नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तर

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 27-नैवेद्यम् समर्पयामी-भाग एक

आपल्यासाठी देवपूजेतील एक महत्वाचा उपचार म्हणजे नैवेद्य. कारण आपणाला निश्चितपणे माहिती असते, की जो नैवेद्योपचार आपण देवासाठी म्हणून करत आहोत, तो देवासाठी नसून, आपल्या देहासाठीच आहे. तो नैवेद्य नंतर आपणालाच खायला मिळणार आहे. मग तो गणपतीचा मोदक असो किंवा म्हसोबासाठीचा बोकड. नाव देवाचे खातो आपणच.
निवृत्तीनाथ इंदोरीकर एका किर्तनात म्हणतात,
“किती स्वार्थी आहोत आपण. ‘बोकड देवासाठी’ असं म्हणत देवाला काय देतात तर खूर. जो शिजत नाही. तो शिजला असता तर तोही दिला नसता, विठ्ठल विठ्ठल”

देवपूजा दिवसातून किती वेळा केली जाते ? दोन वेळा. सकाळी आणि सायंकाळी. दिवसभर देवपूजा असते का ? नाही. दोनवेळा देवपूजा तसे दोन वेळा नैवेद्य. इथे आरोग्य दडलेले आहे. दिवसभर चरत राहायचे नसते. जे काही खायचे ते दोन वेळा पोटभर हा महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितलेला आहे.

भारतीय परंपरांना आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, ते इथे लक्षात येते. कारण अन्य कोणत्याही धर्मात अशी षोडशोपचार पूजा नाही, असे नैवेद्य नाहीत. अन्य चार पाच सण सोडले तर फार मोठे सण नाहीत. त्यामागे फार मोठे लाॅजिक नाही. जे सण म्हणून साजरे केले जातात, ते फक्त प्रेषितांच्या जयंत्या अथवा मयंत्या. किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व स्मरणात रहावे यासाठी केलेली सोय असते. पुष्पगुच्छ किंवा बुके आणून ठेवला, मेणबत्ती पेटवली की, झालं. उपचार म्हणून नाही.

आज आमच्या हिंदू धर्मामधे देखील हे नुसते कर्मकांड उरले आहे. एखाद्या महामानवाच्या नावे जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने जुलुस, जलसा, डीजे, आणि पार्टी ! मग ते महामानव गांधी असोत वा आमचे आंबेडकर किंवा आमचेच सम्राट अशोक असोत, या महामानवांनी सांगितलेली तत्वे सोयीस्कर विसरवली जातात, आणि फक्त जातीचे राजकारण पसरवले जाते.

आणखीन दुर्दैव हेच आहे की प्रत्येकाने आपले झेंडे देखील वेगळे केलेत, रंग देखील वाटून घेतलेत, महापुरूष पण वाटून घेतलेत.

मोहनदास करमचंद गांधीचा आत्मा, ड्रायडेच्या निमित्ताने कुठेतरी म्हणत असेल “हेची फळ काय मम तपाला” ! मी आयुष्यभर काय सांगितले आणि माझे अनुयायी माझ्या नावाने काय करत आहेत ? माझे गुण जाऊदेत, अहिंसा जाऊदेत, सत्य जाऊदेत, माझ्याच नावाची टोपी घालून, मद्यपान करत, मांसाचाच चकणा भरताहेत. हे केवळ गांधीचे दुःख नाही तर सर्वच महामानवांचे दुःख आहे. असो.

षोडशोपचार पूजेचे हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मामध्येच. धर्मसूत्रे नीट अभ्यासली तर त्यामागे असलेले शास्त्र समजून घेतले तर ती अंधश्रद्धा, बुरसटलेले कालबाह्य विचार नसून, सुसंस्कृत जीवन जगण्याची एक आदर्श पद्धत आहे, असे लक्षात येते.

राजकारणातील काही स्वार्थी माणसांनी किंवा काही जातीयवादी माणसांनी राजकारण म्हणून या चालीरीतींवर टीका करायला सुरवात केली, आणि आमच्या मनात विकल्प यायला सुरवात झाली. एकेकाळी शिक्षण व्यवस्थेमधे असणारे सर्व हिंदू धर्मग्रंथ, मेकाॅलेच्या कुटनीतीला बळी पडून आमच्या शिक्षणातूनच गायब करण्यात आले. मूळ पायाच डळमळीत केला तर इमारत केव्हाही पडू शकते, या सिद्धांतानुसार, हिंदुंचे धर्मग्रंथ देवघरात फूल वाहून, पोथीरूपात बंद झाले. ते गेल्या पन्नास साठ वर्षात कधी उघडून, वाचून, आचरणात आणले गेले नाहीत, परिणामी धर्मग्रंथात काय सांगितले गेले होते, का सांगितले होते, त्याचे भावार्थ काय होते ?त्यात नेमके काय समजून घ्यायचे असते, ही दृष्टी नाहीशी झाल्यामुळे आम्हाला आमचेच धर्मग्रंथ म्हणजे जणुकाही पुराणातली वांगीच वाटू लागली. भीतीपोटी केवळ उपचार शिल्लक राहिले आणि उपचारामागील विज्ञान विसरले गेले. आणि फक्त कर्मकांड म्हणून आमचेच बुद्धिमान पंडीत आपल्याच धर्मग्रंथाची हेटाळणी करू लागले.

नैवेद्याचे रूपांतर पार्टी पर्यंत येऊन पोचले आहे, ही शोकांतिका आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..