नवीन लेखन...

ते तर हिन्दू होते..!

नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र दिना’बद्दल काहीतरी लिहावं म्हणून लिहायला बसलो होतो. ह्या दिवसाबद्दल लिहायचं तर महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विभूती आणि देशरक्षणार्थ वेळोव्ळी धावलेला महाराष्ट्र याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. आणि असा आढावा घेताना पहिलं नांव चटकन मनात येतं आणि बोटातून बेशुद्धतही उतरतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं..! ह्या नांवाला महाराष्ट्रात सोडा, देशातही पर्याय नाही.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मले, घडले म्हणून त्यांना मराठी म्हणायचं, अन्यथा त्यांनी विचार आणि कृतीही केली ती अलम देशात हिन्दवी स्वराज्य अमलात आणायची. महाराजांना मराठी म्हणून महाराष्ट्रापुरतं बांधून ठेवणं म्हणजे महाराजांचा अपमान आहे आणि तो करण्याचं पातक माझ्याकडून कदापीही होणार नाही. हा देशच महाराजांमुळे शिल्लक राहिला आहे यात वाद नाही. आज तिन-साडेतिनशे वर्षांनंतरही महाराजांचं कर्तुत्व हिन्दुस्थानात वादातीत आहे. महाराजांचं नामस्मरण महाराष्ट्र दिन, त्यांची जयंती वा पुणतिथीलाच नव्हे , तर नित्य प्रात:स्मरणीय असले पाहिजेत आणि आहेतच.

महाराजांनतर देशावर आलेल्या परचक्राचा विरोध करून देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी महाराष्ट्रात जन्मलेल्या अनेक विभुतींनी पुढाकार घेतला होता. टिळक, सावरकर, फुले, कर्वे, आंबेडकर आदी महाराष्ट्रातल्या विचार करणाऱ्या डोंगराएवढ्या कर्तत्वाच्या माणसांनी केवळ देशाला स्वतंत्र्य मिळावं येवढाच मर्यादीत हेतू ठेवला नव्हता, तर या देशातील जाती-धर्मात विभागलेल्या शिक्षित-अशिक्षित समाजाला दिशा देण्याचाही यशस्वी प्रयत्न केला. महाराष्ट्रात जेवढे क्रांतिकारक, समाजसुधारक झाले तेवढे देशाच्या इतर प्रांतात झाले असतील किंवा नसतील याची मला परंतू महाराष्ट्रातील त्या काळातले राजकीय पुढारी (पुढाऱ्यांचे नेते अगदी अलिकडे झाले) किंवा समाजसुधारकानी जेवढा देशपातळीवरचा विचार केला, तेवढा इतर प्रांतातील नेत्यांनी, समाजसुधारकांनी केला नसावा कदाचित..! या महान प्रभृतींनी आपले विचार आणि आचार महाराष्ट्रापुरते कधीच संकुचीत ठेवले नाहीत.

या सर्व महापुरूषांच्या मांदीयाळीत एक नांव चटकन कुणाच्याच लक्षात येत नाही. चटकनच कशाला, विचार करूनही फार कुणाच्या लक्षात येत नाही. या माणसाने सामर्थ्यवान भारताचे व तेवढ्याच बलशाली आणि एकसंघ हिन्दू समाजाचे, त्याकाळी व नंतरही, अशक्यपाय वाटणारे स्वप्न पाहीले होते. हे व्यक्ती म्हणजे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या राष्ट्रभक्त संघटनेचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डाॅ. केशव बळीराम हेडगेवार. आज देशात एक नवचेतन्य वाहात आहे त्याचं संपूर्ण श्रेय डाॅक्टरांचं व त्यांनी स्थापन केलेल्या रा.स्व.संघाचे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश व आशा भारताचे पंतप्रधान रा.स्व.संघाचे स्वयंसेवक आहेत व या मोठ्या लोकशाहीतल्या सर्वात मोठ्या राज्याचे पुख्यमंत्री हिन्दू समाजाच्या गोरक्षनाथ देवस्थानचे प्रमुख महंत आहेत. तसेच देशातील सर्वात पुढारलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही रा.स्व.संघाचे स्वयंसेवक आहेत. असे तिन महत्याची पद विलक्षण कर्तुत्ववान व्यक्ती डाॅ. हेडगेवारांनी स्थापन केलेल्या रा.स्व.संघाच्या मुशीतून ओतली गेलेली व्यक्तीमत्व आहेत.

डाॅ. हेडगेवारांबद्ल येवढं लिहीण्याचं कारण म्हणजे आज देशातच नव्हे तर जगभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नांव व संघाचे कर्तुत्व जवळपास सर्वांनाच माहीत आहे मात्र संघाच्या डाॅ. केशव बळीराम हेडगेवार या आद्य सरसंघचालकाविषयी सोडाच, त्यांचं नांवही बऱ्याच जणाना माहीत नाही. डाॅ. हेडगेवारांचं लखलखीत यश हेच आहे. व्यक्ती नव्हे तर कार्य मोठं झालं पाहीजे हे तत्व डाॅक्टरांनी निष्ठेनं जपलं आणि आचरणातही आणलं. त्यांच्यानंत्तर पुढे संघाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतलेल्यांनीही हे तत्व जीवापाड जपले ते आजतागायत..! म्हणून संघ सर्वतोमुखी होऊनही संघाचं मातृत्व कुणाचं हे फार कुणाला सांगता येत नाही..!!

आज संघ मोठा झाला, संघाच्या कर्तुत्वाची दखल देशानेच नव्हे तर जगानेही घेतली, त्यामागे ‘व्यक्ती नव्हे तर कार्य मोठं’ हेच तत्व आहे. सन १९२५ साली स्थापन झालेली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही स्थापनेनंतर सातत्याने ९२ वर्ष वर्धिष्णू असणारी व सुरूवातीच्या आपल्या ठरवलेल्या ध्येयापासून तसुभरही न ढळलेली जगातली एकमेंव संघटना आहे. डाॅ. हेडगेवारांना आपल्या कार्याविषयी केवढा दुर्दम्य आत्मविश्नास होता..! डाॅ. हेडगेवारांविषयी मला लिहावसं वाटलं ते ह्यामुळेच..!

‘महाराष्ट्र दिना’चा लेख लिहून झाल्यावर नेहेमी प्रमाणे मी तो माझ्या पत्नीला वाचायला दिला. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या परंतू त्यांच्या कर्तुत्वामुळे अजरामर झालेल्या व्यक्ती आणि विभुतींचा उल्लेख करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव घेऊन सुरूवात केलेल्या लेखाची, डाॅ हेडगेवारांचा उल्लेख त्यांच्या नांवाने न करता ‘एक देशपातळीवरील कर्तुत्ववान मराठी माणूस’ असा करून लेखाची समाप्ती केली होती. इथं माझ्या पत्नीचा गोंधळ उडाला. तिने हा ‘मराठी माणूस’ कोण असं विचारलं. तिने जे अंदाज केले त्यावरून मी तिची आणखी परिक्षा आणि माझी तितिक्षा न पाहाता ‘डाॅ. केशव बळीराम हेडगेवार’ हे त्यांचं नांव असं सांगीतलं.

माझ्या उत्तरच्या फोडीवर तिची जी उत्स्फुर्त प्रतिक्रीया आली त्यामुळेही मला हा लेख लिहावासा वाटला. तिच्या उत्तरात डाॅक्टरांच्या आणखी एका तत्वाचा रोकडा अनुभव (इंग्रजीत याला Experience in Cash असं म्हणतात.) आला. तिला शिवाजी महाराजांचं नांव समजलं, सावरकरांचं समजलं, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, टिळक अगदी चाफेकर, वासुदेव बळवंत फडकेही. अलिकडच्या काळातले आचार्य अत्रे, एसेम जोशी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आदी जागतिक पातळीवर पोहोचलेल्या मराठी लोकांचीही तिनं नांवं घेतली परंतू डाॅ. हेडगेवारांचं नांव काही तिच्या डोक्यात व म्हणून ओठांवर येईना. मी डाॅक्टरांच्या नांवाची आठवण करून दिल्यावर ती म्हणाली, “ते कुठं मराठी होते, ते तर हिन्दू होते..!”

जाती-पातीत विभागला गेलेला हिन्दू समाजाला केवळ ‘हिन्दू’ म्हणून ओळखला जावा हेच डाॅक्टरांचं व संघाचं स्वप्न व ध्येय कुणाच्याही नकळत पूर्णत्वाला जातंय असं म्हटलं तर चुकणार नाही.

जयहिन्द..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..