नवीन लेखन...

डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे…..! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ…! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला आघात अत्यंत दुर्दैवी. किती जपलं होतं त्या फुलाला. त्या दु:खी  माईचे अश्रू सांगत होते. पण विधात्याने जे भाळी लिहिले त्याला सामोरे जाणे भाग आहेच. पण हे एकाच घरात घडले नाही. अनेकांच्या घरी या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या घातक रोगाची लागण झाली. गेले अनेक. लागण झालेल्यांची संख्या मोजता न येण्यासारखी होती. विशेषत: नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याची नोंद कुणी घ्यावी अथवा न घ्यावी परंतु आपलेच चुकत असेल तर…..! महापालिका आरोग्यसेविकांचा सल्ला ऐकत नाही. त्यांना हवं असलेले सहकार्य करीत नाहीत, अशी एक कुजबूज आहे. आपण आपल्या कुटुंबियांसाठी काळजी घ्यायला हवीच.

डॉक्टर हा ईश्वरी अंश मनाला जातो. डॉक्टर हा देव तर दवाखाना हे एक मंदिर.  कारण रुग्णाला बरं करण्यासाठी जीवाचे रान करीत असतो. म्हणून ईश्वरानंतर डॉक्टरांना देवच. यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. खरोखर डॉक्टर हे आई वडील गुरुजनानंतर चौथे पूज्यनीय स्थान म्हणावे लागेल. डेंग्यू,मलेरियाची लागण झाल्यापासून विभागातील महापालिका दवाखान्यातील डॉक्टर शिंदे, डॉक्टर जाधव  आणि  त्यांच्या सहकाऱ्यांनी  केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा गौरव करणे स्वाभाविक आहे. गरिबांनी नव्हे तर श्रीमंतांनी देखील धाव  घेतली या दवाखान्यात आणि उपचार घेतले. योग्य सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून त्यांनी उपचार केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ या दहशतवादी रोगांवर प्रतिबंध करणारे माणुसकीचे डॉक्टर आपल्या विभागात कार्यरत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.

विभागात कितीतरी डॉक्टर होऊन गेले.आजही आहेत. रस्त्याने जाताना मंदिर  दिसले तरी अदबीने नमस्कार करावासा वाटतो, त्या प्रमाणे त्या डॉक्टरांना पाहताच आपोआप हात जोडले जातात. आपणां कुणाला *डॉक्टर पांडुरंग कुलकर्णी*  आठवत असतील.नावाप्रमाणे विठोबाच, या विठोबाच्या मंदिरात सदानकदा रांग लागलेली असे.  काय राजा माणूस….! गरीबांचा डॉक्टर… पैसे नसले तरी उपचार केले त्यांनी. आपल्या श्रमजीवी लोकांचा डॉक्टर. डॉक्टर कुलकर्णीसारखे  अनेक देव विभागाला लाभले. ते ही रुग्णांचा स्थिती पाहून  उपचार करीत म्हणजे एखाद्याकडे पैसे नसले तरी इलाज करीत होते. तेव्हा परिस्थिती तशी होती. त्या वेळेस डॉक्टर रुग्णांच्या सुख दु:खाशी समरस होत होते. आजही समाजात अनेक देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात. भगवंत त्यांना शक्ती देवो. त्यांच्यामुळे आपण निश्चित आहोत आणि बरेच देव असे आहेत की,देव बनण्यात झालेला खर्च लवकरात लवकर कसा भक्ताकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म आहे असे मानतात… त्यांना भगवंत सद्बुद्धी देवो.

पण आता हेच डॉक्टर आपली मर्यादा ओलांडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खरं बोलले की, खऱ्या आईला राग येतो. हे अनुभवलेले आहे. त्यामुळे या पूज्यनीय देवांवर कडक भाषेत लिहिण्याऐवजी सौम्य भाषेत लिहावं, असं मन सांगत होते. काय करीत आहेत हे गल्लीबोळातले देव …? एक डॉक्टर आपल्या दवाखान्यात विनापरवाना औषधं विक्री करीत आहे. उपचार अधिक औषध या दोन्ही गोष्टी देऊन लुबाडत आहे. आता या डॉक्टरला सौम्य भाषेत सांगायचं की, आपला बडगा दाखवायचा. अनेक डॉक्टर अनैतिक स्वरूपाचे व्यवहार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. वृध्द असतात. चालू शकत नाहीत किंवा अन्य कारणाने डॉक्टरला घरी बोलाविण्यात येते तेव्हा एक डॉक्टर विभागातल्या विभागात  घरी भेट द्यायचे ५०० रुपये आकारत आहेत. हे बरोबर आहे का …? काही  डॉक्टर केवळ रजेचे दाखले देण्यासाठी बसलेले आहेत. दिवसापाठी रुपये २० आकारीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोनशे अडीचशे पगार वाल्यांनी काय करायचे.   काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरने मयत दाखला देण्यासाठी ५०० रुपये घेतले. एका रुग्णाला डॉक्टरने जागचे हलायचे नाही. एकाच जागी पडून राहायचे, आराम करायचा, सल्ला दिला. पेशंटला थोडासा त्रास होऊ लागला. तेव्हा एक दोन मिनिटावर असलेल्या डॉक्टरला सांगितले त्याने बेधडक सांगितले. मी एम डी आहे. माझी फी परवडणारी नाही. घर एक मिनिटावर असो वा दहा मिनिटावर….! फी ठरलेली आहे. ती देत असाल तर येतो. वैद्यकीय व्यवसायाकडे डॉक्टरांची दृष्टी बदलत्या काळानुसार बदलत आहे. आताचे डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत. पैसे नसले तर उपचार करतात, उधारी ठेवतात. पण फीचा तगादा यांचा भारी आहे. एका फेरीत पेशंट बरा होईल असे त्यांच्याकडून घडत नाही. दोन तीन फेऱ्या मारायला लावल्यानंतर पेशंटला आराम मिळतो. तो पर्यंत खिसा खाली झालेला असतो.  कोणी तरी म्हणेल या पेशंटला जवळच्या सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जाता येत नाही का …?  काहींचे हातावर पोट असते.दिवसभर राबावे लागते. आजारी असल्याचे सांगता येत नाही. दुकानात कामावर असलेल्या नोकरदारांचे उदाहरण घ्या. कामावर नाही गेलात तर ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवितात. काही तरी कमवून आणले तरच त्यांची कच्ची बच्ची जेवतात. त्यांच्यासाठीच…..! या गल्लीबोळात मंदिर उभारून बसलेल्या देवांनो समजुतीने घ्या. जेव्हा जेव्हा साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त असतात. तेव्हा तरी त्यांना सांभाळून घ्या.

 

अशोक भेके

Avatar
About अशोक मारुती भेके 13 Articles
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

1 Comment on डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..