नवीन लेखन...

जगातल्या भाषा आणि मराठी – एक तुलना

ancient-india-map

भाषा हे अनादिकाळापासून चालत आलेलं संपर्क माध्यम. जगातल्या प्रत्येक जमातीची स्वतःची भाषा असते. काही जमातींची एकच कॉमन भाषा असते. देशानुसार भाषा बदलते तशी राज्यानुसारही बदलते आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोली भाषा ऐकायला मिळते.

मराठीच्याच बोली भाषा म्हणजे कोकणी, खानदेशी, वर्‍हाडी, घाटावरची, मुंबईची, पुणेरी  वगैरे.

थोडं मुंबई, महाराष्ट्र आणि त्याही पलिकडे जाउन बघू.

जगात जवळपास ७००० भाषा आहेत असं म्हटलं जातं. त्यातल्या बर्‍याच भाषा नष्ट होतायत किंवा त्या मार्गावर आहेत. काही भाषा बोलणारी तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळी आहेत.

याच पार्श्वभूमीवर थोडी शोधाशोध केली तेव्हा लक्षात आलं की मराठी माणूस जगातल्या किमान ५० देशांमध्ये जाउन पोहोचलेला आहे. त्यामुळे तिथे तो मराठी भाषेत बोलत असणारच. इतरांशी नाही तरी घरात तर नक्किच. मग मराठी संपतेय वगैरे बोलणार्‍यांसाठी थोडी मोलाची माहिती बघा….

इंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच.

मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी? मराठीला संपवायचं तर हे राजकारण नसेल? कारण हे असं बोलणार्‍यांची पोरंबाळं टाय लावून इंग्रजी शाळेत जाताना आपण बघतो.

थोडा विचार जरुर करायला हवा…..

मराठी भाषेसाठी आता शासनाने नवं – कोरं भाषा धोरण आखलंय.  त्याचा मसूदा सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विनोदाचा भाग असा की यातील सगळ्या सूचना महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अमलात आणायला शासनाला कोणी अडवलं होतं का असा प्रश्न पडतोय.  जे कायद्यात आणि नियमात आहे तेसुद्धा करायची टाळाटाळ केली सरकारने.  त्यावर पुन्हा कधीतरी लिहायलाच हवंय.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत म्हणे. मुळात महाराष्ट्रात मराठीला मानाचं स्थान मिळूवून द्या,  अभिजात वगैरेच्या गप्पा नंतर मारुया.
— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..