नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग तेहेतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक

नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.

भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत “ड्रम किंवा बॅरल” तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !

धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.

जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर “गुरू” असतात. “गुरू” असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !

आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर “आमा” सारखे दोष कमी होतात.

फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. …. म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । – इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.

प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !

धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच “काळ” हे पण मोठे प्रभावी औषध आहे.

ठराविक “काळ” निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..