नवीन लेखन...

“टक टकता वैश्विक प्रगतीची”

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली. यामध्ये वेग, नेटकेपणाची सुद्धा अपेक्षा होती. म्हणून काही तज्ज्ञ मंडळींनी “रायटींग मशीन” ची निर्मिती केली जी टाईपरायटर ची प्राथमिक अवस्था होती, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यात आले; “टाईप रायटर” साठी महत्वाचा घटक असतो “कार्बन पेपर” ज्याची निर्मिती खूप आधीपासून करण्यात येत होती. हे दोन्ही घटक एकत्र आल्यामुळे कामकाज बरचसं सुरळीत होऊ लागलं.

१८७० या वर्षी डेन्मार्क येथील “रॅसम्स मॅलिंग हॅनसेन” या यंत्रकुशल व्यक्तीने अक्षरांच्या कळा दाबून कागदावर शब्द उमटविणारे थोड्या अधिक प्रमाणात सुटसुटीत यंत्र तयार केले. या यंत्राचा कळफलक हा चेंडूच्या आकाराचा होता. त्यामुळे त्याला “रायटींग बॉल” म्हणून संबोधलं जातं; या बॉलमुळे लिहिण्याच्या अडचणी लक्षात येऊ लागल्या, व तीनच वर्षांमध्ये आडवा कळफलकाचा जन्म आणि या यंत्राला टाईपरायटर असं म्हटलं जाऊ लागलं.
पुढे टाईपरायटर मध्ये अनेक बदल होत राहिले व नवीन यंत्राच्या डिझाईनचे समानीकरण व्हायला १९१० वर्षं उजाडले. त्यानंतर टाईपरायटरचं भारतात आगमन झालं, पण इंग्रजांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांमध्ये, भारतीयांची गरजा पूर्ण करण्यासाठी टाईपरायटरची गरज भासू लागली व त्याकाळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी ही बाब बोलून दाखविली. “गोदरेज” समूहाने हे आव्हान स्वीकारले व यशस्वीरीत्या पार पाडले. आणि साकारला पहिला भारतीय टाईपरायटर, ते वर्ष होतं १९५५. काही काळातच हा टाईपरायटर सरकारी सेवेत रुजू झाला.
भारतीयांना सरकारी सेवेत नोकरीसाठी लिपीक, किंवा अन्य पदांसाठी नोकरी मिळवण्यासाठी टाईपरायटर येणं नितांत गरजेचं होतं, म्हणूनच ६०, ७० व ८० च्या दशकातील विद्यार्थी व तेव्हाच्या तरुण पिढीने “शॉर्ट हॅंड” चे कोर्सेस सुरु केले. सर्वत्र ४०, ५०, ६० व ८० च्या स्पीड परीक्षांचे पेव फुटले.
खरंतर या टाईपरायटर ने अनेकांना करियरची दिशा दाखवली अनेक गरीब व मध्यमवर्गीय घरातील तरुण मुला-मुलींना रोजगार मिळवून दिला मुख्य म्हणजे संगणकाची क्रांती, निर्मिती प्रक्रिया यासाठी दिशा दाखवण्याचे काम टाईपरायटरने केले; हा टाईपरायटर कमावण्याचं साधन बनला ज्यामुळे व्यक्तीला पद, प्रतिष्ठा तर मिळालीच पण टाईपरायटर त्यांच्या घरातील व मनातील सदस्या सारखा झाला होता. कालांतराने संगणकाचं आगमन झालं व टाईपरायटरचा वापर हळुहळू कमी झाला, बहुतांश कार्यालयातनं टाईपरायटर हद्दपार होऊ लागले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्याची जागा संगणक घेऊ लागले, टाईपरायटर निवृत्तीच्या मार्गाला लागले; आणि आता तर जवळपास सर्वच सरकारी तसंच निमसरकारी संस्था, कार्यालय “डिजिटाईज्ड” झाली आहेत. खेडोपाड्यात संगणक पोहोचले, आणि आता “टच सक्रीन” चा जमाना आहे; त्यामुळे “टाईपरायटर” ही “टेक्नो सॅव्हींसाठी” एखादी अॅण्टीक वस्तू वाटावी तशी बनली असून, अनेकदा भंगारवाल्यांकडे किंवा चोरबाजारात सुद्धा पुरातन वस्तु म्हणून विकली जात आहे, व त्याला अव्वाच्या सव्वा भाव प्राप्त झालेला आहे. खरंतर टाईपरायटर म्हणजे “तंत्रज्ञानाची” पहिली पायरी म्हणता येईल, म्हणूनच की-बोर्ड ने त्याची जागा घेतलेली दिसत आहे, या नव्या युगात जुनीच कर्तव्य अगदी कुशलतेनं पार पाडताना दिसत आहे.
आज ५०, ६०, ७० वर्षांच्या पुढच्या पिढीची या टाईपराटरवर कधी चुकून नजर पडली तर क्षणभरासाठी सर्व काही विसरुन, घुमतो तो फक्त टक-टक आवाज, तरळतात कार्यालयीन दिवस आणि रममाण होतो टाईपींगच्या प्रोफेशनल दुनियेत; आणि मन अगदी “ऑफिशियल” झाल्यासारखं वाटतं.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..