंत्रण ठेवणं आवघड झालं आहे. आणि इथेच तर‘खडूस पालकांची‘ खास गरज असते. नुसती बंधनं न घालता, ती का घालतो आहोत, याचे धोके काय आहेत हे सांगण्याबरोबरच पालकांनी स्वतः या सोशल नेटवर्कसचा वापर मर्यादित ठेवूनच,झपाट्यानं मूलांची आयुष्य व्यापून टाकणाऱ्या या सर्व गोष्टींपासून त्यांचे रक्षण करू शकतात.

चांगले पालक होणं म्हणजे मुलांना सगळं देणं,असा एक हल्ली पालकांचा समज झाला आहे. “आम्हाला मिळालं नाही ते सगळं आम्ही आमच्या मुलांना देणार” असं बरेच पालक अभिमानानी सांगतात. आणि मग त्याच मुलानी एखादी मागणी उच्चारायच्याही आधी ती पूर्ण झालेली असते.परिणाम स्वरुपी हे ‘सगळं‘ मिळणं हा त्याचा हक्क आहे, असं त्या मुलाला वाटू लागतं आणि कुढल्याही प्रकारचा नकार सहन करायची क्षमता त्याच्यात उरत नाही. अशी मुलं अगदी सर्रासपणे हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी गैरमार्गाचा वापरही करू लागतात व कुठल्याही थराला जाऊ शकतात.याचे अगदी टोकाचे परिणाम म्हणजे प्रपोज केल्यावर मुलगी “नाही” म्हणली म्हणून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकणे, तिला जिवे मारणे, इ.अशा प्रकारात दिसून येतात. म्हणूनच अगदी लहानपणापासूनच मुलांना “नाही” म्हणून घ्यायची सवय लावणं गरजेचं असतं.

मुलांना आवश्यक त्या गोष्टी पालक पुरवतच असतात. मात्र चैनीच्या गोष्टींकरता मुलांनी थोडी वाट बघीतली, तर कुठं बिघडलं? या वस्तूची आपल्याला खरच आत्ता गरज आहे का? मित्रांकडे आहे म्हणून माझ्याकडेही असलीच पाहिजे हा हट्ट योग्य आहे का? मैत्रिणी नियमीत कॅफेमधे जातात म्हणून मीही प्रत्येकवेळी जाणं आवश्यक आहे का?असा विचार मुलांना करायला शिकवणं हे प्रत्येक“खडूस” पालकाचं कर्तव्य आहे. बाहेरच्या जगात मनासारखी नोकरी, पैसा, यश, मित्र, सहचारी किंवा सहचारीणी, कुठलीच गोष्ट अगदी सहजपणे मिळत नाही. अनेकांची प्रत्येक गोष्टीकरता धडपड चाललेली दिसते. चांगली मनासारखी नोकरी मिळणं, वा मनासारखा व्यवसाय करायला मिळणं व त्यात यश मिळणं, यासाठी कष्ट करावे लागतात.माझ्याकडे ही पदवी आहे म्हणजे मला ही नोकरी मिळालीच पाहिजे, माझे या मुलीवर प्रेम आहे म्हणजे तिनी माझ्याशीच लग्न केले पाहिजे,यासारख्या खुळ्या कल्पना घेऊन आपण आपल्या मुलांना या जगात पाठवायचं, का गरज पडल्यास नकारात्मक परिस्थीतीशी झुंज देऊन सकारात्मक आयुष्य जगण्याचं मनोबल त्यांना द्यायचं, हे आपणच ठरवलं पाहिजे नां?

– वैदेही घरत 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..