नवीन लेखन...

ट्रेन प्रवासात स्त्रिया किती सुरक्षित?

<ट्रेन प्रवासात स्त्रिया किती सुरक्षित?

मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्‍या मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेस शनिवारी ६० वर्षे पूर्ण झाली. परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी ६० वर्षात तेवढी सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. मुंबईतील ८० टक्के जनता ट्रेनने प्रवास करते त्यात नोकरी करणार्‍या स्त्रिया, शाळा

व कॉलेजात जाणारे विद्यार्थी/वाद्यार्थिनी, वृद्ध, अपंग, दृष्टीहीन यांचे प्रमाण खूप आहे. दळणवळ क्षेत्रात रेल्वेवेचा देशात पहिला नंबर लागत असेल परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे फारच उदासीन आहे असे सध्या घडत असलेल्या घटनांकडे बघितल्यास प्रकर्षाने जाणवते.

१९ जून, २०११ रोजी २४ वर्षाच्या स्त्रीवर नेरूळ स्टेशन जवळ झालेला हल्ला. २३ ऑक्टोबर, २०११ रोजी २३ वर्षीय प्रियांका कुमार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांचा मोबईल चोरून नेणे तसेच नुकत्याच २ नोव्हेंबर २०११ रोजी २० वर्षीय प्रिया दुर्गाले यांच्यावर सकाळी ५.१०च्या सुमारास ब्लेडने केलेला हल्ला. या हल्ल्यातील सर्व स्त्रिया तरुण व व्यवसाया निमित्त ट्रेनने प्रवास करीत होत्या. मुख्य म्हणजे मध्यरेल्वेवर आधी झालेली घटना ताजी व सकाळीच होऊन देखील आणि घटनेचा संदर्भ ताजा असताना मध्यरेल्वे सुरक्षा दलाने स्त्रियांच्या डब्यात शस्त्रधारी पोलीस न ठेवणे कशाचे लक्षण समजावे. नुकतीच घडलेली घटना, मुंबई-नागरकोईल एक्सप्रेसवर शुक्रवारी रात्री सोलापूर जवळील वाकाव स्थानाकानाजिक शस्त्र दरोडा पडला व त्यात दोन महिला प्रवासी जखमी झाल्या. आता सांगा रेल्वेने प्रवास सुरक्षित राहिला आहे का? बर्‍याच वेळा रेल्वेसेवेच्या मानवी व यांत्रिक चुकीने कित्येकांना प्राणास मुकावे लागले ते वेगळेच. आज स्त्री कुठेही सुरक्षित नाही असे वाटते. स्त्रियांनीही आत्मसंरक्षणाच्या काही क्लुप्त्या व हजरजबाबीपणा सध्याच्या धकाधकीच्या दिवसांत आत्मसात करणे गरजेचे आहे.

अर्थात यात सर्वस्वी रेल्वेच जबाबदार आहे असे नाही परंतू प्रवाश्यांनीही वेळेचे भान ठेवून प्रवास केला किंवा एकटया दुकट्या महिलेला पहाटे प्रवास करण्याची वेळ आलीच तर कोणा सोबतीने व जेथे जास्त प्रवासी असतील त्या डब्यातून प्रवास केल्यास वरील घटना घडणार नाहीत किंवा त्याला आळा बसेल. रेल्वेनेही अगदी सकाळच्या म्हणजे ४ ते ७ वाजेपर्यंत लेडीज डब्यात सशस्त्र सुरक्षारक्षक ठेवणे बंधनकार आहे. तरी प्रेत्येकाने स्वत:ची सुरक्षा घेणे आपले स्वत:चे कर्तव्य आहेच पण सहप्रवाश्याची सुरक्षा घेणे सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे.

जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..